मी morning walk ला जाते ना तर .....
एक दिवस एक ६५/७०
वय असेल त्या व्यक्तीचं. तर ते गृहस्थ हातातील प्लास्टीक बॅगमधून झाडाच्या
बुंध्याशी काहीतरी टाकत आहेत हे मी लांबुनच बघितलं. माझी उत्सुकता वाढली.
काय बरं टाकत आहेत????
झाडाच्याजवळ गेल्यावर लक्षात आलं की ते खत घालत होते मुठीमुठीने, झाडाच्या बुंध्यापाशी... कसं आलं असेल लक्षात!
किती सुंदर गोष्ट करत आहेत ते! पुन्हा त्याचा गाजावाजा नाही !!!! त्यात मोठेपणाचा आव नाही.
पण त्यांच्या चेहऱ्यावरील ते समाधानाचे स्मित खुप काही
सांगून गेलं
आता त्या झाडांकडे बघतांना 'ते' आठवतात. नाहीतर झाडांवर फूल दिसलं की तोडणारे/ कळी दिसली की ती उमलण्याआधीच तोडणारे लोक आपण बघतो.
पण या व्यक्तीला मी मनोमन प्रणाम केला आणि......
आपण सुद्धा हे किंवा या सारखे काम करू शकतो .
No comments:
Post a Comment