देवाची सुंदर कलाकृती... नागचाफा !!!!!!
हे तजेलदार आकर्षक रंगाचं मस्त फूलअसतं.
आमच्या इथे शंकराच्या मंदिराच्या प्रवेश दाराजवळ मी हे प्रथम पाहिले. ते मला खुपच आवडलं. कारण या फुलाचा मनमोहक रंग.
मनमोहक रंगामुळेच हे फूल कोणालाही आवडेल.
हा एक वृक्षच असतो. या वृक्षाच्या बुंध्यालाच जमिनीपासून काही फुटावरच डहाळ्यांना कळ्या येतात. सकाळी सातच्या दरम्यान त्या फुलतात. काहीवेळा फुलं गुच्छासारखी असतात. तर काहीवेळी एक एक फुल असतं. कळ्यासुद्धा लहान मग मोठी मोठी या क्रमाने असतात. फुल फुलल्यावर काहीसा मंद सुवास असतो
नागचाफ्याचे पुकेसर हे नागाच्या फण्यासारखे असतात. म्हणूनच याला नागचाफा म्हणत असावेत. आणि या फण्याखाली जणू काही शंकराची पिंडी असावी असा आकार असतो.
जेव्हा फुलं खुप येतात तेव्हा देवळातील पिंडी या फुलांनी सजवतात. तेव्हा खुपच छान वाटतं.

फळ ---
याचे फळ म्हणजे तोफेचा गोळाच जणू. मी याचं फळ थोडं
उंचावर बघितलं आहे. रंग फिक्का तपकीरी. पण दोन हातात जेमतेम मावेल असा आकार
असतो. जणू झाडाला लटकवलेले मोठे चेंडूच.ते फळ पिकलं की पडतं आणि पडतांनाच
फुटतं तेव्हा याचा वास उग्र असतो.
याची पानगळ वर्षातून तीन वेळा होते सर्व पानं पडतात व ती पडतांनाच पाठून नवी पालवी येते. त्यावेळी पण झाड मस्त दिसतं!!!!
तर असं हे नागचाफ्याचं झाड फोर्जेट हीलच्या कॉर्नरला पण मी बघितलं आहे. याची फुलं मी हातात घेतली आहेत त्याचं छान निरिक्षण पण केलं आहे.

No comments:
Post a Comment