कावळा
अगदी लहानपणीच कावळ्याची ओळख गोष्ट रूपाने होते.
आपल्याला कावळा रोजच दिसतो, याच्या निरनिराळ्या कथा आपण ऐकतो....
तर याच्या मी पाहिलेल्या घटनेबद्दल.....
आपल्याला कावळा रोजच दिसतो, याच्या निरनिराळ्या कथा आपण ऐकतो....
तर याच्या मी पाहिलेल्या घटनेबद्दल.....
★ काकनजर......
समुद्रकिनारी छान झाडं लावली आहेत. त्याच्या बाजुने बाक पण आहेत. तसेच कुंड्या
(थोड्या मोठ्या- पसरट ग्लास सारख्या) तर त्यात झाडं आहेत ना ती मोठ्या मोठ्या पानांची !!!!! म्हणजे त्याखाली कचरा टाकला तर दिसणार नाही इतकी मोठी पानं आहेत.
तर त्या तिथे एका कावळ्याने झडप घातली, माझं लक्ष तिकडे गेलं !!!!
त्या कावळ्याने एक चिचुंद्रीचं पिलु पकडलं. नंतर अर्थातच ते गट्टंम केलं

★ फळं खाणारा कावळा...
असंच आमच्या गॅलरीत एक कावळा यायचा तो फक्त फळं खायचा. पोळी, मारी बिस्कीट ठेवलं खाण्यासाठी तर खायचा नाही.
(मात्र आम्ही काशीयात्रा केल्यानंतर मात्र हा कावळा कधी आला नाही)
(मात्र आम्ही काशीयात्रा केल्यानंतर मात्र हा कावळा कधी आला नाही)
★कसं समजतं कावळ्यांना...
एक फरसाणवाला शंकराच्या देवळात रोज सकाळी येत असे. तर
त्याच्या डोक्यावरून २५/३० कावळे उडत उडत येतांना मी बघत असे. प्रथम मी
बघितलं तर मला कळलं नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की तो फरसाण टाकतो तिकडे
म्हणून ते त्याच्याबरोबरच येत असंत!
असे हे कावळे!!!!!
असे हे कावळे!!!!!
कावळ्यांच्या प्रत्येकाकडे काहीना काही अनुभव, कथा असतीलच असतील !!!!
आणि तरीही कळायला लागल्या पासून दिसणारा.... ते मनुष्य गेल्यानंतरही काही सुचना देणारा.....
अगदी नातेवाईक हात जोडून प्रार्थना करतात येथपर्यंतचा सोबती.....
अगदी नातेवाईक हात जोडून प्रार्थना करतात येथपर्यंतचा सोबती.....
याच्या अनेक कथा....
★ माहेरवाशीण, दारात कावळा ओरडला तर कोणीतरी माहेराहून येणार म्हणून वाट बघते.
★ याला कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाहीत. त्यामुळे तो मुक्त पक्षी.
★ काऊ म्हटलं की चिऊ हवीच
एक असतो काऊ
आणि एक असते चिऊ
काऊचं घर शेणाचं
आणि चिऊचं घर मेणाचं ......
★ आणि महत्वाचं परिसर स्वच्छ करण्याचं काम तर करतोच.
★ कितीही नावडता असला ना तरी माणसाला चुकून जरी याचा स्पर्श
झाला तरी इतर कावळे त्या कावळ्याला टोचून टोचून मारतात. असं का ते मात्र
कळलेलं नाही.
★ कावळा घर बांधतांना बघितलंय ??
घर बांधण्यासाठी हँगर, तारा त्याला फार प्रिय असतात. का कुणास ठाऊक ? आणि वाळलेल्या गवताच्या काड्या.
आणि असं म्हणतात की कावळा घर बांधायला लागला की लवकरच पाऊस पडणार.
आणि असं म्हणतात की कावळा घर बांधायला लागला की लवकरच पाऊस पडणार.
★ कोकीळ पक्षी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवतो. आणि हा त्याची पिल्लं वाढवतो.
★ शहरी कावळ्याला जर वेगळ्या जातीचा (डोमकावळा) दिसला तर इतर कावळे गोळा होऊन हुसकावून लावतात.
~ आपण चित्र काढतांना देखाव्यात सोप्पे कावळे काढतो. की ते चित्र छान दिसतं.
~ कावळा सरळ उडतो.
कारण म्हणे> तो म्हणतो .... का-वळा
~ भूक लागल्यावर आपण म्हणतो...... पोटात कावळे ओरडतायत / कोकलतायत.
~ मुलं गलका करत असतील तर ....काव काव करू नका.
कारण म्हणे> तो म्हणतो .... का-वळा
~ भूक लागल्यावर आपण म्हणतो...... पोटात कावळे ओरडतायत / कोकलतायत.
~ मुलं गलका करत असतील तर ....काव काव करू नका.
~काकस्पर्श- त्याच्या नावाचा चित्रपट
~ कावळ्याची नजर आहे..
~ एकच डोळा आहे याला असंही म्हणतात.
~ कावळा म्हणे मी काळा
पांढरा शुभ्र तो बगळा
अशा काव्यातूनही भेटतो.
~ गजानन महाराजांनी आज्ञा देताच कावळे वऱ्हाडातून निघून गेले ते आजपर्यंत तेथे नाहीत.(असं म्हणतात).
असं म्हणत
काव काव काव
सोन्याची बाव
पाहूणा यायचा
नसला तर
बाळाच्या डोक्यावरून
उडून जाव

No comments:
Post a Comment