Friday, 7 August 2015

।।बालक विहार विद्यालय।।


माझ्या शाळेचा स्नेह मेळावा

।।बालक विहार विद्यालय।।

माझी शाळा....

      बंध मैत्रीचे
  १ ऑगस्ट २०१५
बालक विहार विद्यालय
   माजी विद्यार्थ्यांचा
       स्नेह मेळावा...
डिसिल्व्हा हायस्कूल दादर
वेळ: संध्याकाळी ४ ते ८


३१ जुलैला झालेली गुरूपौर्णिमा,
१ ऑगस्टला असणारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी,
आणि २ ऑगस्टला आलेला friendship day...
असे सुंदर औचित्य साधुन आमचा स्नेह मेळावा झाला. (१ ऑगस्ट रोजी)
(गेट-टुगेदर)
     माँटेसरी पासून ते १० वी पर्यंतचे संपूर्ण शालेय शिक्षण मी या शाळेत घेतले.
माझी शाळा गोखले रोड नॉर्थ, दादर येथे आहे.
     माँटेसरीचे वर्ग
आराम बिल्डिंग मध्ये भरत असत.
१९७५ या वर्षी' मी १० वी मॅट्रीकची पहिल्या बँचची विद्यार्थीनी!!!!!
१ ऑगस्ट २०१५ या दिवशी आमच्या शाळेचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर झाले.
 एवढ्या वर्षांनी प्रथमच हे गेट टुगेदर झाले असं मला वाटते.
  त्यादिवशी हॉलमधे १२०० विद्यार्थी होते. हजर असलेल्या विद्यार्थ्यात सर्वात जुने विद्यार्थी होते...
जगदिश धोपेश्वरकर...
बॅच होती १९४० ची.
आज त्यांचे वय ७८ वर्ष आहे.
(हे आराम बिल्डिंग मधेच राहतात.)
तसेच समाजात, निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा
 सत्कार, गौरव करण्यात आला.
यामध्ये लक्षात राहिलेली नावे :
अभिनय क्षेत्रात असलेले सतीश पुळेकर,
विरार वसईच्या नगरसेविका वैद्य ,
नॅशनल लेव्हलचे खो खो पटू - बागायतकर, विवेक पडते,
लेखक- भूषण पालकर,
(आणि बरेच जण)

माझ्या बॅचचे १३ विद्यार्थी आले होते, सगळे मुलगे!!!!
आणि मुलींमध्ये मी एकटीच!
तर... हे माझे सगळे वर्गमित्र मला नावाने ओळखत होते.
 याचे मला खूप आश्चर्य वाटले कारण आज ७५ सालानंतर ते मला प्रथमच भेटत होते.
पण..... मी मात्र दोघांनाच ओळखू शकले.
मी आपली प्रत्येकालाच.. sorry .. म्हणत होते.
    जिकडे-तिकडे शाळांमध्ये गेट-टुगेदर होतात हे मी ऐकते त्याच्या गमतीजमती मी ऐकत होते ....
 या आनंदापासून मी वंचीत होते. पण १ ऑगस्ट २०१५ च्या संध्याकाळने मला हा आनंद मिळवून दिला. 
 आम्ही तीनही भावंडं या शाळेचे माजी विद्यार्थी!!!!! आणि हो,.... वहिनी प्रायमरी शिक्षिका!!!!

आणि तिघेही हजर होतो... वहिनीसुद्धा!

पण.... यादिवशी एक धक्कादायक बातमी कळली.
 शाळेत सध्या ८वी, ९वी, १०वी हे तीनच वर्ग भरतात.
तर परत शाळा पूर्ण भरण्यासाठी काय करता येईल???
 त्यासाठी काही मार्ग सुचवा!!! यासाठी हे गेट-टुगेदर होते.
आता ३ समित्या स्थापन केल्या आहेत 
व whatsapp च्या माध्यमातून संपर्क ठेवून काम करायचे ठरले आहे.

(शाळेला आर्थिक मदत नको तर शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी कशी भरेल? यासाठी सुचना, प्रयत्न हवे आहेत)

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

शाळा स्थापना: १९३६

आराम बिल्डिग, गोखले रोड नॉर्थ. दादर 


संस्थापिका : सरस्वतीबाई दीक्षित.
शाळेच्या मुख्याध्यापिका ...
सुधा साठे... यांनी M.A. पर्यंत शिक्षण घेतले होते.
वयाच्या १८ व्या वर्षीच त्या मुख्याध्यापिका झाल्या.
(या संस्थापिका सरस्वतीबाई दीक्षित यांच्या कन्या)

प्रदीप साठे सर:
 नेव्हीतून पोलीस डिपार्टमध्ये कार्यरत,
नेव्हीमध्ये दोन युध्दात सहभाग.

आताचे ट्रस्टी अजित साठे,
इंजिनिअर आहेत,
 ते कामानिमित्त परदेशात होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 जगदीश धोपेश्वेरकर 

No comments:

Post a Comment