आता श्रावण सुरू होतोय तर बघूया
चौरंगाचं महत्त्व!!!!
चार बाजुला,
चार पायीला
केळीचे खांब,
चौरंगावरी मधे बैसले
चार पायीला
केळीचे खांब,
चौरंगावरी मधे बैसले
सत्यनारायण!!!!!
सत्यनारायणाची पूजा म्हटलं की चौरंग हवाच.
सत्यनारायणाची पूजा म्हटलं की चौरंग हवाच.
केळीचे खांब बांधण्यासाठी खास
सोय केलेली असते,
किंवा खांबाच्या आकाराच्या बाटल्यात खांब ठेवतात. म्हणजे
खांब हलत नाहीत.
मंगळागौरीची पूजा, हरितालिकेची पूजा, लघूरूद्र,
म्हणजेच कोणतीही पूजा म्हटली की चौरंग हवाच.
मंगळागौरीची पूजा, हरितालिकेची पूजा, लघूरूद्र,
म्हणजेच कोणतीही पूजा म्हटली की चौरंग हवाच.
जावयाचा मान करतांना,
विहिणीचा मान करतांना
चौरंग हवाच!!!!!
विहिणीचा मान करतांना
चौरंग हवाच!!!!!
फार पुर्वी पाहुणे आले तर त्यांचे ताट चौरंगावर ठेवत असत.
ही एक पाहुण्यांना मान देण्याची पद्धत होती.
ही एक पाहुण्यांना मान देण्याची पद्धत होती.
आता चौरंगाविषयी:
लाल रंगाचा चौरंग,
तो सुशोभित करण्यासाठी काही वेळा तो पितळेच्या फुलांनी, चांदीच्या फुलांनी सुशोभित केलेला असे.
काही चौरंग ड्रॉवर असलेले असतात. म्हणजे त्यात पुजेचे साहित्य ठेवता येते.
त्याचे पाय सुद्धा वेगवेगळे असतात,
चौरंगाचे पाय सरळ असतील तर खांब बांधणे सोपे होतेे,
पण काही चौरंगाचे पाय सिंहाच्या पायासारखे असतात.
हा चौरंग
थोडा उंचीला कमी असतो पण मस्त दिसतो, याला खांब बांधणे थोडे त्रासाचे असते.
लाकडी, शिसवी, पितळेचा सुद्धा चौरंग असतो. पण...
आता नविन जमान्याप्रमाणे सुंदर नक्षीकाम केलेले,
व्हाईट मेटल वापरून सुशोभित केलेले चौरंग बघायला मिळतात.
हे चौरंगाचं आधुनिक रूप मन मोहवून टाकते.
हे चौरंगाचं आधुनिक रूप मन मोहवून टाकते.
बहुतेक प्रत्येक घरी चौरंग असतोच!!
पण नसेल आणि पूजेसाठी तो आणला गेला तर तो नुसताच परत देत नाहीत तर
पण नसेल आणि पूजेसाठी तो आणला गेला तर तो नुसताच परत देत नाहीत तर
त्याबरोबर नारळ देण्याची पद्धत आहे.
No comments:
Post a Comment