Sunday, 30 August 2015

सुंदर सकाळ

सुंदर सकाळ

     सकाळी लवकरच जाग आली. पाऊस पडून गेलाय, म्हणजे फिरायला जायला मिळणार तर....
लगेच तयार झाले आणि निघालेच. मस्त झुंजुमुंजु वातावरण!!!! 
 आकाशाचा सुरेख निळसर रंग मन मोहवित होता. गायवासराचे दर्शन घेतले  आणि पुढे निघाले. रस्ते मस्त ओलसर, स्वच्छ! बाबुलनाथ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
 कळसावर असलेली भगवी पताका... छान वाटत होत.
समुद्रकिनारी आले तो पर्यंत छान उजाडलं आणि आता केव्हाही पाऊस येईल असं वाटू लागलं.
 पण समुद्र मात्र अथांग, शांत दिसत होता. 
 तेथील ढग मात्र पावसाने पुर्ण भरलेले! त्यामुळे पाण्याचा रंग तसाच काळसर, राखाडी!
 गेले नेहमीच्या ठिकाणापर्यंत. सूर्यदर्शन होणार नव्हतंच.
      पावसाला सुरूवात झालीच. आणि तिकडे मोठा बसथांबा. 
जशी समुद्राची विशालता तसाच हा बसथांबा विशाल, सुंदर!!!
सहज १०० लोक आडोशाला थांबले. काहींना बसायला पण मिळाले.
 पण सगळेच फिरण्याच्या मनस्थितीत त्यामुळे कोणीच कोणाशी बोलत नव्हते. 
पाऊस केव्हा थांबेल याची वाट पाहत होते.
तेवढ्यात तेथे एक व्यक्ती आली, हातात अत्तराची कुपी होती,
 पटापट चारपाच जणांना अत्तर लावले.
 ती जागा मस्त सुगंधी झाली.
मनात विचार आला की आपण देवाला पुजेच्या वेळी अत्तर लावतो,
 मेसेज वाचतो की ओंजळीत फुले घेतली तर आपल्या हाताला पण सुगंध येतो...
असेच छान विचार येत होते...
अरे, बस आलीच की!!! पटकन बसमधे चढले.
तर देवळापाशी सुंदर दृश्य!!
गाय उभी आहे आणि 
ते छोटं बछडं तिच्या पोटाखाली आसऱ्याला उभं आहे, 
त्याला पर्याय सापडलाय.
 आपलं मुल असेल तर ते आईचा पदर घेतं डोक्यावरुन!!!
हो ना!!!

No comments:

Post a Comment