ब्रह्मकमळ .... मस्त फुल!
पांढरं शुभ्र फुल!!
रात्री उमलतं आणि सकाळी ते मावळतं. हे त्याचं वैशिष्ट्यं!!!!
या झाडाला पानफुटी असं म्हणतात.
रात्री उमलतं आणि सकाळी ते मावळतं. हे त्याचं वैशिष्ट्यं!!!!
या झाडाला पानफुटी असं म्हणतात.
नुसती झाडाची फांदी/ दांडी लावली की रोप
वाढतं. पानाच्या एका भागातून दुसरं पान येतं.
आणि आषाढ महिन्यात फुलं
येतात. पण एखाद-दुसरंच फुल येतं असं मला वाटतं.
विरार-वसई-कर्नाळा याबाजुला ही झाडं घराच्या कुंपणाला लावतात.
विरार-वसई-कर्नाळा याबाजुला ही झाडं घराच्या कुंपणाला लावतात.
आणि रात्री ती फुलतात तर कोणी बघत पण नाहीत असं कोणीतरी मला म्हणालं.
पण आपल्याकडे एखाद फुल येतं मग त्याचं खुप कौतुक असतं. खुप लोक फुल बघायला येतात.
पण असं म्हणतात की
पण आपल्याकडे एखाद फुल येतं मग त्याचं खुप कौतुक असतं. खुप लोक फुल बघायला येतात.
पण असं म्हणतात की
खरं ब्रह्मकमळाचं फुल हिमालयात येतं, ऋषीमुनी त्याचा शोध घेतात
आणि ते मिळालं की शंकराला वाहतात. असो,
हे फुलणारं फुल फुलतांना बघणं,
हे फुलणारं फुल फुलतांना बघणं,
त्याचा मंद सुगंध घेणं,
फुललेलं फुल पहाणं हा एक आनंददायी सोहळाच असतो.
पानाच्या एका कडेतूनच कळी दिसायला लागते
पानाच्या एका कडेतूनच कळी दिसायला लागते
कळी दिसायला लागल्यापासून साधारण
पंधरा दिवसांनी फुल फुलतं.
****************************** **********************
No comments:
Post a Comment