Friday, 3 June 2016

भारतीय चलन...

₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹

       भारतीय रिजर्व बैंक

RESERVE BANK OF INDIA

     केंद्रीय सरकार द्वारा प्रत्यभूत

GURANTEED BY THE CENTRAL GOVERNMENT
मग किती रुपये ते अंकात , त्याखाली अक्षरात लिहिलेले असते. म त्या खाली
मैं धारक को
     ---  रुपये
अदा करने का
वचन देता हूँ ।
त्या खाली गव्हर्नर यांची सही असते. 
असं  बाजूलाच  इंग्लिश मध्ये असते
नोटेच्या उजव्या कोपऱ्यात वर व डाव्या कोपऱ्यात खाली नोटेचा नंबर असतो

◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎

नोटेच्या दुसऱ्या बाजूस
 हिंदी इंग्लिश या दोन भाषा व्यतिरिक्त 
अन्य पंधरा  भाषांमध्ये
 किती रुपयांची नोट ते लिहिलेले असते.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

भारतीय चलन... रुपया..

₹... हे भारतीय रुपयाचे प्रतीक मान्य केले आहे.

२०१० मध्ये डी.उदयकुमार यांनी बनवले.

लॅटिन अक्षर आर 
 आणि 
देवनागरी अक्षर 
यांचा वापर करून हे बनले आहे.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

□ नोटा, नाणी....

 हे पैसे ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो...
ती मिळवण्यासाठी कष्ट करतो,
 पण कधी निरखून बघितलं आहे का या नोटांकडे??

□ खरी नोट, खोटी नोट ओळखता येते का??

यासाठी बँकेत माहिती लिहिलेली असते.

□ मिळालेली नोट.. कशी असते??

हस्ते परहस्ते ती आपल्या हातात येते
 तेव्हा त्यावर लिहिलेलं असतं, 
कुणाचा फोन नंबर, पत्ता... असं काहीही.!

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

★  नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असतो.

  बारीक अक्षरात इंग्लिश व हिंदीमध्ये महात्मा गांधी यांचे नांव लिहिलेले असते.
तिथेच कोपऱ्यात
 लहान गोलात भारतीय रिजर्व बँक व आत झाड व वाघ असे चित्र असते.

★  दुसऱ्या बाजूला

 ज्याला आपण वॉटर मार्क म्हणतो...

त्यात सुद्धा गांधीजींचा फोटो असतो

व अगदी कोपऱ्यात अशोक स्तंभ
 त्याखाली सत्यमेव जयते 
अगदी लहान अक्षरात लिहिलेले असते.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

 

 

 

१ रुपयाची नोट...

यावर तेल उत्खनन यंत्राचा फोटो आहे...

फक्त या नोटेवर वित्त मंत्रालयाच्या सचिवाची स्वाक्षरी असते.

आता या नोटा दुर्मिळ होत आहेत.
बाकी सर्व नोटांवर रिजर्व बँक गव्हर्नर यांची सही असते.

२ रुपयाची नोट... 

यासुद्धा दुर्मिळ नोटा झाल्या आहेत.
माझ्याकडे असलेल्या नोटेवर वाघाचे चित्र आहे, या नोटेचा रंग लाल आहे.
तर अजून एका नोटेवर भारताने सोडलेला उपग्रह आर्यभट्ट याचे चित्र आहे. या  नोटेचा  रंग लाल व निळा आहे.
अजून एक नोट आहे तिचा रंग करडा आहे. यावर वाघाचे चित्र आहे.

५ रुपयाची नोट.... रंग हिरवा.

ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्याचे चित्र आहे.

१० रुपयांपासून पुढील नोटात धागा असतो.

१० रुपयाची नोट....

 यावर वाघ हत्ती असे प्राणी आहेत.
अजूनही काही नोटा आहेत त्याचा रंग  वेगळा आणि त्यावरील चित्र वेगळी होती.

२० रुपयांची नोट...

 यावर पूर्वी कोणार्क सूर्य मंदिर येथील चक्र होते.
आता झाडं नदी,असं चित्र आहे.

५० रुपये.... 

संसद भवनाचा फोटो आहे.

१०० रुपये.... 

यावर डोंगर आणि ढगांचे चित्र आहे.

५०० रुपये..

 या नोटेवर भारत स्वतंत्र होण्यासाठी लढा देणारे नेते, पुढारी यांचे चित्र आहे

१००० रुपये..

 आपली प्रगती, विकास...
शेती- समृद्धी, तेल उत्खनन यंत्र, कॉम्पुटर, सॅटेलाईट,

๑๑✧  ๑́๑✧  ๑́๑✧  ๑́๑✧

नाणी.. 

.फार पूर्वीपासून नाणी वापरली जात होती...
तांब्याची, पितळेची, सोन्याच्या मोहरा असत.
ब्रिटिश काळात चांदीचा रुपया असे. यावर राजा व राणी यांचे चित्र होते.






तांब्याचा एक पैसा होता.
एक ऐकून ढब्बू पैसा, भोक वाला पैसा पण होता.
६ पैसे म्हणजे एक आणा,
१२ पैसे म्हणजे दोन आणे,
२५ पैसे म्हणजे चार आणे,
म्हणजेच पावली म्हणत.
५० पैसे म्हणजे आठ आणे.
अधेली.
१०० पैसे म्हणजे सोळा आणे. १ रुपया.
२० पैशाचे नाणे पितळेचे होते.
तसंच नंतर १, २, ३, ५, १०,२०, २५, ५० पैसे अशी नाणी चलनात होती.








१ रुपयाची तर वेगवेगळी नाणी निघाली.

तसंच ५ रुपयाची पण खूप वेगळी नाणी पाहायला मिळतात.

सुरुवातीला पाच रुपयाचे मोठे नाणे होते.
१० रुपयाचे पण मोठे नाणे होते.















❀ नाणी.. नाशिक टाकसाळ येथे पाडली जातात.

○○ सुटे पैशाची चणचण होते म्हणून अनेक ठिकाणी RBI ने मशीन्स बसवली आहेत.
त्यात जेवढ्या रुपयाची नोट ठेवू तेवढी सुटी नाणी मिळतात.

❀ नाण्याच्या एका बाजूला

 सारनाथ येथील  अशोक स्तंभ .... (सिहांची तीन तोंडे) असलेले चिन्ह आहे.
 त्याला छापा म्हणतात त्याखाली सत्यमेव जयते आणि एक छोटे ( . ) असते.
किती पैसे असते त्याला काटा म्हणतो.

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

❀ काही जणांना नाणी , विशिष्ट नंबरच्या नोटा जमवण्याचा छंद असतो.
फक्त  आपल्याकडचीच नाही तर इतर देशातील नाणी जमा करतात..
❀ काहीवेळा यासाठी जास्त पैसे देऊन नाणी, नोटा गोळा केले जातात.
❀ काही जण यापासून ग्रीटिंग्स, हार, बनवतात.
❀ वाढदिवसाच्या तारखेची नोट मिळते..
❀  काही नोट मिळाली कि लगेच अनेक घड्या घालून पाकिटात ठेवतात.
❀  काही दिवसभरात मिळालेल्या नोटा धुवून वाळवून वापरतात.
❀ तर काही मिळालेल्या नोटा पुस्तकात ठेवतात. म्हणजे त्या छान सरळ कडक होतात.
❀ बरेच जण मिळालेले पैसे देवासमोर ठेवून मगच वापरतात.
लक्ष्मी पूजन... यादिवशी या रुपयांची पूजा केली जाते.
तर काहीजण धनत्रयोदशी या दिवशी धनाची पूजा करतात.
○○नोट खोटी असेल आणि ओळखता आली नाही आणि बँकेत भरली गेली तर...
ती कॅन्सल करतात.
(आपले नुकसान)
बँक त्याची झेरॉक्स देतात.

○○ नोट फाटली तर सेलोटेपने चिकटवू नये.

अशा नोटा सरकारी बँकेत भराव्या,
त्या लगेच बदलून मिळतात.
○○ नोटांना जास्त घड्या घालू नयेत, त्या लवकर जुन्या होतात.

○○ प्रत्येक नोटेवर त्रिकोण, चौकोन, आयत, गोल पतंग असे चिन्ह असते,

उदाहरणार्थ...
१००० रुपये काळा पतंग◆
५०० रुपये तपकिरी गोल
१०० रुपये काळा त्रिकोण
५० रुपये काळा चौरस ■
२० रुपये लाल आयत
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

आता वाटतंय ना...बघुया ...
अजून माहिती मिळवू....
नाणी, नोटा....

 

 

 

 





 


 


No comments:

Post a Comment