पहिला पाऊस...
सकाळी उठले, चला फिरायला निघू....
तर सकाळ सुंदर सोनेरी झाली होती,
म्हणजे पाऊस येणार तर....
आज आताच.....
तयार झाले आणि निघणार तर पाऊस....
मस्त पाऊस बघत बसले.
मनात विचार आला...कि झालाय का पाऊस सुरु???
कारण हा वाजतगाजत नाही आलाय! पडतोय शांतपणे....
म पेपर वाचला...चला थांबलाय पाऊस!
निघालो... चौपाटीकडे
निघालो... चौपाटीकडे
बापरे !!! केवढा भरलाय पाऊस दूरवर!!!
पण छान वाटतय. गार वारे वाहत आहेत.
तेवढ्यात मागून एक अनोळखी बाई म्हणाली
आता हवा गार होईल.
येणाऱ्या पावसाचा आनंद कोणाशी तरी वाटावा म्हणून ती मला सांगत होती
चार पावले माझ्या पुढे जाऊन तिने माझ्याकडे वळून बघितले आणि हसली.
सकाळ झालीय तरी पावसाळी काळोख, रस्ते चिंब आहेत पण पाऊस नाही...केव्हाही पडेल.
तेवढ्यात एक मुलगी सायकल वरून पडली.
सकाळ झालीय तरी पावसाळी काळोख, रस्ते चिंब आहेत पण पाऊस नाही...केव्हाही पडेल.
तेवढ्यात एक मुलगी सायकल वरून पडली.
ही वाहन चालकांना सूचना तर नाही ना....
पावसाळा सुरु झाला आहे,
आपली वाहने सावकाश चालवा...
तर अजून पर्यंत भिजले नाही
मनात कवितेच्या ओळी...
आपली वाहने सावकाश चालवा...
तर अजून पर्यंत भिजले नाही
मनात कवितेच्या ओळी...
पहिला पाऊस पडतो तेव्हा
एकच काम करायचं....
हातातली काम बाजूला ठेवून पावसात भिजायचं....
आज सूर्यदर्शन होणार नव्हतंच.
आले रेल्वेस्टेशन वर!
आले रेल्वेस्टेशन वर!
आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली घरी येईपर्यंत थोडी भिजले.
No comments:
Post a Comment