Saturday, 4 June 2016

मनप्रसन्न....


आज शनी जयंती!

पावणे बाराला घरातून बाहेर पडलो.. 
चला टॅक्सी……. 
टॅक्सीवाला ...नाही म्हणाला!
पण तेवढ्यात १२६ बस येताना दिसली. पटकन रस्ता क्रॉस केला. बसमध्ये चढलो. 
जणूकाही आमच्यासाठीच बस आली.
एक तर ती ताडदेवहून सुटली म्हणाला कंडक्टर.
सध्या शाळा नाही ना.... म्हणून हि १२६ नंबर सोडतात.
पिकेटरोड मारुती मंदिरापाशी पोहोचलो.
 खूप गर्दी.... असं म्हणेपर्यंत आरती सुरु झाली.
मस्त वाटलं.
आणि 

आरतीनंतर सुंदर असं मारुती व शनी दर्शन.

शनिदेवांच्या चेहऱ्यावरील हास्य...

फारच छान, अगदी बघत राहावे असे.
नमस्कार केला.
थोडा जप केला.
आणि चांगली गोष्ट म्हणजे छान उभं राहून दर्शन घेता आले.
खूपच समाधान मिळाले.
*******************************
तसं नेहमी एक दृश्य दिसते...
सकाळी फिरायला बाहेर पडले कि...
देवळाजवळ गायी असतात बांधलेल्या..दोन दोन असतात. 

 कधी गाय वासरू, तर कधी दोन्ही गायी!

सकाळची वेळ.
 आपण जसं आंघोळ करतो तसं....
 या गायी पण अंग स्वच्छ करत असतात.
 पण दृश्य बघण्यापूर्वी असा विचार कधी आला नव्हता.!
 कि त्यांचा चेहरा कसा स्वच्छ करत असतील?? 

 पण जेव्हा मी बघितले तेव्हा मी आश्चर्यचकित झाले.

एक गाय दुसऱ्या गायीचा चेहरा आपल्या जिभेने चाटत होती, अगदी शिगंजवळ सुद्धा. 
आणि त्या गायीला अजून स्वच्छ हवं  असेल तर ती अजून अजून डोकं तिच्या पुढे करत होती.
असेच दृश्य अजून एक दोन ठिकाणी बघितले आहे.
आता पाऊस सुरु होईल तेव्हा हि वासरे गायीच्या पोटाखाली उभी राहतात.
असं सकाळच्या वेळी छान छान बघायला मिळते.

************************************

आपण खूप सुधारणा केल्या..

पण

महानगर पालिका जे पाणी सोडते ते मात्र त्यांचे कर्मचारीच सोडतात. 
ती चावी इतकी वजनदार असते कि दोन माणसे ती फिरवत असतात,
 व एक ढकलगाडीतून ती चावी आणतात म्हणजे बाकी अजूनही साहित्य त्यात असते
आणि चारपाच माणसे असतात.
*******************************************
केर काढणारे,
 दुधवाले, पेपर टाकणारे, 
ज्युस व्यावसायिक, नीरा, कबुतरांसाठी चणे विकणारा,
 रस्त्याने झाडे लावली आहेत त्यांना टँकरने पाणी घालणारे, 
 दुकानात हार देणारे....साधारणपणे बंद दुकानाच्या शटरला लावतात. फुलवाले...

आणि हो..चहाची टपरी, 

असे अनेक लोक...सकाळी भेटतात.

रस्ते शांत, स्वच्छ! वाहनांची वर्दळ कमी. मस्त असते सकाळ.!

*************************************

फक्त चौपाटीच्या रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या गाड्या, बाइक्स, असतात.

**************************************

काही मात्र दुचाकी, चारचाकी शिकायला येणारे असतात.
जिमखान्यावर क्रिकेट खेळणारे हौशी आणि क्रिकेट कोचिंगसाठी येणारे,
म यासाठी मैदानाला पाणी घालणे...
अनेकोनेक गोष्टी नजरेत येतात.

************************************

No comments:

Post a Comment