घण् घण् घण्
चला शाळा सुरु झाली...
जेव्हा जेव्हा शाळा हा विषय येतो तेव्हा प्रत्येक वर्षीचा शाळेचा पहिला दिवस आठवतो.
१३ जून....
किंवा...
कॅलेंडर वर १३ जून ही तारीख दिसते तेव्हा शाळा..आठवते.!
आणि
मन भूतकाळात रमते.
म्हणजे शाळेची, शाळेतल्या सगळ्या गोष्टी नेहमी आठवतातच.
शाळा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
मन भूतकाळात रमते.
म्हणजे शाळेची, शाळेतल्या सगळ्या गोष्टी नेहमी आठवतातच.
शाळा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
आयुष्याची पहिली बारा वर्ष आपली शाळेची असतात.
खूप काही शिकतो, घडतो आपण.!
पण हा खास दिवस..
आज १३ जून.....
या तारखेला आपल्या प्रत्येकाच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.
शालेय जीवनाची सुरुवात या तारखेने सुरु होते.
काहीच कळत नसतानाचा शाळेचा पाहिला दिवस.
या तारखेला आपल्या प्रत्येकाच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.
शालेय जीवनाची सुरुवात या तारखेने सुरु होते.
काहीच कळत नसतानाचा शाळेचा पाहिला दिवस.
हा दिवस आणि शाळेतल्या बाई.... आजही माझ्या स्मरणात आहेत.
वर्गात काही मुलांची रडारड, काही दिलेल्या खेळण्यात रमलेले,
तर काही नव्या मित्रात रमलेले....
आडून आडून इकडून तिकडून बघणारे पालक,...
आणि म शालेय जीवन सुरु झाले कि नवा वरचा वर्ग,
नवे बूट, नवा रेनकोट., नवी छत्री
नवे बूट, नवा रेनकोट., नवी छत्री
नवी पुस्तके, नव्या वह्यांना घातलेली खाकी कव्हर्स... त्यावरील लेबल्स,
त्याचा छान वास,
पुस्तक वह्यांवर सुवाच्य अक्षरात घातलेलं
नाव, इयत्ता, तुकडी , विषय प्रत्येक पानावर घातलेले क्रमांक
नवा खाऊचा डबा, पाण्याची बाटली, नवे दप्तर,
त्याचा छान वास,
पुस्तक वह्यांवर सुवाच्य अक्षरात घातलेलं
नाव, इयत्ता, तुकडी , विषय प्रत्येक पानावर घातलेले क्रमांक
नवा खाऊचा डबा, पाण्याची बाटली, नवे दप्तर,
नवा युनिफॉर्म, त्याचा नवा कोरा छान वास....
मे महिना संपला कि शाळेचे वेध लागतात, खरेदीला सुरुवात होते.
मे महिना संपला कि शाळेचे वेध लागतात, खरेदीला सुरुवात होते.
आणि शाळेच्या प्रवेशद्वारापाशी लक्षात येतं....
शाळा सुद्धा आपलं स्वागत करत आहे.
शाळा सुद्धा आपलं स्वागत करत आहे.
इमारतीला लावलेला नवा रंग,
फळा छान काळाभोर.....
सगळं नवं नवं!!!!!
बरेच दिवसांनी भेटणारे वर्गमित्र....
काही नवे चेहरे पण दिसतात
शिक्षक, कोण असणार???
काही नवे चेहरे पण दिसतात
शिक्षक, कोण असणार???
वर्गशिक्षक,... आज बसलोय आवडत्या बाकावर मग कसं बसवतील???
आणि हो.... शाळेची घंटा देणारे मामा,
घंटा वाजली की प्रार्थना....
(मधली सुट्टी, कंटाळवाणा तास संपला.... किंवा चला शाळा सुटली, याचा आनंद होत असे.)
(मधली सुट्टी, कंटाळवाणा तास संपला.... किंवा चला शाळा सुटली, याचा आनंद होत असे.)
मॉंटेसरी, प्रायमरी, माध्यामिक, असे टप्पे पार होतात.
तरी या तारखेचं महत्त्व कमी होत नाही...म मुलं, नातवंडे...
No comments:
Post a Comment