Thursday, 23 June 2016

सहज शक्य.!!!


★ उठल्या उठल्या आळस द्यावा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ दात न घासता.. पाणी, जमिनीवर बसून प्यावे.

*******************************

★ डोळ्यावर पाच सात पाण्याचे हबके मारावेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ चालण्याचा व्यायाम घ्यायचा असेल तर...

.कोणतेही काम हातात, डोक्यात ठेऊन चालू नये.

 चालून आल्यावर परत कामासाठी बाहेर पडावे.

*******************************

सकाळी पाणी, दुपारी जेवणानंतर ताक, रात्री जेवणानंतर दूध प्यावे.

दूध गार किंवा दूध हळद किंवा गरम दुधात तूप घालून प्यावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ रात्री शांत झोप येण्यासाठी

 देशी गायीचे तूप एक एक थेंब नाकपुडीत सोडावे.

*******************************

★ वेळ मिळेल तेव्हा....आपण कसा श्वास घेतो याकडे लक्ष द्यावे....

म्हणजे आपोआप दीर्घ श्वसन होईल.

(चार अंक श्वास आत घेताना आणि ८ अंक बाहेर सोडताना)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ थकवा आला तर,

 पाणी, सरबत प्यावे, एखादे फळ खावे, सुकामेवा खावा.

 (असही रोजच्या आहारात हे असावेच)

*******************************

★ काही गोड खावे वाटले तर....

गुळाचे पदार्थ ...चिक्की खावी...

साखर शक्यतो वर्ज्य करावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ रोज कोणतेही साधेच सूप प्यावे.

*******************************

★ बैठे काम करत असाल तर

 एखाद दोन तासाने जागेवरून उठावे. 

एक फेरी मारून यावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ नैसर्गिक शारीरिक क्रिया अवरोधु नयेत.

*******************************

★ भूक लागली असे वाटले तर पाणी प्यावे. 

आणि 

शौचास जावे वाटले तर... लगेच जावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ रोज थोडे तरी 

आले, लसूण, कोथिंबीर, धने, जिरे, दालचिनी जेवणात असावी.

*******************************

★ विश्रांती घ्यावी वाटली तर लगेच घ्यावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ दिवसातून किमान एकदातरी  

आपल्या मनाबरोबर संवाद करावा.

*******************************

★ जमल्यास जिने चढ उतार करावे. जिने उलट चढावेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ तसेच चालताना उलट चालावे.

(थोडे तरी)

*******************************

★ संध्याकाळी जेवढे लवकर जेवता येईल तेवढे जेवावे.

यात १ भाग अन्न, १ भाग पाणी, तर एक भाग रिकामा ठेवावा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ दररोज एक तरी आवळा खावा.

सीझनमध्ये जसा आहे तसाच

आवळा सुपारी, आवळा मावा, 

आवळा ज्युस, आवळा सरबत

 किंवा आवळा पावडर दुधातून किंवा पाण्यातून.

*******************************

★ एक लिंबु.... पाण्यातून पिळून किंवा पदार्थावर पिळून.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ चहा कॉफी कमीतकमी प्यावी.

*******************************

✽ कोणत्याही गोष्टीला सातत्य हवे....

चार दिवस करून सोडून देऊ नये.

*******************************

संकलन....
हरी बोल.!

No comments:

Post a Comment