Saturday, 18 June 2016

छान सुरुवात .!!!!!


सुंदर सकाळ....

छान शांत थोडं थंड वातावरण.

बाहेर पडलो.

भवानी शंकर मंदिराचा दरवाजा बंद आहे.. 

तरी भगवान शंकर आहेत आत  !!!

मनानेच दर्शन घेतले, नमस्कार केला.

गायींना नमस्कार केला.
मनात एक विचार आला.  

आज जुनची १८ तारीख उजाडली आहे....

पाऊस?? 

पत्ता नाही.

कधी येणार पाऊस????

गेल्यावर्षी १९ तारखेला धूमधाम पाऊस कोसळत होता....

 रेल्वे विस्कळीत,

 जिकडे तिकडे पाणीच पाणी, 

हाय अलर्ट, 

भरतीच्या वेळी मुद्दाम बाहेर पडू नका.

आणि व्हाट्सअप वर तर....

काय काय मेसेज.....

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

 ये रे ये रे पावसा म्हटलं 

तर इतकं यायच?
काहीही हा पाऊस 

******************************** 

 हे इंद्र देवा ,

काल रात्री नळ चालू केलास तो बंद करायला विसरलास की काय ?

काहीही हा श्री 

 :<><><><><><><><><><><><><><><><>

जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, 
सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात
 तर अडचण व्हायला नको.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

Today in Mumbai

 WhatsApp   is only place where ppl working .....

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

मध्य रेल्वे ठप्प,

घरी बसावे गप्प...!

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

कोणीही घराबाहेर पडू नका

मुंबई आंघोळीला बसली आहे.

๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧

काय काय मेसेज येत होते!!!

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

असं म्हणतोय तो पर्यंत रिमझिम पाऊस पडू लागला..
जोर नव्हताच, पण तसे थेंब मोठे होते. 
मग एक छान आडोसा दिसला, बसायला पण मिळालं,
 मस्त पाऊस बघत बसलो.

 अगदी  थेंब खाली आला  कि  जमिनीवर पडून कस " पाण्याचं फुल " दिसतं,

 कि  

" खरंच  पैसा  झाला  मोठा"  असं वाटतं ???? 

मधेच समोर बघून किती वेळ पडेल याचा अंदाज घेत 
पडणारा   पाऊस,  येणारा गार वारा,  हलणारी, डोलणारी झाडे  बघत बसलो, 
दिवस छान उजाडत आहे,.... 
 तेवढ्यात पाऊस थांबला..
. पुन्हा चालायला सुरुवात केली.... 
आता तर दिवे पण बंद झाले... 

"सुंदर निळं आकाश, तसाच सुंदर उजेड " 

 आणि 

 हि सुंदरता या रस्त्यावर प्रतिबिंबित झाली आहे 

 झाडे डोलत आहेत
 दिव्यांचे खांब यांचे प्रतिबिंब दिसतंय.!
 लाटांचा आवाज येतोय!पाणी काळसर दिसतंय, 
बहुतेक काळ्या ढगांची छाया पडली आहे.
आता जिमखान्यापर्यंत आले.... 
 येथे सुंदर तांबडी माती आणि तयार केलेल्या लॉनवर छोटं गवत. 
अरे आपण मुंबईतच आहोत ना.!
चला आलंच कि स्टेशन. आज अजूनही पुढे जावं वाटत आहे पण....

थोड्यात गोडी म्हणतात ना....

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

आलीच कि रेल्वे.!
चर्नीरोड स्टेशन आलं आणि... 
पहाते तर एक पांढरा शुभ्र ससा .... 
मस्त मुक्त धावतोय..मन बालपणात गेलं....

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

ससा ससा दिसतो कसा,
कापूस पिंजून ठेवलाय जसा !!

"वाह....! सुंदर सकाळ..."

सुरुवात चांगली झाली कि सगळंच चांगलं.!

है ना.!!!

◇◇○○○◇◇○○◇◇○○○◇◇○○○◇◇○○○◇◇

No comments:

Post a Comment