Monday, 20 June 2016

योगा आणि बालपण......

आज जागतिक योगा दिवस!


तर ..... त्या निमित्ताने मन बालपणात गेले आणि ....

आम्हाला फक्त मैदानी खेळ, बैठे, कमी जागा
 कमीतकमी साहित्य लागते असे खेळ माहिती होते.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

आसने...असं प्रत्यक्ष माहित नव्हतं.

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

घरातील वडीलधारी म्हणत 
आता याची मुंज झाली कि सूर्यनमस्कार शिकवणार.!







मुलांना सूर्यनमस्कार घाला असं सांगत.
तर मुली हौशीने मंगळागौरीचे खेळ खेळत.
तसेच इतरही 
खेळ खेळले जायचे.....मुलं मुली मिळून. !!!!!

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

सुट्टीत दुपारच्या वेळी ....बैठे खेळ खेळत होतो....

**********************

पत्ते....

यात तर कित्ती खेळ खेळले जायचे.
 यातून न कळत स्मरणशक्ती वाढत असे. 
 अंदाज बांधले जायचे, 
एखाद्या खेळासाठी चार किंवा सहा भिडू हवे असतील तर 
 आणि एक कमी किंवा जास्त खेळाडू असेल तर ....
वेगळा, भिडू नसलेला खेळ खेळू किंवा
 एक जण आपण होऊन म्हणे तुम्ही खेळा मी थांबतो.
समंजसपणे खेळत असू.



~~~~~~~~~~~~~~

कॅरम... 

यात सुद्धा बोटांवर नियंत्रण,
 एकटं असल तरी खेळता येतं,
 कौशल्य संपादन करता येतं.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

सागरगोटे.....

 मुलींसाठी खास खेळ. कितीही जणी असल्या तरी चालत.
खेळात सागरगोटे हवेच असं नाही, बिट्टया किंवा लहान खडे चालतात.
यामध्ये 

हात आणि डोक्याचं काम! 

एकाच वेळी दोन्ही क्रिया एकदम व्हायला हव्यात.

तसंच बसण्याची पद्धत.... नीट बसलं कि छान खेळता येत.





••••••••••••••••••••••••••••••••••••••

जागा कमी किंवा पाऊस पडत असेल तर

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

कान गोष्टी 

हा मस्त खेळ खेळला जायचा....
यात गम्मत म्हणजे
 सांगितलेले वाक्य थोडे थोडे बदलत बदलत परत ते पहिल्यापाशी येत असे.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

×○×○ फुल्लीगोळा

कोणीही खेळू शकते.

**********************

 बिल्ला चप्पट  करून दोऱ्यात ओवून भिगरी फिरवणे. 

 

 

 

 

 

यात बोटांना छान व्यायाम आणि एकाग्रता होत असे. 

 ........    ...... ...... ...... ...... ...... ...... ..... ...... ... ..... ..   

टिकली मारून जावे...

हा पण एक मस्त खेळ
यात अंदाजाला महत्त्व होते
कोणी टिकली मारली असेल? 
याचा अंदाज बांधला जायचा.

 हा सांघिक खेळ.

□ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □

सापशिडी, ल्युडो... 

 

 

 

 

 

हे पण सगळ्या वयोगटांना खेळता येणारे खेळ..

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

नवा व्यापार...

.मला वाटतं
 बऱ्याच पिढ्यांनी हा खेळ खेळला असेल.

००००००००००००००००००००००००

शाळा शाळा.... 

यात शाळेतील शिक्षक 
कसे वागतात बोलतात ते घरात कळत असे.

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

डॉक्टर डॉक्टर...

 हे पण मुलांना आवडणारे खेळ.
♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

भातुकली...

.हा सुद्धा खूप खेळला जाणारा..
तिथेच मुलींना संसाराचे शिक्षण मिळे, 
भाजी आणायला जाणे, 
येऊन स्वयंपाक करणे,
 तेवढ्यात मैत्रीण आली तर तिच्या बरोबर गप्पा मारणे.

<><><><><><><><><>

तसाच एक खेळ

शिवाजी म्हणतो......

सांगणाऱ्याचे कसब असे
आणि ऐकणाऱ्याचे लक्ष असेल तर कोणी पटकन बाद होत नसे.

~•~~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

डोंगराला आग लागली पळा पळा ... 

आणि थांबा...STOP   
असं म्हणून बाकीचे स्तब्ध (statue)
उभे राहत. 
 म टिवल्या बावल्या करून खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न केला जात असे.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

तळ्यात मळ्यात....

मळ्यात,तळ्यात....तळ्यात,तळ्यात...

अस पटपट बोलून सावंगड्यांना बाद केले जाई.

«««»»» □ «««»»» □ «««»»» □ «««»»»

टिक्कर...

.यालाच काही जण प प पाणी म्हणत...
यात सुद्धा शरीराला व्यायाम घडत असे.
यातसुद्धा कित्ती वेगवेगळे खेळ!!!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पकडापकडी...
.यातील साखळी साखळी /जोडसाखळी हा खेळ मस्त होता..
 
๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

लंगडी..

.एका पायावर तोल सांभाळणे. सांघिक खेळ.
******************************

चोर पोलीस...

. मस्त खेळ
खूप धावाधाव, लापालपी!





=o==o==o==o==o==o==o==o==o==o==o=
अंगण मोठं असेल त्याला खांब असतील तर....

खांब खांब खांबोली....

||~||~||~||~||~||~||~||~||~||~||~||~||

 सूरपारंब्या

 छान व्यायाम 

:::::::::::::::::::::::::::::::::

हुतूतू...कबड्डी

 

 

 हे मैदानी खेळ
सहकार्याने खेळला जाणारा.!

००००००००००००००००००००००००

खोखो...

.उभा खोखो आणि
बैठा खोखो....
खूप मज्जा धावपळ करावा लागणारा खेळ.
_| ̄○  _| ̄○  _| ̄○_| ̄○  _| ̄○  _| ̄○_| ̄○ _| ̄○  _| ̄○_| ̄○
खुर्च्या असतील तर 

संगीत खुर्ची.

ŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏ

पासिंग द पार्सल..... 

यात बाद झालेल्याला शिक्षा देणे हे गमतीचे असे.

○◇○◇○◇○◇○◇○◇○◇○◇○◇○

आईच/मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं... 

 

 

 

 

 

यालाच रुमालटाकी अस म्हणत.
यात सुद्धा कौशल्य वापरून रुमाल कोणामागे टाकला
 ते कळणार नाही या पद्धतीने टाकावा लागतो.





.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

लपाछपी...

.यातीलच एक प्रकार डबा आइस पाइस.

यालाच गिनापी डब्बो असं म्हणतात.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

गोट्या, ढप्पर,

 यात सुद्धा अगदी लहान गोट्या थोड्या मोठ्या गोट्या,
 आणि पांढरे मोठे ढप्पर... 
कित्तीही वेळ खेळता येत असे. खूप प्रकाराने खेळत येतो..
गोट्या काचेच्या असल्याने सुंदर रंगात मिळतात.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

विटी दांडू..

.सुंदर विट्टी बनवून घ्यायची आणि मोकळ्या मैदानात खेळायचं.

टोलवलेली विट्टी झेलणे हे मोठे कसब असते.

 

 

 

 

 

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

भोवरा....

.भोवरा घुमवणे,

 तो जमिनीवरून हातात घेणे, 
किंवा हवेतल्या हवेत झेलणे...
त्याला नाडी गुंडाळणे हे कौशल्याचे काम आहे...

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

कांदाफोडी...

 

 

.हा असाच सुंदर व्यायाम घडवणारा खेळ. 
यात शरीराच्या कित्ती हालचाली होतात??

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

पाऊस पडला कि

 तार खुपसणी

 हा खेळ खेळला जायचा.

०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/

गाडा फिरवणे, 

 

 

 

हे सायकलचा टायर, चाक फिरवणे....

या साठी एक छोटी काठी  आणि गाडा एवढेच साहित्य लागते.
जर सायकलचे स्टीलचे चाक असेल तर मात्र जरा वाकवलेली तार हवी.
म्हणजे त्याला एकदा धक्का दिला कि
 ती तार त्यात अडकवून सावकाश पुढे पुढे नेता येते.
यातून सुद्धा balancing चे शिक्षण यातून मिळते.


००००००००००००००००००००००

लगोरी....

सांघिक खेळ, एकमेकांच्या साहाय्याने खेळला जातो... 
 दगड एकमेकांवर रचणे..
आणि हि रचना एका संघाने चेंडुने तोडायची 
आणि
 दुसऱ्या संघाने विरुद्ध संघाला चेंडू मारून बाद करण्याचा प्रयत्न करायचा.,
 व त्याच वेळी या संघाने लगोरी रचायची.





OOOOOOOOOOOOOOOOOO

आट्यापाट्या...

असाच मस्त खेळ...
काहीजण रस्त्यावरच आखून रात्रीच्या वेळी खेळत.

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

आबाधुबी.....

शरीराला मस्त व्यायाम घडतो.
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

कवड्या, काचापाणी, 

असेही खेळ खेळायचो.

**********************

चेंडू असेल तर...

 कॅच कॅच, टप्पा टप्पा., क्रिकॆट...

बादलीत चेंडू टाकणे...

●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●

पतंग उडवणे,

メメメメメメメメメ

आंधळी कोशिंबीर 

 

 

 

 

(डेंजर डेंजर)

メメメメメメメメメ

लंडन लंडन स्टेच्यु...

आणि स्तब्ध उभं राहायचं
स्तब्ध उभं राहिलेल्याला काही टिवल्या बावल्या करून त्याला बाद करायचं
(त्याची एकाग्रता विचलित करायची).

यात मुलं इतके छान  स्टेच्यू घेतात ना..

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

विषामृत... 

मस्त कल्पकतेचा थोडं धावायचा खेळ.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

एक रुमालाचा खेळ..

मध्ये गोलात रुमाल ठेवायचा 
समोरासमोर च्या संघातून एक एक खेळाडू येणार 
आणि तो रुमाल उचलण्याचा प्रयत्न करणार
मस्त खेळ आहे हा.









〆〆〆〆〆〆〆〆〆〆

तसं.... कोंबडा कोंबडा....

शक्तीचा खेळ...
खूप मज्जा यायची..






 पाणी घालणे 
 चतुराई एकाग्रता 





〆〆〆〆〆〆〆〆〆〆

असाच एक शक्तीचा पण सांघिक खेळ.....

रस्सीखेच....

*******************************

जिन्यावरून उड्या मारणे.

अगदी लहान मूल पहिल्या पायरीवरून उडी मारायला शिकते....
म मात्र थोडी मोठी झाली कि साहासने मुलं पाचव्या सहाव्या पायरीपर्यंत उड्या मारतात.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

तसच जिन्याचा खेळ 

घसरगुंडी...

 जिन्यावरून सरळ न उतरता जेथे हात धरतो तेथून घसरत खाली यायचं.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....


तर...असे अनेक मैदानी , बैठे खेळ खेळले जायचे

काही खेळासाठी तर काहीच साहित्य लागत नाही तर काही खेळासाठी अगदी सहज उपलब्ध साहित्य.
आणि प्रत्येकाकडे हवेच असे नाही.

यातून शारीरिक मानसिक, बौद्धिक वाढ होत असेच.

सांघिक भावना वाढीस लागे

एकमेकांना मदत करणे,

 समजून घेणे आपोआप होत असे.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

राम राई साई सुट्टयो

असं म्हणून ....

कोणावर राज्य ते ठरत असे

किंवा.... 

जास्तीची मेजॉरिटी

असं म्हणून कोणावर राज्य ते ठरत असे.

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆


सायकल चालवणे... 

तेव्हा स्वतःची सायकल नसायची
म कोणी भाड्याने घेतली तर सगळ्यांनी मिळून ती चालवायची

シ シ シ シ シ シ シ シン シ シ シ シ シ シ シ シ

तसं 

खाऊ म्हणजे लिमलेट रावळगाव गोळी 

 

 

 

 

म कोणाकडे असेल तर ती रुमालात गुंडाळून थोडी मैत्रिणीला द्यायची....

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

तसेच....

कोण म्हणतं टक्का दिला???

नृत्य करणे/बसवणे, नाटुकले बसवणे.

भेंड्या खेळणे,

〆〆〆〆〆〆〆〆〆〆

गोष्टी सांगणे,

कापूस कोंड्याची गोष्ट,

एक चिमणी आली दाणा खाल्ला पाणी प्याली भुर्रकन उडून गेली....
अशीच दुसरी, तिसरी क्रमाने चिमण्या येत राहायच्या (या न संपणाऱ्या गोष्टी)
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

नाव गाव फळ फुल खेळणे,

हे आणि असे अनेक खेळ सहज खेळले जायचे.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

त्यातूनही कितीतरी गोष्टी आपोआप घडत होत्या.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

बालपण.... किती सुंदर

कित्ती खेळ खेळायचो....
पण नंतर मात्र कामाच्या
व्यापात ते मागे पडतात 
आणि

 पुढे पुढे...

येत नाही जमत नाही.
आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने आपोआप होणारा योगा आठवला.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

समारणशक्ती वाढ, कल्पकता, साहस, शारीरिक व्यायाम, सहकार्य करणे,

सांघिक भावना  निर्माण होणे, खेळला अनुसरून निर्णय घेणे.

No comments:

Post a Comment