एक दिवस मनात आलं...
आपल्याच आईबद्दल लिहावं
आणि बाकीच्यांनाही सांगावं
तुम्ही पण स्वतःच्या आईबद्दल लिहा...
आपल्याच आईबद्दल लिहावं
आणि बाकीच्यांनाही सांगावं
तुम्ही पण स्वतःच्या आईबद्दल लिहा...
माझी आई.....
लिहा सावकाश जमेल तसं.!
जमेल तेव्हा......
एक कृतज्ञता म्हणून.!
तेव्हा कधी आईला तिच्याबद्दल सांगितलं असेल का????
मनात असेल ते लिहुया.... स्वतःसाठी तरी....
जमेल तेव्हा......
एक कृतज्ञता म्हणून.!
तेव्हा कधी आईला तिच्याबद्दल सांगितलं असेल का????
मनात असेल ते लिहुया.... स्वतःसाठी तरी....
आई.... एक घरातलं गाव,
एक ग्रंथ....
लिहू तितकं थोडं.
किती आठवणी,
किती प्रसंग....
खूप जणांच्या आईबद्दल खुप वाचलंय ऐकलंय....
आता आपल्याच आईविषयी.....
लिहितांना वाटतंय....
खरंच होईल पुस्तक आपल्या आईवर....
लिहू तितकं थोडं.
किती आठवणी,
किती प्रसंग....
खूप जणांच्या आईबद्दल खुप वाचलंय ऐकलंय....
आता आपल्याच आईविषयी.....
लिहितांना वाटतंय....
खरंच होईल पुस्तक आपल्या आईवर....
आई, आईच असते... कुणाची का असेना.....
प्रत्येक आईमधे आपली आई असतेच...!
~~~~~~~~~~~~~~~~~
प्रत्येक आईमधे आपली आई असतेच...!
~~~~~~~~~~~~~~~~~
आई....
आभाळातील ईश्वर...
घराघरातील ईश्वर.!
आई....तिचं सगळंच सुंदर.!
सगळ्या वयोगटाबरोबर आईच छान जमायचं.
लहानात लहान आणि मोठ्यांमध्ये मोठी होऊन जायची.
तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा पुतणे, भाचरं... यांच्यात रहावं की.... मोठ्यांच्यात रहावं.??
कारण लहानांना वाटायचं की हिने आपल्याबरोबर खेळावं.!
तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा पुतणे, भाचरं... यांच्यात रहावं की.... मोठ्यांच्यात रहावं.??
कारण लहानांना वाटायचं की हिने आपल्याबरोबर खेळावं.!
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
सतत कामात राहणं तिला आवडत होतं.
सतत आला गेला पै पाहुणा..
त्याचं इतकं आनंदात करत होती....
त्याचं इतकं आनंदात करत होती....
"अतिथी देवो भव"
म्हणजे काय????
हे तिच्याकडूनच शिकलो..
हे तिच्याकडूनच शिकलो..
कष्ट, काम करतांना आई छान गाणी म्हणायची....
त्यामुळे ती कधीच त्रासिक दिसत नव्हती. होता होईतो सगळं अंगावर काढायची.
—_—_—_—_—_—_—_—_—_—_—
कितीही आणि कोणताहि त्रास असेल तरी बोलायची नाही
ती म्हणायची....
ती म्हणायची....
" कामावे तो सामावे."
[•]. [•]. [•]. [•]. [•]. [•]. [•]. [•] [•]. [•] [•]
आलेल्याचं स्वागत कसं करावं....
हे तिच्याकडून शिकावं.!
आलेल्याला पुन्हा पुन्हा यावसं वाटे.
तो म्हणे.... तुमच्याकडे यावंस वाटतं.
विशेषतः जे गावाकडून मुंबईत नोकरी निमित्ताने येत त्यांना ते त्यांच्याच घरी आहेत असं वाटे.!
आई गावाला पण राहिली होती आणि मुंबईत पण
(तिच्या लहानपणी)
म्हणून कुठलंहि काम तिला येतंच होतं.
अगदी शेणगोठा सुद्धा, शेतीचं कामहि येत होतं.
विशेषतः जे गावाकडून मुंबईत नोकरी निमित्ताने येत त्यांना ते त्यांच्याच घरी आहेत असं वाटे.!
आई गावाला पण राहिली होती आणि मुंबईत पण
(तिच्या लहानपणी)
म्हणून कुठलंहि काम तिला येतंच होतं.
अगदी शेणगोठा सुद्धा, शेतीचं कामहि येत होतं.
/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\/\ /
पाककलेत तर ती निपुण होतीच.
ती जो पदार्थ करे तो उत्तमच असे.
ती म्हणे...
स्वयंपाक करतांना सगळं लक्ष तिथेच हवं.
तो चांगल्या मनाने, प्रेमाने करावा.
म्हणजे जेवणारा, खाणारा समाधानी होतो.
आईने आमच्या मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या फराळाला बोलावले तरी
ताटाभोवती रांगोळी, बैठका, उदबत्त्या लावणे, असा थाटमाट असायचा.
चौपाटीवर जरी गेलो तरी बरोबर भेळेचं सामान, पाणी, ते पिण्यासाठी भांडी..........
सगळी जय्यत तयारी असे.
कोणतेही काम ती सहज करत असल्याने ते तिने कधी केले हे समजत सुद्धा नसे.
कोणतेही काम ती सहज करत असल्याने ते तिने कधी केले हे समजत सुद्धा नसे.
तू जरा मदत कर असे ती कोणालाही सांगत नसे.
{•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•}
सौंदर्याला गरीबीची किनार होती.
शिक्षण कमी होतं, त्यामुळे नोकरी करता आली नाही,
गाता गळा होता पण... गाणं
शिकली नव्हती ही खंत होती.
पण म्हण म्हटलं की छान म्हणत असे.
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
स्वतःला शिकता आलं नाही तरी
धाकट्या भावंडांना शिकायला मिळालं
पाहिजे असा आग्रह वडिलांकडे धरला,
आणि त्यांना शिकायला मिळालं याचं खुप
समाधान होतं.
शाळेत असतांना... तोंडी गणित सोडवण्यात तिचा पहिला नंबर असायचा.
आणि लेखी गणित सोडवतांना शिक्षक, गणित घालत असतांनाच "हिचं" उत्तर तयार असे.
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
तिच्याकडे पैसे नसले तरी कोणाला कळत नसे, की हिच्याकडे पैसे नाहीत.
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::
स्वच्छता-टापटीप याची खुपच आवड होती.
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::
रोजचे कपडे तर छान धूत असे तरीही...
आहेत तेच कपडे सणवार आला की नव्यासारखे होत.
पांढरे कपडे तर नीळ टिनोपॉल घालून नवे होत आणि त्याला स्टार्च इस्त्री केली की...
आहेत तेच कपडे सणवार आला की नव्यासारखे होत.
पांढरे कपडे तर नीळ टिनोपॉल घालून नवे होत आणि त्याला स्टार्च इस्त्री केली की...
क्या बात है.!
०००००००००००००००००००००००
रेडिओ ऐकयला खुप आवडत होता.
रेडिओवरील आवडते गाणे लिहून घेण्यासाठी
रेडिओजवळच डायरी व पेन्सिल ठेवलेली असे.
(पेन्सिलला कधी टोक
नाही असं कधीच होत नसे.)
गाणं लागलं की लगेच ते लिहून घेई आणि ते म्हणत असे.
गाणं लागलं की लगेच ते लिहून घेई आणि ते म्हणत असे.
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
आजुबाजुला कष्टकरी बायका असत
त्यांच्या मुलांना अभ्यास शिकवणं,
त्या बायकांना चातुर्मासात कथा कहाण्या वाचून दाखवणं,
आमच्या मित्रमैत्रिणींना स्तोत्र पाढे शिकवणं....
आमच्या मित्रमैत्रिणींना स्तोत्र पाढे शिकवणं....
←→←→←→←→←→←→←→
कोणाला सिनेमाची स्टोरी सांगणं....
ती ते सांगतांना कोणी मधेच उठत नसे...
इतकं तल्लीन होऊन जात. ती कला तिच्याकडे मस्त होती.
एक ना दोन.... अनेक गोष्टी ती सहज करत असे.
<><><><><><><><><><><><><><>
ती म्हणत असे घरातील वस्तू अंधारात सुद्धा चटकन सापडायला हव्यात.
अचानक दिवे गेले... तर मेणबत्ती-काडेपेटी पटकन मिळायला हवी.
पेन-पेन्सिल, कोरा कागद,
कात्री-सुरी, गोंद, यांची ठरलेली जागा ,
त्या जागेवरच वस्तू मिळा़यला हव्यात.
नाही हो सापडत असं उत्तर येता कामा नये.
मुलांच्या घरात सगळं जागेवर असलं पाहिजे.
तसंच कपडे वाळत घालतांना त्या त्या जागेवर घातले तर
अंधारात सुद्धा काढता आले पाहिजेत.!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°
ती म्हणायची मी असं हात धरुन काहीच शिकवणार नाही.
तुम्ही बघून बघून शिका.
------×××-----×××----×××---
तिचं अक्षर खुप छान होतं.
आणि आमचं अक्षर छान व्हावं म्हणून ती अक्षरं घोटून घेई.
आमच्या कविता पाठ व्हाव्यात म्हणून ती स्वतः त्या कविता म्हणत असे.!
आमच्या कविता पाठ व्हाव्यात म्हणून ती स्वतः त्या कविता म्हणत असे.!
म्हणजे आमच्या त्या आपोआपच पाठ होत.
तिने माझ्या लहान भावाला शिकवलेली कविता माझी अजूनही पाठ आहे...
राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या॥१॥
राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे,
ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या॥२॥
ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या,
त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला,
?मज्जाव? शब्द आला
भितीनं यावयाला,
या झोपडीत माझ्या॥४॥
भितीनं यावयाला,
या झोपडीत माझ्या॥४॥
महाली मऊ बिछाने,
कंदील शामदाने आम्हा जमीन माने,
या झोपडीत माझ्या॥५॥
कंदील शामदाने आम्हा जमीन माने,
या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या,
जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा,
या झोपडीत माझ्या॥६॥
जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा,
या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्यं माझे,
देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
----------- संत तुकडोजी महाराज.
•••••••••••••••••••••••••••••• ••••
नात्यात ती सगळ्यांची आवडती होती.
लांबचे, जवळचे सगळे आवर्जून येत असत.
~~~~~~~~~~~~~~~~~~
नात्यात ती सगळ्यांची आवडती होती.
लांबचे, जवळचे सगळे आवर्जून येत असत.
~~~~~~~~~~~~~~~~~~
राजकारण....
पक्षाचं काम करतांना...
पडेल ते काम आनंदाने करत असे.
म मेळावा आहे म्हणून
१०० पोळ्या असोत,
किंवा पोस्टर्स चिकटवायची म्हणून पाच किलो गव्हाची कणिक
असो......
किंवा घरीच मिटिंग असेल तर चहा करणं असो....
तो चहा सुद्धा जसा ज्याला आवडतो तसा त्याला गरम गरम मिळत असे..
किंवा घरीच मिटिंग असेल तर चहा करणं असो....
तो चहा सुद्धा जसा ज्याला आवडतो तसा त्याला गरम गरम मिळत असे..
सगळंच देखणं, नीटनेटकं करण्याकडे आवड होती.
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
तिचा जन्मच मुळी
♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡
♡♡ १४ फेब्रुवारीचा.....
व्हॅलेंटाइन डे चा.... ღღ
त्यामुळे सगळंच प्रेमाचं.....
(त्यावेळी असं काही आम्हाला माहित नव्हतं)
(त्यावेळी असं काही आम्हाला माहित नव्हतं)
︶ ︶ ︶ ︶ ︶ ︶
तसं आमचा वाढदिवस असला की ती विचारे.... काय आवडेल तुला????
त्याप्रमाणेच ती ते पदार्थ करत असे.
देवाचा नेवैद्य... केळवण, डोहाळजेवण
त्याप्रमाणेच ती ते पदार्थ करत असे.
देवाचा नेवैद्य... केळवण, डोहाळजेवण
या वेळी ती इतकं सुंदर पदार्थ करून ते ताट तेवढंच सुंदर वाढत असे.
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
घरात पाहुणे आले किंवा काही कार्य असेल तर... सर्व कामांची यादी तयार असे,
सकाळी लवकर उठुन स्वतःचं आटपून ती कामाला सुरुवात करे.
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
घरात पाहुणे आले किंवा काही कार्य असेल तर... सर्व कामांची यादी तयार असे,
सकाळी लवकर उठुन स्वतःचं आटपून ती कामाला सुरुवात करे.
आणि हे करत असतांना झोपलेल्या मंडळींना त्रास होणार नाही याची काळजी घेई.
तिच्याकडे सौंदर्यदृष्टी होती.
तिला सगळंच छान दिसे.
कुणी केव्हाही आले तरी ती कधी त्रासिक होत नसे.
स्वतःचे शिक्षण कमी त्यामुळे मुलांनी चांगले शिकावे, म्हणून ती माहिती गोळा करे.
तसंच तिला मासिकातून, पेपरातून कात्रणं गोळा करण्याचा छंद होता.
विणकाम, भरतकाम खूपच आवडत होतं.
तिच्याकडे सौंदर्यदृष्टी होती.
तिला सगळंच छान दिसे.
कुणी केव्हाही आले तरी ती कधी त्रासिक होत नसे.
स्वतःचे शिक्षण कमी त्यामुळे मुलांनी चांगले शिकावे, म्हणून ती माहिती गोळा करे.
तसंच तिला मासिकातून, पेपरातून कात्रणं गोळा करण्याचा छंद होता.
विणकाम, भरतकाम खूपच आवडत होतं.
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
आई सुरेख रांगोळी काढत असे.
रंग ठेवण्यासाठी छान डबा आणि प्रत्येक रंगासाठी चमचा असायचा,
रंगांच्या पुड्या-पुड्या केलेल्या आवडत नसत.
रांगोळी काढून झाली की ती आजुबाजु स्वच्छ करत असे.
रांगोळी काढून झाली की ती आजुबाजु स्वच्छ करत असे.
रांगोळी वर झिग टाकत असे.
अशी चमचम करणारी रांगोळी अजुनच छान होऊन जाई.
♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡
ती कधीही चहा पित नसे.
पण कोणालाहि चहा अगदी आनंदाने करून देत असे.
तिला कॉफी आवडत होती,
तिला कॉफी आवडत होती,
म्हणून ती अनेकवेळा पित नसे.
♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡ ♡♡♡
त्या त्या प्रसंगानुसार कपडे परीधान करत असे.
जातपात तर ती कधीही मानत नसे.
सर्वांच्यात मिळूनमिसळून राहत असे.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
वाचनाची खूपच आवड होती.
दररोजचे वर्तमानपत्र तर ती वाचतच असे.
पण मासिकं, कथा कादंबऱ्या वाचत असे.
आणि वाचलेलं ती उत्तम तऱ्हेने इतरांना सांगत असे.
आणि वाचलेलं ती उत्तम तऱ्हेने इतरांना सांगत असे.
वाचून दाखवणं ही कला तिच्याजवळ छान होती.
साठी झाल्यावर सुद्धा ती इतकी सुंदर दिसत असे की ज्यांनी तिला पहिल्यांदाच
बघितले....
ते म्हणत की तुमची आई तिच्या तरूणपणी ती किती सुंदर दिसत असेल.!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
कामाचा प्रचंड उरक होता, आता दमले, पाय दुखतात,
कंबर दुखते असं ती कधीच म्हणत नसे.
सर्वच ठिकाणी मस्त सामावून जात असे.
सर्वच ठिकाणी मस्त सामावून जात असे.
नणंद भावजय हे नातं कसं प्रेमाचं असतं
हे मी तिच्याकडे बघून शिकले असेन,
प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध होते नात्यात.
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
घर नेहमीच स्वच्छ टापटीप असे.
तरीही संध्याकाळी....
मधल्यावेळंचं खाणं तयार करून ती स्वतः हातपायतोंड धुवुन साडी सारखी करे.
म्हणजे ऑफिसमधून येणाऱ्यांना कसं प्रसन्न वाटतं. घरी यावसं वाटतं
आणि आल्या आल्या आपल्याला गप्पांना वेळ मिळतो.
तरीही संध्याकाळी....
मधल्यावेळंचं खाणं तयार करून ती स्वतः हातपायतोंड धुवुन साडी सारखी करे.
म्हणजे ऑफिसमधून येणाऱ्यांना कसं प्रसन्न वाटतं. घरी यावसं वाटतं
आणि आल्या आल्या आपल्याला गप्पांना वेळ मिळतो.
तसंच ऑफिसमधून आलेल्यांना
कोणतीही अडचण कटकट सांगत नसे,
तसंच ऑफिसमधे जातांना कुठलीही मागणी, किंवा
त्रास होणारा शब्द .... कधीच उच्चारत नसे.
आई म्हणायची....
आई म्हणायची....
बाहेर जाणाऱ्या माणसांचं डोकं शांत असेल,
तो प्रसन्न असेल तर.... त्याचं ऑफिसमधे काम चांगलं होतं.
۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞
तसंच आई देवाजवळ दिवा लावला की
तिच्या गोड गळ्याने शुभंकरोती... बालोपासना फार छान म्हणे,
कधीतरी शुभंकरोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा हे गाणं म्हणत असे.
कधीतरी शुभंकरोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा हे गाणं म्हणत असे.
۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞
तिची आई सुद्धा अशीच..
सुखी समाधानी
रामभक्त
चहाभक्त.....
कधीही ती रडगाणं गाताना दिसली नाही.
सुखी समाधानी
रामभक्त
चहाभक्त.....
कधीही ती रडगाणं गाताना दिसली नाही.
No comments:
Post a Comment