Sunday, 17 April 2016

चंद्राची शीतलता, थंड वारे


आज रविवार...!

चला वेगळं करू काहीतरी...
मॉर्निंग वॉकच्या ऐवजी संध्याकाळी जाऊ... फिरायला...
 रोज सुर्योदय म आज सुर्यास्त बघायला जाऊ.
सुर्यास्त... ६.५५
घरातून निघतांना १० मिनिटे उशीर झाला. ६.४० ला बाहेर पडलो. 
फाटकातून बाहेर पडतांना चंद्रदर्शन...
आज एकादशी.!
चंद्राकडे बघतांना एक विचार आला.... 
चंद्र डाग स्वतःकडे ठेवतो आणि शीतल प्रकाश देतो. 
सकाळी बाहेर पडतांना जशा थंड वाऱ्याच्या झुळका येतात
 तसंच आता संध्याकाळी थंड वारे वाहत आहेत.

० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०

    दिवसभर उकाड्याने हैराण झालेले लोक 
आज सुट्टीमुळे समुद्रावर थंड, मोकळ्या हवेत निघालेत.
 माणसांची, वाहनाची गर्दी आहे
 फेरीवाले...फुगेवाला, भिरभिरंवाला, पॉपकॉर्न, कुल्फी.....
आणि दुकानातून बर्फाचे गोळे, भेळपुरी-पाणीपुरी... आणि काय काय??? 







काय मिळत नाही असा प्रश्न पडावा.
पण आम्ही मात्र नारळपाणी घेतलं.! 
चौपाटी आणि भेळपुरी, 

पण समुद्र म्हणजे नारळपाणी.! 

आणि उन्हाळा म्हणजे बर्फाचा गोळा, आईस्क्रिम.!
हे मात्र बाहेर फिरायला गेल्यावर.!
घरात असलो की,
लिंबू-कोकम-आवळा सरबत,  लस्सी, ......
छान थंड वाऱ्याचा आनंद घेत चालण्याचा पण आनंद घेत होतो..

.ツ....  .ツ.....  ツ....   .ツ....

बालभवनची बाग सुर्योदयाला उघडते आणि सुर्यास्त झाला की बंद होते, 
 म्हणून तेथे गर्दी नाही.
ही बाग स्त्रिया व बारा वर्षांखालील मुलांसाठी आहे
सुर्यास्त तर केव्हाच झाला होता... आम्हाला मात्र  सुर्यास्त दिसला नाही.
रेल्वेस्टेशनला तर खुप गर्दी होती.

∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞

आमच्याकडे अजुनही आठवडी बाजार असतो.. 

रविवारी..!

आणि बऱ्याच वस्तू या बाजारात बघायला मिळतात.
 एरव्ही सर्वकाही मिळतंच...
 पण गावच्या सारखा आठवडी बाजार भर मुंबईत भरतो याची मज्जाच वाटते. 
आणि लोक सुद्धा आवर्जुन खरेदी करत असतात.
~~~~~~~~~~~~~~
चौपाटीकडे जातांना चाफा...
 गुच्छागुच्छांनी दिसला, 
उद्या यातीलच काही फुलं रस्त्यावर पडलेली दिसतील.

पण आत्ता मात्र ही फुलं बघतांना एकदम प्रसन्न वाटतंय.!

❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀

 

 

 

1 comment: