Tuesday, 5 April 2016

अप्रतिम सुर्यदर्शन...आता उद्या एक वर्ष होईल.


५एप्रिल २०१५..

अगं आज सकाळी फिरायला गेले तर चौपाटीवर मस्त वातावरण!
 सळसळती तरूणाई रंगीबेरंगी कपड्यांमधे कसरती करत होती
     मग पुढे मरीन ड्राईव्हला सूर्य दर्शन ...... अप्रतिम...
जणू चंद्रच. मस्त बघत रहावा असा देखणे दृष्य....!
नजरेत साठवुन ठेवले.
परवाचे सूर्यदर्शन आणि आजचे किती निराळे!!!!!
परवा तर आकाशात कोणीतरी कंदील लावला आहे असे वाटत होते.
रंग लाल पण नजरेला सुसह्य लोभस पुनः पुनः पाहत रहावा असा......
पण..... हे दृश्य काही क्षणासाठीच आणि त्याच वेळी बघायला मिळेल असे 
नंतर मात्र सूर्य प्रखर होत जातो.
     आता ना एक छंदच लागलाय आज कसा असेल सूर्योदय ?
मस्त enjoy करते

MORNING walk.....

********************************

त्या दिवशीच्या काही प्रतिक्रिया....

********************************

००••००••००••००••००••००••००••००

काकू काय मस्त लिहिलं आहे. ..
क्या बात है...वा वा वा मस्त. ..
काही लोक फक्त प्रभात फेरी म्हणून जातात
 पण तुम्ही निरीक्षक बनून केलेलं स्थलवर्णन अतिशय सुंदर आहे. ..

********************************

रेखा, अप्रतिम अनुभव.
मी स्वतःच बघितल्यासारखे वाटत आहे.  
इतके हुबेहुब वर्णन आहे.

<><><><><><><><><><><><><>

सुंदर लिहिलेस,
असचं अनुभवांना शब्दबद्ध कर.

********************************

मस्तच.!
--------------------------------------------------
आणि मग लिहायला लागले.

आता उद्या एक वर्ष होईल.

ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़

No comments:

Post a Comment