Saturday, 16 April 2016

ताजं हिरवं गवत


चर्नीरोड स्टेशनजवळच एक गाय वासरू बांधलेलं बघते, लोक चारा घालतात.
छान हिरवा चारा असतो.
रोज ते गायवासरू स्टेशनजवळ बांधलेलं बघते
गाय→ काळीभोर, शेपटीचे केस काळेभोर, अंगावर कुठे कुठे पांढरे ठिपके.! गोमाता
पाडा, गोऱ्हा →तिच्यासारखाच... फक्त शेपटीचे केस पांढरे.!
      तीनचार दिवस मी जरा लवकर जात होते फिरायला...
हे वासरू... पाडा, गोऱ्हा... आहे तो... असेल दोनतीन महिन्याचा.!
त्या मायलेकराला एकत्र बांधतात. 
पहिल्या दिवशी कळलं नाही की का एकत्र बांधलंय????
म्हणजे चारा घालतो तिथे सुद्धा एकत्र बांधतात.
दिवस पहिला.... ते गायवासरू मजेत डिव्हायडर मधे असलेलं 
ताजं छोटं छोटं असलेलं गवत खात होते.

* * * * * * * * * * * ********** * * * * * * * * * * *

हे गवत हिरवं असतं, फुलं छान फुललेली असतात कारण टँकरने पाणी घातलं जातं.!

* * * * * * * * * * * ********** * * * * * * * * * * *

दिवस दुसरा.... ते त्या गवताच्या दिशेने जात होते. 
आणि मागून तो माणूस ( डोक्यावर गवताचा भारा घेऊन)
 त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत होता.
 पण तो पाडा मात्र पुन्हा पुन्हा त्या गवताच्या दिशेने जाण्याचा धावून धावून प्रयत्न करत होता.
 याचा मात्र त्या गाईला एकत्र बांधलेलं असल्यामुळे त्रास होत होता.....
 पण ती माऊली आपल्या पाड्यासाठी,गोऱ्ह्यासाठी तो त्रास सहन करत होती....
होता होता त्यांची बांधण्याची जागा आली मात्र....
ते गायवासरू शांतपणे त्या जागी जाऊन उभे राहीले.

:: :: :: :: :: :: :: :: :: :: ::::::::::::::::::: :: :: :: :: :: :: :: :: :: ::

प्राण्यांना सर्व काही कळतं.

ताजे गवत, नेहमीची जागा, हटकलं की त्या बाजुला जायचं नाही....
आई समजुतदार पण मुल खट्याळ....

(खट्याळ असल्यामुळेच बांधतात बहुतेक एकत्र) अजुनही बरंच काही...!

:: :: :: :: :: :: :: :: :: :: ::::::::::::::::::: :: :: :: :: :: :: :: :: :: ::

No comments:

Post a Comment