Monday, 26 October 2015

आठवणीतल्या कोजागिरी !!

 कोजागिरी !!

बालपणातला खुप मजेचा, सगळे एकत्र जमून चौपाटीवर खेळण्याचा दिवस
      आईची तयारी चार दिवस अगोदरच सुरू व्हायची,
 आम्हा पाचही जणांचे (आई, अण्णा, आम्ही तिघं भावंडं) पांढरे कपडे स्वच्छ धुवुन नीळ-स्टार्च करून धुवायचे मग इस्त्री करायची.
त्यानंतर बाजारातून भेळेचं सामान आणायचं, जोडीला भुईमुगाच्या शेंगा, काकड्या घेऊन यायचं..... अशी जोरदार तयारी आईची सुरू व्हायची. सगळं ती एकटीच करायची. आम्ही भावंडं लहान होतो ना....
    आम्ही पंचवीसजण तरी असायचो, चौपाटीवर ठरलेली जागा पकडायची, मग ऑफिसमधून येणारे परस्पर चौपाटीवर यायचे.
(रुमाल टाकी)-आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. उभा खो-खो, पकडा पकडी
यात सुद्धा साखळी-साखळी असे खेळ सगळे मिळून खेळायचो,

मग भेळ खाण्याचा कार्यक्रम, तेवढ्यातच बाकीचे उकडलेल्या शेंगा, काकड्या खाण्याचा कार्यक्रम व्हायचा, खेळतांना सुद्धा तहान लागली तर काकडी, लिमलेटच्या गोळ्या असं चालूच असायचं.
या सगळ्यांना पुरेल एवढं पाणी, पाण्याची भांडी सगळं बरोबरच असायचं.
 प्रत्येकजण खेळीमेळीच्या वातावरणात कोजागिरी साजरी करायचं. 
 मग दमून भागून, बसलो की गाण्याच्या भेंड्या!!!! मज्जाच मज्जा यायची.
 या सर्व खेळात वय वर्ष ६ पासून ते ४० पर्यंतचे सगळेजण असायचो.
मग सगळे घरी यायचो
(घर एका खोलीचंच होतं)
सगळे जागा होईल तसे बसायचे. थोडी गॅलरी होती.
आईने अगोदरच तयार केलेलं मसाला दूध 
जे घराच्या खिडकीतून येणाऱ्या  चांदण्यात ठेवलेलं असायचं 
ते एकत्र बसून प्यायलं जायचं तो पर्यंत पहाट व्हायची, 
मग सगळे आनंदाचा ठेवा घरी घेऊन जायचे.
सगळे नातेवाईक, आमचे मित्र मैत्रिणी मिळून
चांदण्यात चौपाटीला जाणं,
चांदण्यात खेळणं,
 चांदण्यात बसून खाणं, 
एकत्र गप्पा,
 गाण्याच्या भेंड्या,
 मग चांदण्यात ठेवलेलं दुग्धपान

अशा लहानपणच्या आठवणीतल्या कोजागिरी पौर्णिमा…!!!!!

 

                  

 

No comments:

Post a Comment