Thursday, 22 October 2015

चहाची टपरी....


जीवनातला अविभाज्य घटक,

चहाची टपरी!!!
     सकाळी सकाळी या टपरीवर खूप गर्दी असते. टपरीवरचा चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते.
कडकपाव, बन पाव, मस्का पाव,
खारी बिस्किट्स
नानकटाई→ ही जरा वेगळी दिसते बरं का.! हे तर मिळतंच पण .....
चहा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारात!!!
  चहा- कडकमिठा, उकाळा, दुधपाक, मसाला चहा, चालू चहा, रजवाडी,स्पेशल चहा, पानी कम.
..
  आता त्यातसुद्धा.... कटींग, फुल... 
चहावाला हे सगळे चहा मजेत, आनंदाने बनवत असतो, 
लोकसुद्धा गप्पाटप्पा मारत मस्त मजेत चहा पितात..... कुठलाही विषय असु शकतो गप्पांचा....
आणि आपापल्या कामाला जातात.
        हा चहासुद्धा काचेच्या ग्लासमधुन,
        प्लास्टिकच्या पट्कन गळेल अशा ग्लासमधुन (कटिंग चहा)
        स्टीलची वाटी आणि त्यात छोटं भांडं उपडं असाही चहा मिळतो.
  साधारण चहा आर्डरचा असेल तर असा चहा मिळतो, याचा फायदा म्हणजे हा चहा दोघेजण पिऊ शकतात.
          तसंच काही टपरीवर स्टीलचे स्पेशल ग्लास जे बाहेरून मोठे पण आतून लहान ग्लास....असतात त्यातून मिळतो. त्यामुळे हात मात्र भाजत नाही.
         तर दुकानादुकानातून ऑर्डर केलेला चहा किटलीतून येतो , गरमागरम असा चहा असतो,
 काचेच्या ग्लासमधे असेल तर तो पटकन हातात धरता येत नाही.....
तर असा हा चहा स्वस्त, पटकन मिळणारा, उभ्याने पिता येतो.
(बसायची सोय नसते.)
येथे नेहमी ठरलेल्या वेळी ठरलेले लोक येतात. जर एखाद्या दिवशी एखादा आला नाही तर त्याची अगदी आपुलकीने, नातेवाईक करतील अशी चौकशी हा टपरीवाला करतो.
काही जणांची खाते वही असते महिन्याच्या महिन्याला पैसे घेतात. ही पण सोय असते.
     पुर्वी लोक इराण्याकडे जाऊन मस्का पाव चहा पित असत याचे किस्से मी ऐकले आहेत.
थंडी-पावसाच्या दिवसात रेल्वेने येणारे जाणारे लोक धावत पळत टपरीकडे धाव घेतात.
     रात्रपाळी करून आलेले, आणि सकाळी कामावर जाणारे यांची मोठीच सोय या टपरीमुळे होते.
आणि चहा टेस्टी आणि प्रत्येकाला हवा तसा बनत असतो
त्याचा रंग सुद्धा खुप छान दिसतो
पटकन आपण म्हणतो मला वाटलंच चहा मस्त असणार!!!
(एक गंमत, आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि चहा समोरच्याने ऑर्डर केला आणि तो बऱ्याच वेळात आला नाही तर गमतीत विचारतात....
काय रे, अण्णाचा चहा मागवला आहेस की नानाचा????
अण्णा म्हणजे .... चहा आण!
आणि नाना म्हणजे चहा आणायचा नाही!)
चहाबद्दल बरंच काही लिहिता येईल
★ लिहू तितकं थोडं

•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•

No comments:

Post a Comment