भेळवाल्याकडे आपण भेळ खात असतांना ...
. सातआठ वर्षाची मुलं: भाभी भेल दो ना????
आपण म्हणतो ठीक आहे भेळ घेऊन देतो....
आपण म्हणतो ठीक आहे भेळ घेऊन देतो....
तर त्यांचे आईवडील इतर भावंडे थोडी
दूर असतात,
तिकडे ही मुलं भेळ घेऊन जातात सगळे मिळून खातात,
पुन्हा ही मुलं
भेळवाल्याकडे हजर होतात,
नविन व्यक्तीकडे भेळ मागायला.
असंच आइस्क्रिम, सँडविच, डोसा, वडापाव गाडीवर.....
काहीजण कोल्डड्रिंक, उसाचा रस मागणारेही आहेत.
आता भाजीगल्लीत एक बाई तेल दे दो, आटा दे दो, चावल दे दो, दाल दे दो असं मागत असते,
वेगवेगळ्या दुकानांसमोर.
रेल्वे स्टेशनवर तर ....
विरारचं तिकिट काढून द्या,
कल्याणचं
तिकिट काढून द्या, एक चहा पाजा ना,
बिसलेरी पाण्याची बाटली घेऊन द्या असेही
मागणारे लोक भेटतात.
आपणही म्हणतो की ठीक आहे....
पैसे नाही ना मागत, खायलाच मागत आहेत..... आणि आपण ते घेऊन देतो...
तर तुम्हालासुद्धा असे आगळे वेगळे लोक भेटले असतील ...
सांगा मग .....
तर तुम्हालासुद्धा असे आगळे वेगळे लोक भेटले असतील ...
सांगा मग .....
जसं हे मागणारे....तसं देणाऱ्यांबद्दल.....
काहीजण पार्टी करतात
हॉटेलमधील मागवलेला पॅक शिल्लक राहिला,
हॉटेलमधील मागवलेला पॅक शिल्लक राहिला,
तो जसाच्या तसा राहिला तर तो कोणाला
देऊ केला तर...
ये कब का है? क्यू दे रहे हो??? असं विचारतात.
एकदा एक व्यक्ती लाडू वाटत होती,
एकदा एक व्यक्ती लाडू वाटत होती,
छोटा मुलगा जो बसस्टॉप जवळ बसून जेवत होता त्या छोट्याने नकार दिला,
हमको खाना मिलता है! नही चाहिए
असं उत्तर दिलं.
असं उत्तर दिलं.
(सोमवार २६ ऑक्टोबर)
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment