आज रविवार....
फिरायला बाहेर पडले, सर्व नेहमीप्रमाणेच....
लक्ष उगवती कडे,
पुर्वेकडे!!
आणि बाथजवळ सूर्य देवाचे दर्शन झाले.
तेजस्वी केशरी रंग.
नेत्रसुखद. पण... पूर्ण दिसत नव्हता!
मग मनात विचार आला या इमारतींमुळे
दिसत नाही पूर्ण सूर्य!!!
मी चालत होतेच तेवढ्यात..
काळे ढग आणि त्यातून अर्धा सूर्य... दिसतोय.
मी चालत होतेच तेवढ्यात..
काळे ढग आणि त्यातून अर्धा सूर्य... दिसतोय.
चला पूर्ण सुर्योदय बघायला
मिळणार! उभी राहिले, मिळालाच उगवतांना बघायला.
सुर्याला वंदन केले, केशरी
तेजस्वी गोल, नुसत्या डोळ्यांनी पहाता येत होता. पण काही क्षणच!!!!
(पटकन मत करू नये म्हणतात ते खरं आहे, उंच इमारतींमुळे सूर्य दिसला नाही
(पटकन मत करू नये म्हणतात ते खरं आहे, उंच इमारतींमुळे सूर्य दिसला नाही
असं वाटलं पण ते काही तसं नव्हतं... तर उगवायचाच होता)
स्टेशनवर आले,
स्टेशनवर आले,
तर इमारतीच्या सगळ्या काचा याच रंगाच्या, केशरी चमकदार.....
मस्त वाटत होतं.
मस्त वाटत होतं.
घराकडे आले, गेटवर मागे वळून बघितले तर....
बघता येत नव्हते सुर्याकडे, इतका प्रखर भासला.
(पश्चिमेकडे राहतो ना... म्हणून मागे वळून बघितले).
(पश्चिमेकडे राहतो ना... म्हणून मागे वळून बघितले).
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~
रिप्लाय: माधुरी पटवर्धन
खरंच मागे वळून बघायचे कारण सुद्धा लिहिलेस.
याला लेखनातला सरळ पणा, मोकळेपणा आणि सच्चेपणा म्हणता येईल.
उगाच शब्दच्छल न करता खराखुरा, निर्भेळ आनंद व्यक्त होतो
उगाच शब्दच्छल न करता खराखुरा, निर्भेळ आनंद व्यक्त होतो
म्हणून तुझं साधं लेखन वाचनीय वाटतं.
[•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•]
No comments:
Post a Comment