Wednesday, 7 October 2015

मंगलमय मंगळवार


सकाळी जरा उशीराच जाग आली. म्हटलं आज नको जाऊया फिरायला.....
पण लगेच दोनतीन विचार आले.
★ चांगल्या कामाला सुरुवात केली की .... मोडता येतो.
मायादेवी असते ना ती चांगल्या कामापासुन आपल्याला दूर न्यायचा प्रयत्न करते.
★ तेरड्याचा रंग तीन दिवस!
मॉर्निंग वॉक सुरू करून दोनच दिवस झालेत आजचा तिसरा दिवस !!!!
★सुर्याला वंदन, निसर्गाचं रूप बघायचं राहील.
★ सगळ्यात महत्त्वाचं....
 तुमच्याबरोबर होणारा संवाद, मनाबरोबर होणारा संवाद राहून जाईल.

माझी मैत्रिण म्हणायची...
 कधी मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला, नको जाऊया असं वाटलं तर...
 पांघरूणाला जोरात लाथ मारायची, आळस झटकायचा आणि 
लगेच तयार होऊन निघायचं!!!
मग काय???? उठले आणि तयार झाले! निघाले.....

  चहावाल्याने पहिला चहा केला तो बाहेर टाकला,
का असेल बरं????
रोजच असतं.

     आमच्या येथे एक आजी राहत होत्या
 त्या पहिला चहा केला की देवासमोर ठेवत व
 बशीत चहा ओतून फुंकरून देवाला नेवैद्य दाखवत.

     एक हॉटेलवाला त्याच्याकडे असलेल्या कृष्णाच्या हातात रोज फळ ठेवतो.

काही जण घरी साखर आणली, गोड पदार्थ केला की देवासमोर ठेवतात.

किती छान छान पद्धती असतात ना!!!! त्या का?? असं आपण विचारत नाही.
 मनात नोंदवतो, आवडतं म्हणून आपण करतो.

############################################

वहिनीचा रिप्लाय.....
आपण खेळताना पहिला डाव देवाचा म्हणतो. 

तसे रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणारे पहिला चहा, सरबत, 
पाणीपुरी, शेवपुरी ही रस्त्यावर ठेवून मगच पुढची अॉर्डर  गिऱ्हाईक असेल तर देतात.
 हे मी पाहिले आहे.

    विचारांचे आदान प्रदान व्हावे म्हणूनच तू लिही,
आम्ही वाचू. छान आळस झटकून केलेल्या भटकंतीचे कौतुक!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रिप्लायला दिलेला रिप्लाय.....
अगं या लिखाणाचा हाच तर फायदा आहे
खुप छान विचारांची देवाण-घेवाण होते
मी पण reply ची वाट बघते
चालता चालता विषय सुचतात, जे माहिती नाही ते माहित होते,
 आणि माहिती होतं पण विस्मरणात गेलं त्याचं स्मरण होतं, 
उजळणी होते.
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

No comments:

Post a Comment