Thursday, 30 June 2016

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय???


आज मठात जाऊन आले...

तेथील अनुभव सांगते...
मठात आजही आत जाता आलं नाही.
(काम सुरु आहे...)
बाहेरून जाळीच्या दरवाजातून दर्शन.
पांढऱ्या कागदावरील काळ्या ठीपक्याप्रमाणे.... (एक गोष्ट आहे)

मारबल कसा शुभ्र याकडे लक्ष गेले.

म स्वामींकडे, 

पण तेथे असलेले तोरण लावत असावेत. तेथे लक्ष गेले..

म मनाला लगाम घातला.!

आणि लक्ष...फक्त स्वामींकडे.!

मनात विचार आला.....

आज स्वामीचरणांचे कसे होणार दर्शन????

म्हणून हळूहळू नजर चरणांकडे नेली..

जेथे पादुका असतात तेथे एकच पादुका पेटी...

आणि त्याच्या काचेतून सुंदर चरणांचे दर्शन.!

दर्शन घेतले!

नेहमीप्रमाणे प्रार्थना म्हटली.
◎ स्वामी, तुमचे गोड नाम अखंड मुखात राहू दे,
शेवट जे सुटेल ते तुमचे नाम असू दे!
◎ आम्हाला चांगली बुद्धी द्या,

◎ आम्हाला योग्य मार्गावरून चालवा.
◎ सेवा करण्याची संधी द्या.
◎ सर्वांचे चांगले करा.

नंतर गुरुदेव दत्त दर्शन!

आणि लगेच मागे वळले.
लक्षात आले....मागे लोक खोळंबले असतील.
पण तसं नव्हतं, हे सगळं फक्त १ मिनिटात घडले.
बाहेर पण औदुंबर वृक्षापाशी फोटोफ्रेमपादुका ठेवल्या आहेत. तेथील दर्शन घेतले.!
सुंदर असा नारळ वडीचा प्रसाद ,
तीर्थ घेतले.
अंगारा लावला आणि निघाले....
*******************************

प्रसाद...प्रभूंचे साक्षात दर्शन!

तीर्थ... तारते ते तीर्थ!

*******************************

सर्वात महत्त्वाचे... 

त्यांच्या चरणांचे झालेले सुरेख दर्शन.

✽ ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽






जिथे स्वामी पाय

तिथे न्यून काय?

★★★★★★★★★★★★★★★

स्वामी एक हाक

समर्थ आहे.....सगळं तारण्याला

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गेल्या गुरुवारी दोन्ही पादुका दरवाजाजवळ होत्या, मठ उघडा होता.
आज मात्र ...मठाला जाळीचा दरवाजा.




Thursday, 23 June 2016

सहज शक्य.!!!


★ उठल्या उठल्या आळस द्यावा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ दात न घासता.. पाणी, जमिनीवर बसून प्यावे.

*******************************

★ डोळ्यावर पाच सात पाण्याचे हबके मारावेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ चालण्याचा व्यायाम घ्यायचा असेल तर...

.कोणतेही काम हातात, डोक्यात ठेऊन चालू नये.

 चालून आल्यावर परत कामासाठी बाहेर पडावे.

*******************************

सकाळी पाणी, दुपारी जेवणानंतर ताक, रात्री जेवणानंतर दूध प्यावे.

दूध गार किंवा दूध हळद किंवा गरम दुधात तूप घालून प्यावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ रात्री शांत झोप येण्यासाठी

 देशी गायीचे तूप एक एक थेंब नाकपुडीत सोडावे.

*******************************

★ वेळ मिळेल तेव्हा....आपण कसा श्वास घेतो याकडे लक्ष द्यावे....

म्हणजे आपोआप दीर्घ श्वसन होईल.

(चार अंक श्वास आत घेताना आणि ८ अंक बाहेर सोडताना)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ थकवा आला तर,

 पाणी, सरबत प्यावे, एखादे फळ खावे, सुकामेवा खावा.

 (असही रोजच्या आहारात हे असावेच)

*******************************

★ काही गोड खावे वाटले तर....

गुळाचे पदार्थ ...चिक्की खावी...

साखर शक्यतो वर्ज्य करावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ रोज कोणतेही साधेच सूप प्यावे.

*******************************

★ बैठे काम करत असाल तर

 एखाद दोन तासाने जागेवरून उठावे. 

एक फेरी मारून यावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ नैसर्गिक शारीरिक क्रिया अवरोधु नयेत.

*******************************

★ भूक लागली असे वाटले तर पाणी प्यावे. 

आणि 

शौचास जावे वाटले तर... लगेच जावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ रोज थोडे तरी 

आले, लसूण, कोथिंबीर, धने, जिरे, दालचिनी जेवणात असावी.

*******************************

★ विश्रांती घ्यावी वाटली तर लगेच घ्यावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ दिवसातून किमान एकदातरी  

आपल्या मनाबरोबर संवाद करावा.

*******************************

★ जमल्यास जिने चढ उतार करावे. जिने उलट चढावेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ तसेच चालताना उलट चालावे.

(थोडे तरी)

*******************************

★ संध्याकाळी जेवढे लवकर जेवता येईल तेवढे जेवावे.

यात १ भाग अन्न, १ भाग पाणी, तर एक भाग रिकामा ठेवावा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ दररोज एक तरी आवळा खावा.

सीझनमध्ये जसा आहे तसाच

आवळा सुपारी, आवळा मावा, 

आवळा ज्युस, आवळा सरबत

 किंवा आवळा पावडर दुधातून किंवा पाण्यातून.

*******************************

★ एक लिंबु.... पाण्यातून पिळून किंवा पदार्थावर पिळून.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ चहा कॉफी कमीतकमी प्यावी.

*******************************

✽ कोणत्याही गोष्टीला सातत्य हवे....

चार दिवस करून सोडून देऊ नये.

*******************************

संकलन....
हरी बोल.!

Monday, 20 June 2016

योगा आणि बालपण......

आज जागतिक योगा दिवस!


तर ..... त्या निमित्ताने मन बालपणात गेले आणि ....

आम्हाला फक्त मैदानी खेळ, बैठे, कमी जागा
 कमीतकमी साहित्य लागते असे खेळ माहिती होते.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

आसने...असं प्रत्यक्ष माहित नव्हतं.

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

घरातील वडीलधारी म्हणत 
आता याची मुंज झाली कि सूर्यनमस्कार शिकवणार.!







मुलांना सूर्यनमस्कार घाला असं सांगत.
तर मुली हौशीने मंगळागौरीचे खेळ खेळत.
तसेच इतरही 
खेळ खेळले जायचे.....मुलं मुली मिळून. !!!!!

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

सुट्टीत दुपारच्या वेळी ....बैठे खेळ खेळत होतो....

**********************

पत्ते....

यात तर कित्ती खेळ खेळले जायचे.
 यातून न कळत स्मरणशक्ती वाढत असे. 
 अंदाज बांधले जायचे, 
एखाद्या खेळासाठी चार किंवा सहा भिडू हवे असतील तर 
 आणि एक कमी किंवा जास्त खेळाडू असेल तर ....
वेगळा, भिडू नसलेला खेळ खेळू किंवा
 एक जण आपण होऊन म्हणे तुम्ही खेळा मी थांबतो.
समंजसपणे खेळत असू.



~~~~~~~~~~~~~~

कॅरम... 

यात सुद्धा बोटांवर नियंत्रण,
 एकटं असल तरी खेळता येतं,
 कौशल्य संपादन करता येतं.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

सागरगोटे.....

 मुलींसाठी खास खेळ. कितीही जणी असल्या तरी चालत.
खेळात सागरगोटे हवेच असं नाही, बिट्टया किंवा लहान खडे चालतात.
यामध्ये 

हात आणि डोक्याचं काम! 

एकाच वेळी दोन्ही क्रिया एकदम व्हायला हव्यात.

तसंच बसण्याची पद्धत.... नीट बसलं कि छान खेळता येत.





••••••••••••••••••••••••••••••••••••••

जागा कमी किंवा पाऊस पडत असेल तर

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

कान गोष्टी 

हा मस्त खेळ खेळला जायचा....
यात गम्मत म्हणजे
 सांगितलेले वाक्य थोडे थोडे बदलत बदलत परत ते पहिल्यापाशी येत असे.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

×○×○ फुल्लीगोळा

कोणीही खेळू शकते.

**********************

 बिल्ला चप्पट  करून दोऱ्यात ओवून भिगरी फिरवणे. 

 

 

 

 

 

यात बोटांना छान व्यायाम आणि एकाग्रता होत असे. 

 ........    ...... ...... ...... ...... ...... ...... ..... ...... ... ..... ..   

टिकली मारून जावे...

हा पण एक मस्त खेळ
यात अंदाजाला महत्त्व होते
कोणी टिकली मारली असेल? 
याचा अंदाज बांधला जायचा.

 हा सांघिक खेळ.

□ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □

सापशिडी, ल्युडो... 

 

 

 

 

 

हे पण सगळ्या वयोगटांना खेळता येणारे खेळ..

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

नवा व्यापार...

.मला वाटतं
 बऱ्याच पिढ्यांनी हा खेळ खेळला असेल.

००००००००००००००००००००००००

शाळा शाळा.... 

यात शाळेतील शिक्षक 
कसे वागतात बोलतात ते घरात कळत असे.

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

डॉक्टर डॉक्टर...

 हे पण मुलांना आवडणारे खेळ.
♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

भातुकली...

.हा सुद्धा खूप खेळला जाणारा..
तिथेच मुलींना संसाराचे शिक्षण मिळे, 
भाजी आणायला जाणे, 
येऊन स्वयंपाक करणे,
 तेवढ्यात मैत्रीण आली तर तिच्या बरोबर गप्पा मारणे.

<><><><><><><><><>

तसाच एक खेळ

शिवाजी म्हणतो......

सांगणाऱ्याचे कसब असे
आणि ऐकणाऱ्याचे लक्ष असेल तर कोणी पटकन बाद होत नसे.

~•~~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

डोंगराला आग लागली पळा पळा ... 

आणि थांबा...STOP   
असं म्हणून बाकीचे स्तब्ध (statue)
उभे राहत. 
 म टिवल्या बावल्या करून खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न केला जात असे.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

तळ्यात मळ्यात....

मळ्यात,तळ्यात....तळ्यात,तळ्यात...

अस पटपट बोलून सावंगड्यांना बाद केले जाई.

«««»»» □ «««»»» □ «««»»» □ «««»»»

टिक्कर...

.यालाच काही जण प प पाणी म्हणत...
यात सुद्धा शरीराला व्यायाम घडत असे.
यातसुद्धा कित्ती वेगवेगळे खेळ!!!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पकडापकडी...
.यातील साखळी साखळी /जोडसाखळी हा खेळ मस्त होता..
 
๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

लंगडी..

.एका पायावर तोल सांभाळणे. सांघिक खेळ.
******************************

चोर पोलीस...

. मस्त खेळ
खूप धावाधाव, लापालपी!





=o==o==o==o==o==o==o==o==o==o==o=
अंगण मोठं असेल त्याला खांब असतील तर....

खांब खांब खांबोली....

||~||~||~||~||~||~||~||~||~||~||~||~||

 सूरपारंब्या

 छान व्यायाम 

:::::::::::::::::::::::::::::::::

हुतूतू...कबड्डी

 

 

 हे मैदानी खेळ
सहकार्याने खेळला जाणारा.!

००००००००००००००००००००००००

खोखो...

.उभा खोखो आणि
बैठा खोखो....
खूप मज्जा धावपळ करावा लागणारा खेळ.
_| ̄○  _| ̄○  _| ̄○_| ̄○  _| ̄○  _| ̄○_| ̄○ _| ̄○  _| ̄○_| ̄○
खुर्च्या असतील तर 

संगीत खुर्ची.

ŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏŏ

पासिंग द पार्सल..... 

यात बाद झालेल्याला शिक्षा देणे हे गमतीचे असे.

○◇○◇○◇○◇○◇○◇○◇○◇○◇○

आईच/मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं... 

 

 

 

 

 

यालाच रुमालटाकी अस म्हणत.
यात सुद्धा कौशल्य वापरून रुमाल कोणामागे टाकला
 ते कळणार नाही या पद्धतीने टाकावा लागतो.





.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

लपाछपी...

.यातीलच एक प्रकार डबा आइस पाइस.

यालाच गिनापी डब्बो असं म्हणतात.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

गोट्या, ढप्पर,

 यात सुद्धा अगदी लहान गोट्या थोड्या मोठ्या गोट्या,
 आणि पांढरे मोठे ढप्पर... 
कित्तीही वेळ खेळता येत असे. खूप प्रकाराने खेळत येतो..
गोट्या काचेच्या असल्याने सुंदर रंगात मिळतात.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

विटी दांडू..

.सुंदर विट्टी बनवून घ्यायची आणि मोकळ्या मैदानात खेळायचं.

टोलवलेली विट्टी झेलणे हे मोठे कसब असते.

 

 

 

 

 

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

भोवरा....

.भोवरा घुमवणे,

 तो जमिनीवरून हातात घेणे, 
किंवा हवेतल्या हवेत झेलणे...
त्याला नाडी गुंडाळणे हे कौशल्याचे काम आहे...

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

कांदाफोडी...

 

 

.हा असाच सुंदर व्यायाम घडवणारा खेळ. 
यात शरीराच्या कित्ती हालचाली होतात??

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

पाऊस पडला कि

 तार खुपसणी

 हा खेळ खेळला जायचा.

०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/०/

गाडा फिरवणे, 

 

 

 

हे सायकलचा टायर, चाक फिरवणे....

या साठी एक छोटी काठी  आणि गाडा एवढेच साहित्य लागते.
जर सायकलचे स्टीलचे चाक असेल तर मात्र जरा वाकवलेली तार हवी.
म्हणजे त्याला एकदा धक्का दिला कि
 ती तार त्यात अडकवून सावकाश पुढे पुढे नेता येते.
यातून सुद्धा balancing चे शिक्षण यातून मिळते.


००००००००००००००००००००००

लगोरी....

सांघिक खेळ, एकमेकांच्या साहाय्याने खेळला जातो... 
 दगड एकमेकांवर रचणे..
आणि हि रचना एका संघाने चेंडुने तोडायची 
आणि
 दुसऱ्या संघाने विरुद्ध संघाला चेंडू मारून बाद करण्याचा प्रयत्न करायचा.,
 व त्याच वेळी या संघाने लगोरी रचायची.





OOOOOOOOOOOOOOOOOO

आट्यापाट्या...

असाच मस्त खेळ...
काहीजण रस्त्यावरच आखून रात्रीच्या वेळी खेळत.

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

आबाधुबी.....

शरीराला मस्त व्यायाम घडतो.
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

कवड्या, काचापाणी, 

असेही खेळ खेळायचो.

**********************

चेंडू असेल तर...

 कॅच कॅच, टप्पा टप्पा., क्रिकॆट...

बादलीत चेंडू टाकणे...

●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●•●

पतंग उडवणे,

メメメメメメメメメ

आंधळी कोशिंबीर 

 

 

 

 

(डेंजर डेंजर)

メメメメメメメメメ

लंडन लंडन स्टेच्यु...

आणि स्तब्ध उभं राहायचं
स्तब्ध उभं राहिलेल्याला काही टिवल्या बावल्या करून त्याला बाद करायचं
(त्याची एकाग्रता विचलित करायची).

यात मुलं इतके छान  स्टेच्यू घेतात ना..

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

विषामृत... 

मस्त कल्पकतेचा थोडं धावायचा खेळ.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

एक रुमालाचा खेळ..

मध्ये गोलात रुमाल ठेवायचा 
समोरासमोर च्या संघातून एक एक खेळाडू येणार 
आणि तो रुमाल उचलण्याचा प्रयत्न करणार
मस्त खेळ आहे हा.









〆〆〆〆〆〆〆〆〆〆

तसं.... कोंबडा कोंबडा....

शक्तीचा खेळ...
खूप मज्जा यायची..






 पाणी घालणे 
 चतुराई एकाग्रता 





〆〆〆〆〆〆〆〆〆〆

असाच एक शक्तीचा पण सांघिक खेळ.....

रस्सीखेच....

*******************************

जिन्यावरून उड्या मारणे.

अगदी लहान मूल पहिल्या पायरीवरून उडी मारायला शिकते....
म मात्र थोडी मोठी झाली कि साहासने मुलं पाचव्या सहाव्या पायरीपर्यंत उड्या मारतात.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

तसच जिन्याचा खेळ 

घसरगुंडी...

 जिन्यावरून सरळ न उतरता जेथे हात धरतो तेथून घसरत खाली यायचं.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....


तर...असे अनेक मैदानी , बैठे खेळ खेळले जायचे

काही खेळासाठी तर काहीच साहित्य लागत नाही तर काही खेळासाठी अगदी सहज उपलब्ध साहित्य.
आणि प्रत्येकाकडे हवेच असे नाही.

यातून शारीरिक मानसिक, बौद्धिक वाढ होत असेच.

सांघिक भावना वाढीस लागे

एकमेकांना मदत करणे,

 समजून घेणे आपोआप होत असे.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

राम राई साई सुट्टयो

असं म्हणून ....

कोणावर राज्य ते ठरत असे

किंवा.... 

जास्तीची मेजॉरिटी

असं म्हणून कोणावर राज्य ते ठरत असे.

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆


सायकल चालवणे... 

तेव्हा स्वतःची सायकल नसायची
म कोणी भाड्याने घेतली तर सगळ्यांनी मिळून ती चालवायची

シ シ シ シ シ シ シ シン シ シ シ シ シ シ シ シ

तसं 

खाऊ म्हणजे लिमलेट रावळगाव गोळी 

 

 

 

 

म कोणाकडे असेल तर ती रुमालात गुंडाळून थोडी मैत्रिणीला द्यायची....

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

तसेच....

कोण म्हणतं टक्का दिला???

नृत्य करणे/बसवणे, नाटुकले बसवणे.

भेंड्या खेळणे,

〆〆〆〆〆〆〆〆〆〆

गोष्टी सांगणे,

कापूस कोंड्याची गोष्ट,

एक चिमणी आली दाणा खाल्ला पाणी प्याली भुर्रकन उडून गेली....
अशीच दुसरी, तिसरी क्रमाने चिमण्या येत राहायच्या (या न संपणाऱ्या गोष्टी)
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

नाव गाव फळ फुल खेळणे,

हे आणि असे अनेक खेळ सहज खेळले जायचे.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

त्यातूनही कितीतरी गोष्टी आपोआप घडत होत्या.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

बालपण.... किती सुंदर

कित्ती खेळ खेळायचो....
पण नंतर मात्र कामाच्या
व्यापात ते मागे पडतात 
आणि

 पुढे पुढे...

येत नाही जमत नाही.
आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने आपोआप होणारा योगा आठवला.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

समारणशक्ती वाढ, कल्पकता, साहस, शारीरिक व्यायाम, सहकार्य करणे,

सांघिक भावना  निर्माण होणे, खेळला अनुसरून निर्णय घेणे.

Sunday, 19 June 2016

उपवास....वडाची पूजा

उपवास....

उपास....असा आपण चुकीचा शब्द वापरतो

खरा शब्द...उपवास

उपवास म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे...

तेवढेच आपण करत नाही.

○○~~○○~~○○~~○○~~○○~~

☆ अन्नात बदल करतो .. 

दिवसभर आपण आज उपास आहे उपास आहे असे बोलत राहतो.

☆ आणि हे उपासाचे पदार्थ.... नेहमीपेक्षा जास्त खातो.

☆ जे काही जणांना तब्येतीसाठी योग्य नसतात.

★ म उपवासासाठी पदार्थ कोणते???

फळं, दूध, लिंबु सरबत, नारळपाणी, काकडी,
दही ताक, आले वडी,
आलं लिंबु पाचक
असे आपल्याला सोसतील, असे पदार्थ....
पण आपण मात्र त्या उलट करतो....

★ आपल्या जिभेला आवडतात असे पदार्थ अगदी आवडीने खातो

□□   □□   □□   □□   □□   □□  □□  □□  □□

उपवास... जसं देवाजवळ राहणे

तसंच लंघन हा पण एक अर्थ आहे..

तसंच उपवास म्हणजे संयम.

*******************************

"उपवास" करणारे जेव्हा 'उपास' करतात तेव्हा 

त्याचा गाजावाजा होतो,

 लोक टिंगल करतात.

काय म आज...
● "एकादशी आणि दुप्पट खाशी आहे का????
● किंवा,.. आज कशावर उपास आहे???
● काही जण तर उपवास म्हणजे तक्रारीचा सूर लावतात.
● माझं आज डोकं दुखत आहे..
● हे दाणे सोसत नाहीत.
● नको असलेलं खावं लागत
● दोन दोन स्वयंपाक करावे लागतात.
● बटाटा साबुदाणा हे भारतीय पदार्थ आहेत का???
● कधी एकदा हा उपास संपतोय असं झालंय!
● भात जेवले कि बरं वाटेल..
कायकाय बोललं जातं.
● उपवास करणाऱ्याची चेष्टा केली जाते...

*******************************

म खाली दिल्या प्रमाणे उत्तर मिळू शकते
मी उपवास करते त्याचा तुम्ही कृपया उपहास करू नका...
तुम्ही आपला तुमचा तुमचा उपहार करा..

*******************************

आता आज वट पौर्णिमा...

पावसाला सुरुवात होते,
म हलका आहार घ्यावा,
म्हणजे पुढील काळ हा चांगला जावा.....
या साठी उपवास पूजा करतात...

*******************************

पूर्वी मुलींचे वय लहान असे व त्या मानाने नवऱ्याचे वय मोठे असे...
.म देव असं म्हणून तिला नवऱ्याचे दीर्घयु मागण्यासाठी पूजा करावी असे सांगितले असावे,
किंवा या निमित्ताने तिला घराबाहेर पडता येत असे.
नटून सजून बाहेर चार समवयस्क मैत्रिणीच्या मध्ये जायला मिळत असे.

<><><><><><><><><><><><><>

तसच...वडाची पूजा का??

✽ वडाच्या झाडाला भरपूर आयुष्य आहे,

✽ या झाडापासून जास्त प्राणवायू मिळतो,

✽ या झाडाचा विस्तार खूप मोठा असत

 तसच कुटुंब राहूदे 

✽ ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

भगवान श्रीकृष्ण 

यांनी गीतेतील पंधराव्या श्लोकात प्रथमच असे सांगितले आहे कि...
वटवृक्ष हा असा एक शाश्वत वृक्ष आहे कि 
ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत 
आणि  

पाने वैदिक मंत्र आहेत.

जो या वृक्षाला जाणतो तो या वेदांना जाणतो.

*******************************

आता या वृक्षाच्या तोडणी विषयी.....

हल्ली घरी पूजा केली जाते. पूजेसाठी वृक्षतोड केली जाते.
तर विचार केला तर मला वाटत 
पावसाळ्यापूर्वी झाडे योग्य पद्धतीने छाटली तर त्यांची वाढ चांगली होते

(घरी फांदी आणून पूजा करू नये)

म काय करतात?????
◎◎  एखाद्या देवळातील दानपेटीत पैसे ठेवावेत..

◎◎  घरीच गुरुजींना बोलावून दक्षिणा द्यावी..

◎◎  या दिवशी जर कोणी स्त्री आली तर तिला पैसे, वस्तू द्यावी.

◎◎  पूजेसाठी पाच फळं घेतात ती पूजा होईपर्यंत उघडीच राहतात. 

म ती कोणी खात नाही, तर एखादे अख्खे फळ कोणाला द्यावे.

○○~~○○~~○○~~○○~~○○~~○○

आता या विषयी आलेले विनोद.....

:) आज बायका उपास करतात.... पण तोंडाने वडा पाव!
वडा पाव म्हणतील आणि उपास करतील.

;)   ;)   ;)
पु लं ची एक भारी कमेंट आहे   .......
" वटेश्वरा, आज तुझ्या बुन्ध्याला   गुंडाळलेले सूत हे नुसतंच " बंडल "   आहे,
हे लक्षात असू दे".!

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

महिलांसाठी एक खास सूचना........

वडाच्या झाडांच्या फांद्या तोडूंन घरी आणण्या पेक्षा 
घरी जो तुमचा हक्काचा वड आहे त्यालाच गुंडाळा.........

नेहमीप्रमाणे

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

असे विनोद वाचून कुणी विचारी व्यक्तीने असा छान विचार पाठवला...↓

कृपया विचार करा....१९ ला वटपौर्णिमा आहे.
 व्हाट्सअप /फेसबुक
वर भरपुर विनोद येतील.
ते कृपया पुढे पाठवू नयेत.

ही विनंती.

आपल्याच सणांची माहीती न घेता आपणच जर अशी खिल्ली उडवली तर इतर मागे राहतील का?..

असे विनोद इतर धर्मीय सणा बदल कधी ऐकलेत का?...

Σ゚Σ゚Σ゚Σ゚Σ° Σ° Σ° Σ° Σ° Σ°

यावर माझा विचार असा आहे कि...

आपण आपल्या सणांची माहिती न घेता,
त्या मागे काय विज्ञान असेल बरं?? 
आपल्या पूर्वजांनी ज्या अर्थी ऋतुप्रमाणे सण उत्सव यांची निर्मिती केली 
त्यासाठी निरनिराळे प्रसाद ठरवले.
निरनिराळ्या प्रांतांप्रमाणे ते ते सण साजरे होतात. असं का??????
याचा शोध घेत नाही.
म्हणून विनोद सुचतात.
हो ना....

आपण राहतो भारतात 

आणि

 आपली राहणी, विचारसरणी परदेशी.... म कशी सांगड बसणार????

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

तसच हा एक नीट माहिती देणारा लेख↓

पूर्ण वाचा....... काय आहे सात जन्माचे रहस्य ?
     आज वट पौर्णिमा.
सात जन्म वरून खूप विनोद होत आहेत.
पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.
मुळात या सातजन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही.
तो होणार का नाही ?
माहित नाही.
माणसाचा मिळेल का? माहित नाही.
हीच पुन्हा ओळखायची कशी ?
अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय आहे सात जन्म. ?
ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.
शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात.
शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.
या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो बारा वर्षे.
म्हणून तप करायचे बारा वर्षे.
बारा वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलले असते.
जणू एक नवा जन्म.
असे सात जन्म म्हणजे
१२ × ७ = ८४
पूर्वी लग्न होत १६ व्या वर्षी.
त्या वेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती मिळो
अर्थात पती
१६ + ८४ = १००वर्षे
जगो.
पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.
पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.
विनाकारण आपल्याच धर्मातील विचार निष्ठ बाबींची टिंगल करू नका.
वट सावित्रीच्या शतायुत्वाच्या शुभेच्छा.
     ||श्री शुभं भवंतु||

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

 एक सुंदर कविता 

      मीच तो वड 

पिंपळ, आंबा, फणस 

सर्व रागावलेत माझ्यावर 

म्हणे , क्काय जादू केली 

तू या महिला वर्गावर 

नटून थटून सर्वजण 

येतात तुझ्या पारावर

 नाहीच भेटला तू तर

 फांदी ठेवतात पाटावर 

 

काय सांगू त्यांना 
वैतागलो मी या सणाला 
नमस्कार माझा त्या ऋषीमुनींना 
केला सन साजरा 
धरून विज्ञानाला  महत्त्व प्राप्त करून दिले 
या भारत देशाला 

विज्ञान समजत नाही म्हणून 
उभे केले सावित्रीला 
 वडाजवळ येउन बस फायदा
 होईल आरोग्याला 
माझ्या पानामधून द्रव निघतो 
पावसाच्या सुरुवातीला 
स्त्रियांचे आजार उभे राहणार नाहीत वाऱ्याला 

या सर्व गोष्टी राहिल्या बाजूला 
आणि सावित्रीच्या लेकी 
लागल्या पूजेला 

झाड लावा माझे 

मी चोवीस तास oxigen देतो. 

पटत नाही लोकांना 
म्हणे

 फारच जागा घेतो. 

 वर्षातून एकदाच लागते,

कशाला हवे झाड?

नाहीच मिळाले तर 

कुठून फांदी तोडून आण 

 

किंमत राहिली नाही 

या अक्षय  वट  वृक्षाची 

गरज आहे आता समाजाला

 झाडे लावण्याची 

 

बिघडलेल्या या वसुंधरेचा 

तोल सावरण्याची 

मीच आहे तो सत्यवान 

ज्याला गरज आहे 

झाडे लावणाऱ्या 

सावित्रीच्या लेकींची 

 

 

❀❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀❀

अशाच काही गोष्टींसाठी
चातुर्मास  पाळला जातो....
उपवास केले जातात.
नियम केले जातात.
सण उत्सव साजरे होतात...
काही समजून घेऊन करतात.
 तर काही कर्मकांड, प्रथा म्हणून करतात. !!!!!

❀❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀❀

 

Saturday, 18 June 2016

छान सुरुवात .!!!!!


सुंदर सकाळ....

छान शांत थोडं थंड वातावरण.

बाहेर पडलो.

भवानी शंकर मंदिराचा दरवाजा बंद आहे.. 

तरी भगवान शंकर आहेत आत  !!!

मनानेच दर्शन घेतले, नमस्कार केला.

गायींना नमस्कार केला.
मनात एक विचार आला.  

आज जुनची १८ तारीख उजाडली आहे....

पाऊस?? 

पत्ता नाही.

कधी येणार पाऊस????

गेल्यावर्षी १९ तारखेला धूमधाम पाऊस कोसळत होता....

 रेल्वे विस्कळीत,

 जिकडे तिकडे पाणीच पाणी, 

हाय अलर्ट, 

भरतीच्या वेळी मुद्दाम बाहेर पडू नका.

आणि व्हाट्सअप वर तर....

काय काय मेसेज.....

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

 ये रे ये रे पावसा म्हटलं 

तर इतकं यायच?
काहीही हा पाऊस 

******************************** 

 हे इंद्र देवा ,

काल रात्री नळ चालू केलास तो बंद करायला विसरलास की काय ?

काहीही हा श्री 

 :<><><><><><><><><><><><><><><><>

जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, 
सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात
 तर अडचण व्हायला नको.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

Today in Mumbai

 WhatsApp   is only place where ppl working .....

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

मध्य रेल्वे ठप्प,

घरी बसावे गप्प...!

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

कोणीही घराबाहेर पडू नका

मुंबई आंघोळीला बसली आहे.

๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧

काय काय मेसेज येत होते!!!

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

असं म्हणतोय तो पर्यंत रिमझिम पाऊस पडू लागला..
जोर नव्हताच, पण तसे थेंब मोठे होते. 
मग एक छान आडोसा दिसला, बसायला पण मिळालं,
 मस्त पाऊस बघत बसलो.

 अगदी  थेंब खाली आला  कि  जमिनीवर पडून कस " पाण्याचं फुल " दिसतं,

 कि  

" खरंच  पैसा  झाला  मोठा"  असं वाटतं ???? 

मधेच समोर बघून किती वेळ पडेल याचा अंदाज घेत 
पडणारा   पाऊस,  येणारा गार वारा,  हलणारी, डोलणारी झाडे  बघत बसलो, 
दिवस छान उजाडत आहे,.... 
 तेवढ्यात पाऊस थांबला..
. पुन्हा चालायला सुरुवात केली.... 
आता तर दिवे पण बंद झाले... 

"सुंदर निळं आकाश, तसाच सुंदर उजेड " 

 आणि 

 हि सुंदरता या रस्त्यावर प्रतिबिंबित झाली आहे 

 झाडे डोलत आहेत
 दिव्यांचे खांब यांचे प्रतिबिंब दिसतंय.!
 लाटांचा आवाज येतोय!पाणी काळसर दिसतंय, 
बहुतेक काळ्या ढगांची छाया पडली आहे.
आता जिमखान्यापर्यंत आले.... 
 येथे सुंदर तांबडी माती आणि तयार केलेल्या लॉनवर छोटं गवत. 
अरे आपण मुंबईतच आहोत ना.!
चला आलंच कि स्टेशन. आज अजूनही पुढे जावं वाटत आहे पण....

थोड्यात गोडी म्हणतात ना....

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

आलीच कि रेल्वे.!
चर्नीरोड स्टेशन आलं आणि... 
पहाते तर एक पांढरा शुभ्र ससा .... 
मस्त मुक्त धावतोय..मन बालपणात गेलं....

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

ससा ससा दिसतो कसा,
कापूस पिंजून ठेवलाय जसा !!

"वाह....! सुंदर सकाळ..."

सुरुवात चांगली झाली कि सगळंच चांगलं.!

है ना.!!!

◇◇○○○◇◇○○◇◇○○○◇◇○○○◇◇○○○◇◇

Monday, 13 June 2016

धन्यवाद १३ जून


घण् घण् घण्

चला शाळा सुरु झाली...

जेव्हा जेव्हा शाळा हा विषय येतो तेव्हा प्रत्येक वर्षीचा शाळेचा पहिला दिवस आठवतो.

१३ जून....

किंवा...

कॅलेंडर वर १३ जून ही तारीख दिसते तेव्हा शाळा..आठवते.!

 आणि
मन भूतकाळात रमते.
म्हणजे शाळेची, शाळेतल्या सगळ्या गोष्टी नेहमी आठवतातच.
शाळा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. 
आयुष्याची पहिली बारा वर्ष आपली शाळेची असतात. 
 खूप काही शिकतो, घडतो आपण.!

पण हा खास दिवस..

आज १३ जून.....
या तारखेला आपल्या प्रत्येकाच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.
शालेय जीवनाची सुरुवात या तारखेने सुरु होते.
काहीच कळत नसतानाचा शाळेचा पाहिला दिवस.

हा दिवस आणि शाळेतल्या बाई.... आजही माझ्या स्मरणात आहेत.

वर्गात काही मुलांची रडारड, काही दिलेल्या खेळण्यात रमलेले,
 तर काही नव्या मित्रात रमलेले....

आडून आडून इकडून तिकडून बघणारे पालक,...

आणि म शालेय जीवन सुरु झाले कि नवा वरचा वर्ग,
नवे बूट,  नवा रेनकोट.,  नवी छत्री 
 नवी पुस्तके,  नव्या वह्यांना घातलेली खाकी कव्हर्स...  त्यावरील लेबल्स,
त्याचा छान वास,
पुस्तक  वह्यांवर सुवाच्य अक्षरात घातलेलं
 नाव, इयत्ता, तुकडी , विषय  प्रत्येक पानावर घातलेले क्रमांक
नवा खाऊचा डबा, पाण्याची बाटली, नवे दप्तर, 
नवा युनिफॉर्म, त्याचा नवा कोरा छान वास....
मे महिना संपला कि शाळेचे वेध लागतात, खरेदीला सुरुवात होते.
 आणि शाळेच्या प्रवेशद्वारापाशी लक्षात येतं....
शाळा सुद्धा आपलं स्वागत करत आहे. 
इमारतीला लावलेला नवा रंग,
 फळा छान काळाभोर..... 
सगळं नवं नवं!!!!!
बरेच दिवसांनी भेटणारे वर्गमित्र....
काही नवे चेहरे पण दिसतात
शिक्षक, कोण असणार???
 वर्गशिक्षक,... आज बसलोय आवडत्या बाकावर मग कसं बसवतील???

आणि हो.... शाळेची घंटा देणारे मामा,

घंटा वाजली की प्रार्थना....
(मधली सुट्टी, कंटाळवाणा तास संपला.... किंवा चला शाळा सुटली, याचा आनंद होत असे.)
मॉंटेसरी, प्रायमरी, माध्यामिक, असे टप्पे पार होतात.
तरी या तारखेचं महत्त्व कमी होत नाही...म मुलं, नातवंडे...

आजच्या तारखेने

शाळा , शाळेतले शिक्षक, शिपाई मामा, वर्गमित्र...

 यांच्या आठवणी फेर धरू लागल्या.....

धन्यवाद १३ जून.!!!

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

Friday, 10 June 2016

पहिला पाऊस...

सकाळी उठले, चला फिरायला निघू....

तर सकाळ सुंदर सोनेरी झाली होती, 

म्हणजे पाऊस येणार तर....

आज आताच.....
 तयार झाले आणि निघणार तर पाऊस....
मस्त पाऊस बघत बसले.

 मनात विचार आला...कि झालाय का पाऊस सुरु???

 कारण हा वाजतगाजत नाही आलाय! पडतोय शांतपणे....

 म पेपर वाचला...चला थांबलाय पाऊस!
निघालो... चौपाटीकडे

बापरे !!! केवढा भरलाय पाऊस दूरवर!!!

पण छान वाटतय. गार वारे वाहत आहेत.
 तेवढ्यात मागून एक अनोळखी बाई म्हणाली आता हवा गार होईल. 

येणाऱ्या पावसाचा आनंद कोणाशी तरी वाटावा म्हणून ती मला सांगत होती

चार पावले माझ्या पुढे जाऊन तिने माझ्याकडे वळून बघितले आणि हसली.
      सकाळ झालीय तरी पावसाळी काळोख, रस्ते चिंब आहेत पण पाऊस नाही...केव्हाही पडेल.
तेवढ्यात एक मुलगी सायकल वरून पडली.

ही वाहन चालकांना सूचना तर नाही ना....

 पावसाळा सुरु झाला आहे,
आपली वाहने सावकाश चालवा...

तर अजून पर्यंत भिजले नाही
मनात कवितेच्या ओळी...

पहिला पाऊस पडतो तेव्हा

एकच काम करायचं....

हातातली काम बाजूला ठेवून पावसात भिजायचं....

आज सूर्यदर्शन होणार नव्हतंच.
आले रेल्वेस्टेशन वर! 
आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली घरी येईपर्यंत थोडी भिजले.

मग काय .!!! घरी आल्यावर मस्त गरम गरम कॉफी.....

○○◇◇○○◇◇○○◇◇○○◇◇○○◇◇○○

Monday, 6 June 2016

एक संवाद... देव आहे का???


सारखी संकटं का येतात,

 होईल ना सगळं नीट...
आपण चांगले वागतो, तरी आपल्याला संकटं का येतात?
असे अनेक प्रश्न पडले
म हा सहज संवाद झाला आमच्यात.

● मैत्रीण

★ मी

…………..........................

● काही प्रश्न, समस्या आहेत हे देवाला हे दिसत असेल का सगळं???
तो नीट करेल ना सगळं ??
★ कोणत्याही गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवावा.

स्वामींना प्रार्थना कर....

जे काही आहे ते तुम्ही पहात आहात.
यातून बाहेर पडण्याची शक्ती द्या.
योग्य मार्गावरून आम्हाला न्या.
तुमचे नाम सतत मुखात राहू दे.

तुम्ही आमच्याबरोबर , आमच्यापाठीशी आहातच.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

۞ ۞

एक मेसेज....
" संकटसमयी माझे पुढे कसे होईल ?????
हा प्रश्न मनाला कधीच पडू देऊ नका ;
कारण
सूर्यास्तावेळी सूर्य बुडताना दिसतो .....
पण बुडत कधीच नाही ..! "

**********************

●कधी कधी आपल्याला अस वाटतं की
 अरे आपल्याला हवी ती गोष्ट का मिळत नाही ..देवाला सांगितलं तरीही मिळत नाही...
★ योग्य वेळी योग्य ते मिळतं..
आपल्याला धीर नसतो.

आताच घडलेली एक घटना सांगते....

★ काकांना बरं नाहीसं वाटलं तेव्हा

 मला एका मैत्रिणीने सांगितले..... 

की काकांचा स्वभाव, वागणं बोलणं.... सगळं चांगलं आहे. म असं का???

 असा प्रश्न पडला असेल...

तर अगोदरच्या जन्मातलं गाठोडं माणूस घेऊन येतो. त्यातील भोग असतील...

 मला ते पटलं

म्हणून स्वामींकडे एवढंच मागितलं.... 

भोग आलाय तो भोगला पाहिजे.

ते भोगण़्याची शक्ती द्या.

● किती छान...आधुनिक युगाशी सांगड घालून किती सुंदर सांगितलं..
● काकू पण तुम्हाला असं वाटतं का की देव खरोखर आपल सगळं ऐकतो????

★ हो.

माझा विश्वास आहे.

● मला असा अनुभव नाही आला...पण माझा विश्वास आहे देवावर!

★ फक्त आपलं चांगलं व्हावं, चांगलं झालं मनाप्रमाणे की देव आहे.... असं मात्र नसावं.!

★अगं रोज जे काही घडतं ते कोण घडवतं?????
★ आपली शरीररचना, नुसतं बघितलं तरी....

एवढीशी मुंगी.....
सगळ्यांना रंगरूप?????
● हो ते खरंय...पण असा चमत्कारच व्हावा असं नाही कधी झालं...म्हणून मला असं वाटलं
*देते कोण देते कोण*
हे गाणं चित्रित केलेलं बघ !!

●चालेल, पाहीन ते गाणं.!

● म्हणजे एखादी गोष्ट जी मिळणारच नाही ती मिळाली असं नाही झालं..

★ अजून पुढे खूप आयुष्य आहे.

●हो, हे खरं म्हणालात.
पुढे खूप आयुष्य आहे.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात...
पण मोठे मोठे साधुपुरूष होऊन गेले... त्यांना चमत्कार मान्य नाही.

★ अगं रात्री झोपलेले आपण... सकाळी डोळे उघडतो

म्हणतो.... मी जिवंत आहे!

● हो हे खरं म्हणलात.

● हो पटतय मला...

पण काहीजण म्हणतात की देव स्वप्नात येतो...

आपल्याशी बोलतो...ती माणस खरं बोलत असतील का...?

★ तसंच... काही मुलांचं अगदी लहानपणीच मातृपितृ छत्र हरपतं.!
आपण किती नशिबवान
आहोत ना....
तुला सांगू.....

देव स्वप्नात यावा... हा मात्र मी अनुभव घेतलाय बऱ्याचवेळा.

● खरंच का?? किती छान.!
● आणि कित्येक वाईट माणसं जगात असतात त्यांना देव कसं काही करत नाही??

उलट मान मिळतो ...आणि जी खूप खरेपणाने वागतात त्याची ओंजळ का बरं रिकामी?????

★जेव्हा मी देवांची पोथी वाचते

एकरूप होते.... तेव्हा काहीना काही छान अनुभव येतात

●आता तुम्ही म्हणालात तर मी तुमच्यावर नक्की विश्वास ठेवते.
★पण मी रोज देवाचं वाचते, म्हणते तर काहीच अनुभवत नाही. स्वप्न....

●तुम्हाला जर खरंच स्वप्नात देव भेटला असेल तर तो नक्कीच आहे 

आणि तो मलाही पाहत असेल!

★ शांत झोप येते.

मन विचलित होत नाही.

ही सुद्धा देवाची कृपाच ना...

● हो खरंय.
काकू पण तुम्ही समजावलं म्हणून मला पटलं!
नाहीतर माझा कोणावर विश्वास नाही.

★ अगं... आपण देव आहे का नाही...

त्याची परीक्षा घेण्याइतके मोठे नाहीत.

● हो खरंय ...चुकलं माझं.!
★ अगं यात तुझी काहीच चूक नाही.
एक अनुभव सांगते....

★ जे गीता वर्ग घेतात
ते कोणत्याही पद्धतीने गीता म्हणतात.
पहिल्या दिवशी ते म्हणाले... मला तुम्ही विचारा... 
कोणताही श्लोक, कसाही, उलटसुलट, मधूनच..
मी तुम्हाला म्हणून दाखवतो.

तर ते एवढे विद्वान...

आणि आम्हाला काहीच येत नाही

तर अशा गुरूंची  परीक्षा घ्यावी एवढे आम्ही मोठे आहोत का????

★आम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत की 

एवढे उत्तम व्यक्तिमत्व आम्हाला गुरू म्हणून लाभले.

लोक जे देव मानत नाहीत ते देव मानणाऱ्याला कुठे आहे. देव???? 
असं विचारतात
तसं विज्ञान सहज दाखवू शकतं काय सत्य.
(प्रयोग करून)
तसं देव???? नाही दाखवू शकत, आपण...

★अजून एक सांगते....
आता तू मंदिरात जाशील

पहिलं काय होतं आपलं???

मुर्तीकडे बघतांना....

सहज डोळे मिटले जातात,

मान झुकते, दोन हात जोडले जातात

हो ना...

★ म प्रत्यक्ष देव दिसला तर....

त्याचं तेज????? होईल का सहन आपल्या डोळ्यांना??

★ तू ना... विवेकानंद यांच्या गोष्ट वाच.

त्यांना कालिमातेने दर्शन दिले... तत्पुर्वी किती तपश्चर्या केली

रामकृष्ण परमहंसांनी किती छान मार्गदर्शन केलं

::::::::;:::::::::::::::::::::::::::::::

आता काही संकलन.

न्या. राम केशव रानडे
यांच्याबरोबर श्रीकृष्ण प्रत्यक्ष बोलतो.
आता ते आहेत का ते माहिती नाही. पण त्यांचे प्रसाद मासिकात सदर येते.
तसंच जीवनगीता हे सदर संध्यानंद पेपरमधे येते
त्यात वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना ते सांगतात....
मला अमुक अमुक प्रश्न पडला आहे तर श्रीकृष्ण त्या प्रश्नाबद्दल त्यांच्याबरोबर बोलत असे.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::

देव आहे....
अनुभवा!!!!!
हवा प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही... पण नाक दाबून धरले की हवेचा साक्षात्कार होतो.
त्याचप्रमाणे मन धरले की देवाचा साक्षात्कार होतो.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विज्ञान  व  प्रज्ञान
हे दोन्ही ज्ञानाचेच प्रकार आहेत.
विज्ञान म्हणजे विश्वाचे ज्ञान.
प्रज्ञान म्हणजे प्रभूचे ज्ञान.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असायला हवं.
लोक तर ......
देवालाही नावं ठेवतात.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

हे काही मेसेज मी मागे पाठवले आहेत.
तरी एकदा नजरेखालून घाल.
जास्त विचार करू नकोस
द्वंद्वात सापडशील.

तू आपलं तुला जे शिकायचं आहे ते मस्त शिक.

वाटलं तर ......
श्रद्धेने मंदिरात जा.
जप कर.
नमस्कार कर
पण त्यात
श्रद्धा, विश्वास हवा.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

     संकलन

  || वंदन ||

एक मस्तक, दोन हात व शरणागत भाव या केवळ तीनच गोष्टी त्याला पुरेशा आहेत.
नमस्काराइतके आदर्श असे भक्तीचे दुसरे साधन नाही त्यातच सद्बुध्दी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे.

तप केल्यासारखे शरीरकष्ट नाही. विशिष्ट उपकरणांची गरज नाही.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विनम्र व लीन होण्यासाठी काहीही लागत नाही.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

सुपुर्ण शरणांगती.....

कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवायचा असेल तर त्यावरील रामबाण उपाय...

संपूर्ण शरणांगती!

:::::::::::::::::::::::::::::::::::::::

संवाद:

● काकू मेसेज खूपच छान आहेत..आणि मला पटलंय कि देव आहे... 

चांगली माणसं आपल्याला आयुष्यात  भेटतात ही पण देवाचीच कृपा ना...

माझ्या अशा कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देणारी आपली माणसं आहेत...

ती सुद्धा माझ्याजवळ देवाने दिली आहेत...

● तुम्हाला माहिती आहे मला गोरा रंग, छान दिसण्याची खूप आवड आहे....मी देवाला सांगितलं...मला सुंदर बनव...पण त्याने मला मनाने सुंदर बनवलं...हेही नसे थोडके!

★हो हे मात्र खरंच

रंग रूप आपल्या हातात नाही

मन , विचार सुंदर हे मात्र आपण प्रयत्न करून मिळवतो.

तुला जेव्हा जमेल तेव्हा....
आनंदवन...
बाबा आमटे यांचं.
येथे अेक मुलगी....
तिचं दिसणं,......
तिला हात नाहीत
पण ती किती आनंदी असते, किती सुंदर ग्रीटिंग्ज बनवते..

पायांनी सुईदोरा ओवून भरतकाम केल्याप्रमाणे रेशमाने नाजूक डिझाईन करते...

तिची मुलाखत टिव्हीवर झाली होती.... मी तिला म्हटलं... मी तुझी मुलाखत ऐकली बघितली होती.
लगेच ती मला थँक्यू म्हणाली.
अशांकडे बघावं.

म्हणजे आपण किती छान आहोत ते कळतं!
मी स्वतः जगन्नाथ पुरी येथे जाऊन दैवी चमत्कार बघितले आहेत.

अनुभवलं आहे बरं का.!

● wow... काकू, तुम्ही माझ्या आयुष्यात नसतात तर कसं झालं असतं माझं...
तुम्हीच प्रत्येक गोष्टीत समजून घेता... आज खरंच कळलं

देव आहे

मी देवळात गेले ना.... 
तेव्हा तिथे एक बाई आल्या होत्या, एक पाय नाही अशा.
 किती भक्तीने आल्या होत्या.
आणि मी.! दोन पायांवर गेले होते तेथे, देवळात!

आणि दुपारी देवावरच संशय घेतला..!!

मला खूप रडू आलं देवळात.... मी अक्षरशः रडले देवळात...
★ अगं असं लोकांचं दुःख बघून आपल्या डोळ्यात पाणी येणं.. हे आपल्याला हृदय असल्याचं लक्षण आहे.
वेगळ्या दृष्टीने एखाद्या घटनेकडे बघणं,
कितीतरी गोष्टी शिकवून जातं

●पण ना मला हल्ली काहीही बोलण्याची भीती वाटते... 

लोक आपल्या बोलण्याचा विपर्यास करतात.

★अगं तू काही संशय नाही घेतलास.....

तुला शंका होती की देव आहे का????

जसं मन आहे का????

नाही दाखवता येतं,
फक्त आपण छातीवर हात ठेवतो आणि म्हणतो
मनाला खुप आनंद झाला!
किंवा मन दुखावलं  माझं
पण नाही दाखवता येत मन!
तसंच आहे देव..... नाही दाखवता येत
हा बघ ... हा देव!

सूर्यदेव आहेत दाखवायला खरंतर.

मला कोणीतरी प्रश्न विचारला होता....

स्वामींचा तुम्हाला काय अनुभव आहे???

★आपण स्पष्टीकरण देत बसू नये.
हे माझं मत आहे.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.
असं म्हणावं!

● खरंय काकू तुमचं!
● पण मी नाही सांगू शकत कि मला किती बरं वाटतं तुमच्याशी बोलल्यावर.

● असं वाटतं देवानेच तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं आहे.

● काहीही झालं तर पाहिलं तुमचं नाव समोर येतं.

★ एक लक्षात ठेवावं 

फक्त संकटकाळी नाही तर प्रत्येक क्षणी आठवणीने नाम घ्यावं.

श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.!

● हो खरंय तुमचं काकू... मला खरं स्वामी समर्थांचं दर्शन क्लासमुळे झालं.

त्या आधी मी कधी मठात गेले नव्हते.

 पण आता दर गुरुवारी जायचा प्रयत्न करणार आहे.

★ वेळ नसेल तर....

घरूनच नमस्कार करावा
एक तरी माळ करावी...
तुम्ही पाठीशी आहातच
ज्या चुका होत आहेत ... तर आम्हाला योग्य मार्गावरून न्या.! नम्रता अंगी बाणवा....

असे सांगावे.

● हो नक्की करेन... तुम्ही काय वाचता रोज स्वामींचे??

★ आपण त्यांची बाळं आहोत ना...

.तर आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला मिळणार हे नक्की.
नाही वाचत काही!!
फक्त कमीतकमी २ माळा जप उठल्या उठल्या करते बहुतेक.
★आणि संध्याकाळी काही स्तोत्र म्हणते.
जी माझी पाठ आहेत..
ती पण काम करता करता.

*******************************

आता हा संवाद ५ मे चा....

नामस्मरण समाप्ती च्या दिवशी.....

● स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....

आम्ही गाभाऱ्यात जायला आणि आरती सुरू करणार असं त्यांनी सांगितलं..
खूप खूप छान वाटलं!
● सकाळपासून इतकी थकले होते मठात गेले
 आणि जणू जादू झाली..शिवाय आर्यन मध्ये महाप्रसाद ... 

आणि पुढे एक छान बाई होत्या छान छान अनुभव सांगत होत्या ... 

गर्दी खूपच होती... खूप लाईन होती... पण ते अनुभव ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलं नाही
★ बघ...
असं छान ऐकलं की मन प्रसन्न होतं.
नवी उमेद येते/मिळते.

●त्या म्हणत होत्या झाडावरचं पान पण स्वामींच्या आदेशा शिवाय हलत नाही... 

 म्हणजे अहो त्या शांतच उभ्या होत्या पण एका मुलाने त्यांना प्रश्न केला स्वामी आहेत कस मानायचं?
●त्या चिडल्या नाहीत त्यांनी पटवून दिल हे मला आवडलं
★ हो
खरंच कोणतीही गोष्ट पटवून देता आली पाहिजे.

● त्या म्हणाल्या मनापासून हाक मार एकदा स्वामींना! पण कधी लबाडी करू नको, खोट बोलू नको. मग बघ तुला जाणवेल स्वामी आहेत.

● आणि त्याने विचारलं पूजा कशी करू??

त्या म्हणाल्या फक्त नामस्मरण करत राहा.

★ हवा प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही...
 पण नाक दाबून धरले की हवेचा साक्षात्कार होतो.
त्याचप्रमाणे मन धरले की देवाचा साक्षात्कार होतो.

★नाक दाबून धर

स्वामी आठवतीलच....

बघ करून!
असं सांगायचं!

★नामस्मरण.....

मी पण तुला हेच सांगते.
●किती गर्दी होती पण खूपच... आज हया धकाधकीच्या जीवनात कमाल वाटली... इतकी गर्दी मी कुठल्याही देवळात नाही पाहिली..
● मला तुमचीच आठवण झाली तेव्हा.
● मीही तुम्हाला असंच विचारल होत ना!

★हो ना!

किती सुंदर संवाद झाला आपला!

(जो प्रथम झालाय तो)
●हो ना.
●आणि महाप्रसादाची लाईन तर दूरवर होती.

★ देव आहे नाही ह्या वादात पडू नये.

आपण मानतो

स्पष्ट सांगावे , मी मानते.
मी तुला जबरदस्ती करत नाही.
पटलं तर घे,
नाहीतर सोडून दे.

असं सांगावं.

असे लोक वाद करण्यात, आपल्या श्रद्धेला हसण्यात पटाईत असतात.

आपण दुर्लक्ष करावे....

आणि आपल्याला पटतं ते करावं!

पण कोणाला न घाबरता

न लपवता.

है ना बॉस......

★ नाम एकदा घेतले तरी चालेल

पण श्रद्धेने विश्वासाने घ्यावे

परीक्षा पाहू नये.

● yesss bosss...

आपने तो बहोत बढिया बताया....

★ त्यापेक्षा मला अभ्यास करण्याची बुद्धी द्या, मेहनत करण्याची ताकद द्या.

म यश अपयश जे आहे ते तुम्ही देणार आहात.

● yess....

● देवाला काय आवडतं??

★ अगं पान, फुलं, फळं
काहीही देवाला मनापासुन दिलेलं आवडतं.

पैसे ठेवणं... म्हणजे पैशाचा लोभ राहू नये.

★ केव्हाही दोन जोडलेले हात आणि झुकलेलं मस्तक...

अजुन काही नसलं तरी चालतं!

✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽ ✽