संध्याकाळची शेवटची राइड
निघालो... साडेतीन वाजता,
आज जरा कमी उन्ह जाणवतंय... उन्हामुळे जंगल शांत.!
कुठेच जास्त प्राणी पक्षी दिसत नाहीत. फक्त तहान लागली तरच ते पाणवठ्यावर येतात.
आणि इकडे मानवनिर्मित पाण्याचे टँक.!
सिंहिण आणि तिची पिल्लं पाहिली होती.
आज जरा कमी उन्ह जाणवतंय... उन्हामुळे जंगल शांत.!
कुठेच जास्त प्राणी पक्षी दिसत नाहीत. फक्त तहान लागली तरच ते पाणवठ्यावर येतात.
आणि इकडे मानवनिर्मित पाण्याचे टँक.!
सिंहिण आणि तिची पिल्लं पाहिली होती.
पण जंगलच्या राजाचे दर्शन मात्र झाले नव्हते.
होईल का दर्शन???
आणि तो क्षण आला.....
राजा व राणी पाणी पिण्यासाठी त्या टँकजवळ आले.
आणि पाणी पिऊन गारव्याला बसले.
आमच्याकडे पाठ होती. पण मधुन मधुन त्यांची हालचाल होत होती
आमच्याकडे पाठ होती. पण मधुन मधुन त्यांची हालचाल होत होती
आणि राजा.... रुबाबात बसला....
काय त्या क्षणाचे वर्णन करावे???
तेवढ्यात उजवीकडे दूरवर हालचाल दिसू लागली. काय बरं असेल???
ओ…...
किती तरी पाय दिसू लागले. आणि एक... दोन... तीन... अरे बापरे..!
राजाचा पूर्ण परीवार तीन पिल्लांसह पाणी प्यायला आला....
काय ते दृश्य वर्णावे ????
नुसतंच बघत राहिलो..... आणि आलेलं कुटुंब पाणी पिऊन डावीकडे शांतपणे जंगलात गेले...
गाईड सांगत होता...
गाईड सांगत होता...
. की ४० किमीचा परीसर एका सिंहाचा असतो. तेथे दुसरा सिंह
राहत नाही..
जर दुसरा सिंह आला तर त्यांचे भांडण होते.
आणि ..… एकाचे मरण
किंवा त्याला युद्ध सोडून जावे लागते.
एका सिंहाच्या कुटुंबामध्ये पाचसहा सिंहिणी आणि एक सिंह असतो. आणि त्याची पिल्लं असतात.
सिंह स्वतःची शिकार स्वतः करतो. तो कोणी केलेली शिकार खात नाही.
सर्वसाधारण आयुष्य १८ वर्ष आहे. जेव्हा त्याला शिकार करता येत नाही....

म्हातारा झाल्यामुळे तेव्हा... त्याचा मृत्यू होतो.
•••••००•••••००•••••००•••••००•• •••
आम्ही एकुण चार सफारी केल्या.
सोमनाथहून येतांना मी रस्ता ओलांडतांना दोन सिंहिणी बघितल्या.
पहिल्या सफारीला एक सिहिंण तिच्या तीन पिलांसह बघितली.
दुसरी दुपारची राईड... एके
ठिकाणी एक झोपलेली सिंहिण बघितली.
पुढे झाडाच्या सावलीत
आधी एक आणि काही क्षणाच्या अंतरावरच अजुन तीन ... यात बहुतेक पिलं पण असावीत..
पुढे झाडाच्या सावलीत
आधी एक आणि काही क्षणाच्या अंतरावरच अजुन तीन ... यात बहुतेक पिलं पण असावीत..
दुसऱ्या दिवशी सकाळी नैसर्गिक कपालेश्वर तलावात जलचर प्राणी...
आणि दुपारच्या म्हणजेच शेवटच्या राईडला मात्र
जंगलचा राजा... त्याच्या पूर्ण कुटुंबियांसह दिसला...
No comments:
Post a Comment