Thursday, 26 May 2016

मान्सून पूर्व

सुप्रभात...

     मस्त सकाळ...जाग आली... एकदम फ्रेश वाटलं... चला जाऊ फिरायला....!
अगं, पाऊस पडून गेलाय..
ओह.... जागी असते तर....भिजले असते...
मस्त... लगेच तयार होऊन बाहेर पडले..... 
ओह....छानच पडलाय पाऊस !!!!
 जिथे खळगे आहेत तेथे पाणी साचलंय !!
        रस्ते स्वच्छ दिसत आहेत...
झाडं सुद्धा छान दिसत आहेत. धुळ गेलीय पानांवरची!

आता झाडं थोडी तोडतील, वेड्यावाकड्या फांद्या, बसला अडणाऱ्या तोडल्या जातील.
हा काही पावसाळा नाही. मान्सून पूर्व आहे पाऊस. 
असुदे....

तापमान तर खाली आलेलं दिसतंय मोबाईलवर!

काल परवा पाऊस पडला पण अगदी शिंतडल्यासारखा.. स्प्रे पेन्टिंग....
अंबामातेचे दर्शन घेतले....
      समुद्र वेगळाच सुरेख दिसला. आकाश आकाशी
 पण काही ढग पांढरे, काही पावसाळी, तर काही नुसतेच काळसर. या साऱ्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसत होते. अजून सूर्योदय व्हायचा आहे...
 पण हा जो पांढरा ढग दिसतोय ना.... 
तो मस्त सोनेरी झाला आणि पाणी सोनेरी दिसू लागले. अजूनही चंद्रदर्शन होतंय...
कसं होईल सूर्यदर्शन????

होणार ना..

तर जेथून सूर्योदय होणार आहे तेथे डोंगर भासावेत असे ढग ....
 पण काळे. मन थोडं नाराज झालं, 
दहा मिनिटे उभी राहिले तरी सूर्यदेवांचे दर्शन होणार नाही.
आणि जे होईल ते प्रखर... नुसत्या डोळ्यांनी बघता येणार नाही.
असं वाटलं...
पण तेवढ्यात त्या ढगाला सुंदर सोनेरी किनार आली....

 आणि सूर्याचे किरण चित्रात दाखवतात तसे सुरेख दिसू लागले... 

दोन मिनिटे उभी राहिले.
या छान दृश्याचा आनंद घेतला.
(मोबाईल घेतला नव्हता, नाहीतर सुरेख फोटो घेता आला असता...)
असो सुंदर दर्शन झाले. परत चालायला सुरुवात केली.     स्टेशनकडे आले.
    रेल्वे आलीच.
 दहा पावले धावले. आणि जनरल डब्यातच बसले.
 नाहीतर मग वाट बघायला लागेल गाडीची.... 
सकाळची वेळ, वेळाने गाडी असेल तर???
हातचं सोडून पळत्याच्या पाठी असं नको व्हायला....

एकंदरीत दिवसाची सुरवात छान झाली...

✽ ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽ ✽

No comments:

Post a Comment