असंच नेहमी माझ्या मनात येत.....
आपण मुंबईत राहतो तरी....
पहिला पाऊस पडल्यावर
मातीचा सुगंध तसाच येतो.
काही ठिकाणी पहाटे कोंबड्याचे आरवणे ऐकू येते.
वसंत ऋतूचे आगमन झाले हे कोकीळ गाऊन सांगतो.
सकाळी पक्षांची किलबिल,
काही वेळा वेगळे पक्षी दर्शन.!!!
पोपटांचा थवा..उडतांना दिसतो...
दादर, लोअर परळ याठिकाणी बगळे दिसतात.
तसंच साळुंखी दर्शन होते.
घुबडं, गिधाडं, घारी, वटवाघळं दिसतात.
खारूताई धावतांना दिसतात.
माकडं फिरतांना दिसतात
कधीतरी वाघ सिंह बोरीवली ठाणे या भागात दिसतात
ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ
आंब्याला आलेला मोहोर,
झाडाला लागलेले आंबे,
फणस बघायला मिळतात.
जांभळं,... रस्त्यांवर पडलेली दिसतात.
बदाम फळं.. उंबरं..
ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ
बैलगाड्या दिसतात
गाई, वासरे दिसतात.
卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐
देवळातील घंटानाद ऐकू येतो
卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐
शांत समुद्र, सुंदर किनारे.
अनुभवता येतात.
येथे येणारे फ्लेमिंगो, समुद्र पक्षी..
अनुभवता येतात.
येथे येणारे फ्लेमिंगो, समुद्र पक्षी..
रस्त्याने, मोठे वृक्ष, वड, पिंपळ, गुंजा,
तसंच, माड, बदाम,
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
फुलझाडे, फुलांनी बहरलेली,
लॅबर्नम, तगर, बोगनवेल,
चाफा... देवचाफा, नागचाफा , पांढरा चाफा, लालचाफा
... वेगवेगळा,
जास्वंदी, कण्हेर, गोकर्ण, बिट्टी, शंकासुर, गुलमोहोर,
रातराणी, बकुळी, मधुमालती, पारिजातक,....
बघायला मिळतात.
बघायला मिळतात.
No comments:
Post a Comment