Sunday, 1 May 2016

१ मे ची संध्याकाळ...

सफारीसाठी दुपारी अडीच वाजता निघालो.... 

उन्ह मी म्हणत होते.

 पण काहीना काही जंगलात बघायला मिळेल.... या आशेने निघालो.! 

एकदम रखरखीत जंगल...

 पक्षी मात्र दिसत होते.
 आणि समोरून येणाऱ्या जीपमधील गाईडने माहिती दिली... 
पाणी पिण्यासाठी वाघीण ---- (अमुक अमुक) या स्पॉटला आलीय...
 चला निघालो त्या बाजुला... 
आणि खरंच त्याठिकाणी सावलीत ती झोपली होती 
चेहरा तहानेने उन्हामुळे वेगळाच दिसत होता..
 पाच मिनिटे वाट बघितली... पण ती झोपली होती... म तेथून निघालो...
 अशीच खुप दाट झाडी असलेलं सावलीच्या ठिकाणी आलो.
 तेथे तर तीन सिंहिणी होत्या. पण झोपलेल्या. एक तर उताणी झोपली होती... 

 गाईड म्हणाला अन्न पचविण्यासाठी ती अशी झोपली आहे.. 

आणि दुसऱ्या दोन मात्र कुशीवर झोपल्या होत्या.
आमच्या ग्रुपच्या पाच जीप्स होत्या.
कोणाला सिंहिण आणि तिची पिल्लं
त्यात दोन छावे दिसले.

आताचे राजकुमार









भावी जंगलचे राजे.!

एक अगदी पिलु घुबड अशाच छोट्या ढोलीत बसले होते.. ते बघितले.…. 







                                                                                                         

 अजून एक पक्षी तासन् तास एकाच ठिकाणी बसतो तो बघितला.
खुप हरणं, माकडं, सांबर बघितले... या जंगलात ४२००० हजार हरणं आहेत.
बिबट्या बघण्याची संधी मात्र हुकली. 
एका जीपने पाणी प्यायला आलेला बिबट्या बघितला.!
तेथे आजूबाजुने मोर होते... पण तो पटकन निघून गेला....
अजून दोन राइड आहेत.

बघू....काय काय मिळतंय बघायला, अनुभवायला.!

No comments:

Post a Comment