Saturday, 28 May 2016

कांदा....

कांदा....

चिरताना डोळ्यातून पाणी काढणारी एकमेव भाजी.!

चिरताना पाणी येत तर काय करावे....
* डोक्यावर कांद्याची साले ठेवावीत,
* कांदा पाण्यात थोडा वेळ ठेवावा.
नंतर चिरावा.
★ चिरलेल्या कांद्यावर कोथिंबीर चिरून ठेवावी म्हणजे वास पसरत नाही.

 कांद्याची फुले 




◆ कांद्याचे प्रकार.....

कांदे दोन प्रकारचे असतात,
  लाल पांढरे.
तसच, तो सुखा ओला असतो.
कांद्याच्या माळा.... मिळतात या मूळे तो लवकर खराब होत नाही

* मस्त पाऊस आणि कांदा भजी....wow...

* कांदा उभा चिरला कि भजी सुरेख होतात. 

यालाच काहीजण खेकडा भजी म्हणतात.

* मुलीला दाखवण्याच्या वेळी कांदे पोहे...कार्यक्रम करतात.

★ कांदे जे अगदी छोटे असतात ते व्हिनेगर च्या पाण्यात टाकतात. 
असे कांदे खाण्यास चांगले लागतात.
आमटीत, मूग खिचडीत छोटे अख्खे कांदे छान लागतात.
★ चिवड्याबरोबर कच्चा कांदा छान लागतो,

★ कांद्याची कोशिंबीर...

खूप उन्हाळा असतो तेव्हा कांदा जवळ बाळगतात.
 कानात कप करून ठेवतात, डोक्यावर ठेवतात.
★ पांढरा कांदा औषधी असतो असं म्हणतात.

★ पावसाच्या सुरुवातीला कांदा आणि ओवा असा रस प्याला जातो.

चक्कर आली, फीट आली तर कांदा फोडून हुंगवला जातो.

■ चातुर्मासात म्हणजे पावसाळा सुरु झाल्या नंतर खात नाहीत.

(आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कांदा हे मूळ आहे.
त्याचा भाजी म्हणून वापर करतात.
कच्चा खाल्ला जातो...
कांदा खोबरे वाटण करून अनेक भाज्या, उसळी करतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कांद्यावरून म्हणी
नाकाने कांदे सोलणे..
कोणी रागवलं तर म्हणतात....
"नाकाचा शेंडा बघ कसा लाल झाला...."
नाकावरच्या
रागाला औषध काय???

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

◆ सरकारने कांदा भाव ठरवला
आंदोलन झाले..
◆ सर्वांत जास्त कांदा पिकावणारा जिल्हा नाशिक आहे.
◆ बँकांचे पगार कांदा बटाट्याच्या भाववरून ठरतात.

● एखाद्याला काही येत नसेल तर....

★अकलेचा कांदा आहेस अगदी असे म्हणतात.

किंवा...

◆डोक्यात कांदे बटाटे भरलेत का?? असे विचारतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लाल कांदे, पांढरे कांदे...
याच्या माळा मिळतात.
● चुलीत भाजलेले कांदे....गोड लागतात.
● कांदा पात वापरून सूप, पुलाव, भाजी करतात.
● कांद्याचे मस्त डेकोशन करता येते..

●कांदा उभा चिरला तर

शंखाकृती दिसतो,

 आडवा चिरला तर 

चक्राकृती दिसतो.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आता कांद्याबद्दल आलेले दोन छान मेसेज.....

मैत्री ही एक

कांद्या सारखी आहे,

 ज्याला भरपूर थर आहेत,
 जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील .........

 पण

जर तूम्ही त्याना मधेच कापण्याचा प्रयत्न
केलात तर ते

तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!!

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

कृष्णावळ -

अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही.
कृष्णावळचा अर्थ कांदा ! 
कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.
कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो.

शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत.

 ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात,
 म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय

 या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.
 आणि

 पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार 

 व 

 पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.

۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞۞

 

कांद्याचे डेकोरेशन

 




 कांद्याची फुले


 कांदा भजी …… खेकडा भजी 

Friday, 27 May 2016

चंदेरी किनार....


फिरायला बाहेर पडले....

आज खुपच पाऊस भरलेले ढग..... 

भिजायला मिळणार वाटतं...

 तेवढ्यात सूर्याचे दर्शन !!

 बघता येत नव्हते इतके प्रखर.. 

आणि बाकी आकाश दमट ओलसर पावसाळी! 

 तेवढ्यात एकदोन थेंब  चष्म्याच्या काचेवर पडले.....

 मग बसलो बाकावर. 
 समुद्राचे पाणी काळसर दिसतंय. 
 समुद्रात छोट्या छोट्या नावा दिसत आहेत... 
 हौशी लोक नाव वल्ल्हवण्याचा आनंद घेत आहेत.

आणि इकडे पूर्वेला,

या ढगांना सुंदर चंदेरी किनार..

 बघत रहावे या ढगांकडे.... 
आणि समोर ..................... दूरवर 

दिसणारा फ्लाय ओव्हर ब्रिज मात्र पाण्याने ओला भासत होता.

(काल मध्यरात्री कधीतरी छान पाऊस पडून गेला होता,
 जर फिरायला जायच्या वेळी पडला तर भिजता येईल.)
आणि घरी आलो तेव्हा मात्र यातील काहीच नाही.

 सूर्यदेव प्रखर झाले.

*******************************

Thursday, 26 May 2016

मान्सून पूर्व

सुप्रभात...

     मस्त सकाळ...जाग आली... एकदम फ्रेश वाटलं... चला जाऊ फिरायला....!
अगं, पाऊस पडून गेलाय..
ओह.... जागी असते तर....भिजले असते...
मस्त... लगेच तयार होऊन बाहेर पडले..... 
ओह....छानच पडलाय पाऊस !!!!
 जिथे खळगे आहेत तेथे पाणी साचलंय !!
        रस्ते स्वच्छ दिसत आहेत...
झाडं सुद्धा छान दिसत आहेत. धुळ गेलीय पानांवरची!

आता झाडं थोडी तोडतील, वेड्यावाकड्या फांद्या, बसला अडणाऱ्या तोडल्या जातील.
हा काही पावसाळा नाही. मान्सून पूर्व आहे पाऊस. 
असुदे....

तापमान तर खाली आलेलं दिसतंय मोबाईलवर!

काल परवा पाऊस पडला पण अगदी शिंतडल्यासारखा.. स्प्रे पेन्टिंग....
अंबामातेचे दर्शन घेतले....
      समुद्र वेगळाच सुरेख दिसला. आकाश आकाशी
 पण काही ढग पांढरे, काही पावसाळी, तर काही नुसतेच काळसर. या साऱ्याचे प्रतिबिंब पाण्यात दिसत होते. अजून सूर्योदय व्हायचा आहे...
 पण हा जो पांढरा ढग दिसतोय ना.... 
तो मस्त सोनेरी झाला आणि पाणी सोनेरी दिसू लागले. अजूनही चंद्रदर्शन होतंय...
कसं होईल सूर्यदर्शन????

होणार ना..

तर जेथून सूर्योदय होणार आहे तेथे डोंगर भासावेत असे ढग ....
 पण काळे. मन थोडं नाराज झालं, 
दहा मिनिटे उभी राहिले तरी सूर्यदेवांचे दर्शन होणार नाही.
आणि जे होईल ते प्रखर... नुसत्या डोळ्यांनी बघता येणार नाही.
असं वाटलं...
पण तेवढ्यात त्या ढगाला सुंदर सोनेरी किनार आली....

 आणि सूर्याचे किरण चित्रात दाखवतात तसे सुरेख दिसू लागले... 

दोन मिनिटे उभी राहिले.
या छान दृश्याचा आनंद घेतला.
(मोबाईल घेतला नव्हता, नाहीतर सुरेख फोटो घेता आला असता...)
असो सुंदर दर्शन झाले. परत चालायला सुरुवात केली.     स्टेशनकडे आले.
    रेल्वे आलीच.
 दहा पावले धावले. आणि जनरल डब्यातच बसले.
 नाहीतर मग वाट बघायला लागेल गाडीची.... 
सकाळची वेळ, वेळाने गाडी असेल तर???
हातचं सोडून पळत्याच्या पाठी असं नको व्हायला....

एकंदरीत दिवसाची सुरवात छान झाली...

✽ ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽ ✽

Wednesday, 25 May 2016

आस्वाद, आनंद.!!!!!


अनेक गोष्टींचा आपण आस्वाद देतो घेतो का????

परवाच मठात जात होतो,
 छान सकाळची वेळ...अजून हवेत गारवा आहे... 

लॅबर्नमचा सडा पडलाय..

समोरून एक मुलगी... क्लासला असेल, निघालीय...
चेहऱ्यावर भाव असे कि सर्व जगाची काळजी हिलाच दिली आहे...
तिचं या गालीचावरून जात आहोत हे लक्षात तरी आलं असेल का...

*******************************

झाड फुलांनी बहरलय....

निसर्ग, आनंद लुटतोय...
वातावरण सुगन्धी फुलांनी बहरलय....

✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽ ✽

मॉर्निंग वॉकला जातात,

 सुंदर सूर्योदय होतो, 
कोणाचं लक्ष असत का????
 भरभर चालतात.

◎◎  ◎◎  ◎◎  ◎◎  ◎◎  ◎◎  ◎◎  ◎◎

रेल्वे प्रवासात कोणी बासरीवर छान गाणं वाजवतो,

 देतात का दाद त्यांना???
कोणी छान ड्रेस घातला, छान साडी नेसली....
किती वेळ लागेल हे सांगायला???
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोणी वेगळं शिकतंय,

 त्याची माहिती विचारायला किती वेळ लागेल??

๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑ ๑

लहान मुलाने चित्र काढलं, तर त्याला दाद द्यायला.....

त्याला त्या चित्रबद्दल विचारायला.....

पण वेळ ?????  कुणाला?

*******************************

रस्त्यावर खडूने सुंदर चित्र काढणारे.....

कुठे घेतलंय शिक्षण... 
त्याचं कौतुक केलय कधी????

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆

एखादं कला प्रदर्शन बघायला जातो....

भेटलात का कधी त्या कलाकाराला?

किती आनंद होतो त्यांना आणि आपल्याला.....

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

फुगेवाला...

.किती सुंदर बनवतात फुग्यांचे आकार...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

मंदिरातील पुजारी.....

 फुलांची सुंदर आरास करतात, 
एका विशिष्ट पद्धतीने गंध लावतात देवाला.... 
सांगितलंय कधी त्यांना....

 कि कधी लक्षातच नाही येत या गोष्टी आपल्या?

★★★★★★★★★★★★★★★
मनाला झालेला आनंद हा वाटला तर समोरचा हि आनंदी होईल. 
आणि व्यक्त झाल्यामुळे आपण सुद्धा ...

<><><><><><><><><><><><><>

Saturday, 21 May 2016

फणस.!



हे चित्र आलं आणि मन बालपणात गेलं.....

भटो भटो...
ओ sss
कुठे निघालात??
कोकणात...
कोकणातून काय आणणार....
फणस....
फणसsss
कापा कि बरका
कापा.
कसा कापू????
उभा...कि आडवा????

फणसात काय??
गरे
गऱ्यात काय??
आठळ्या.

तुम्ही खा गरे
आम्ही खातो गरे

म्हशीला काय???
चारखंड....

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

हे अगदी बालपणातील गाणं
मूल अगदी हसू लागे...

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

तसंच दुसरं गाणं....

अगदी अभिनय करून मुलं म्हणत....

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

झाडावरून आंबा ঠ पडला
टुणकन जाऊन टोपलीत बसला

फणसबुवा हळूच हसला

पोट धरून पेटीत बसला

फणसाची पेटी,

आंब्याची ঠ टोपली

सरकत सरकत
बोटीत बसली.

भो भो भो भो वाजला भोंगा

उभा होता.....मुंबईचा टांगा

फणस आंबे टांग्यात बसले.

टांगा मोटार झाली टक्कर

फणस बुवांना आली चक्कर

आंबा ঠ गेला गडगडत

फणस गेला धडपडत

आंब्याचा ঠ झाला चेंदामेंदा

फणसाचा झाला लोळागोळा

नको नको बुवा.... मुंबईची हवा

कोंकण आपले बरे बुवा....

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

तर....
बघूया...या विषयी....
ही कोकणातली मस्त न्याहरी आहे.
याचे दोन प्रकार....

कापा, बरका...

(अजून एक विलायती)

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

सर्वसाधारण कापा फणस सगळ्यांना आवडतो.
कारण याचे गरे खाण्यास सोपे असतात.
बरका फणस खरंतर खाण्यास गोड.... 
पण सगळ्यांनाच खाता येतो असं नाही.
 याच्या बिया...(आठल्या) खूप छान लागतात.
याचा रस पूर्वी चाळणीवर काढत असत.
 आता मिक्सर वर काढतात.
या पासून सांदणं, इडली बनते.
या बरोबर नारळाचे दूध मस्त लागते.
फणसाची कढी,
फणस पोळी (साट)
व्वा....

फणसाचे तळलेले गरे,

हे खोबरेल तेलात तळतात.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

बाळ फणस असेल तर त्याची भाजी मस्तच लागते.

 यालाच फणसाची कुयरी म्हणतात 

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

*विलायती फणस* - आकाराने लहान असतो.
याची भाजी करतात.
याचे काटे बोथट असतात.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

फणस फोडणे थोडे त्रासदायक असते...

कारण त्याचा चीक,
आणि .....
वरचे आवरण कठीण काटेरी असते.
याच्या मध्यभागी जी 'पाव' असते 
तिला गरे असतात पण तेथेच चीक असतो.

कोयतीला  तेल लावलं कि चिकाचा त्रास होत नाही.

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

बरका फणस फोडायला सोपा.... 
जरा कोयती लावायची. आणि दोन्ही हातांनी फोडायचा...
गरे आपोआप निघतात.....

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

   ❀  *याच्या बिया....*

आठळ्या...

  नुसत्या मीठ टाकून उकडून, किंवा चुलीत भाजून खातात.

आणि पावसाची बेगमी....
माती लावून वाळवायच्या आणि पावसाळ्यात भाजी करायची. भाजीला 'खेड' म्हणतात.
❀  जो वरचा काटेरी भाग असतो त्याला चारखंड म्हणतात..
तो गाईगुरांना खायला घालतात.

  फणसाची पाने....
 तुकतुकीत असतात. याचे द्रोण करतात व त्यात इडली करू शकतो.

हे झाड नेहमी हिरवे दिसते.

  फणस,

 झाडाच्या खोडाला लागतात.. 
फळ मोठे आणि वजनदार असते.
 एकएका झाडाला खूप फणस लागतात...

  याचे लाकूड... 

फळ्या करून पेट्या बनवतात...त्यात आंबे ठेवतात.

फळ्या, फर्निचरसाठी उपयोगी आहे.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

याची इडली खायची असेल तर

 माटुंगा इस्टला ..... मिळेल..
येथे. फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या मिळतात असं हॉटेल आहे.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

आता भाजी करण्याची कटकट वाटत नाही 
कारण फणस कापून शिजवून याची पँकेट्स पण मिळतात. 
किंव टीनमध्ये.!
आपल्या आवडीप्रमाणे भाजी बनवता येते झटपट.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

सांदण: हेसुद्धा पॅकेट मधे उपलब्ध असतं. 

फक्त दिलेल्या सुचनेनुसार बनवायचं

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

सध्या फणसपोळी, तळलेले गरे

 हा खास कोकणमेवा कुठेही मिळतो.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

आमच्या वाडीच्या गेट वर एक झाड आहे. 
आणि याला एक फणस लागला होता 
आणि मी पाहिला होता तो.!

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

एक अगदी फणसानी भरलेलं झाड बघितलं होतं

 ते दूरदर्शनच्या बस स्टॉपच्या मागे 

महादेवाचं मंदीर आहे तेथे बघितलं होतं.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

आताच कधीतरी वाचलं कि मधुमेहींसाठी हे उपयुक्त फळ आहे.

अजून एक...
 हे फळ उन्हाळ्यातील असले तरी
वट पौर्णिमा....वाणात याचे (महत्त्व) गरे असतात...

त्यावेळी मुंबईत ढिगाढिगनी कोंकणातले फणस दिसतात...

एरव्ही मुंबईत केरळच्या बाजूचे फणस (गरे) मिळतात.

˘︶˘   ˘︶˘   ˘︶˘   ˘︶˘  ˘︶˘   ˘︶˘

 एक विशेषण 

 वरून कठोर पण 

तितक्याच मनाने  प्रेमळ  असणाऱ्या माणसाला 

फणसाचे विशेषण देतात

 

 

Tuesday, 17 May 2016

आपण मुंबईत राहतो तरी....

असंच नेहमी माझ्या मनात येत.....

आपण मुंबईत राहतो तरी....

पहिला पाऊस पडल्यावर

मातीचा सुगंध तसाच येतो.

काही ठिकाणी पहाटे कोंबड्याचे आरवणे ऐकू येते.

वसंत ऋतूचे आगमन झाले  हे कोकीळ गाऊन सांगतो.

सकाळी पक्षांची किलबिल,

काही वेळा वेगळे पक्षी दर्शन.!!!

पोपटांचा थवा..उडतांना दिसतो...

दादर, लोअर परळ याठिकाणी बगळे दिसतात.
तसंच साळुंखी दर्शन होते.

घुबडं, गिधाडं, घारी, वटवाघळं दिसतात.

खारूताई धावतांना दिसतात.

 माकडं फिरतांना दिसतात 

कधीतरी वाघ सिंह बोरीवली ठाणे या भागात  दिसतात

ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

आंब्याला आलेला मोहोर,

झाडाला लागलेले आंबे,

फणस बघायला मिळतात.

जांभळं,... रस्त्यांवर पडलेली दिसतात.

बदाम फळं.. उंबरं..

ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ  ঠ

बैलगाड्या दिसतात

गाई, वासरे दिसतात.

卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐

देवळातील घंटानाद ऐकू येतो

卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐

शांत समुद्र, सुंदर किनारे.
अनुभवता येतात.

येथे येणारे फ्लेमिंगो, समुद्र पक्षी..

रस्त्याने, मोठे वृक्ष, वड, पिंपळ, गुंजा,

तसंच, माड, बदाम,

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

फुलझाडे, फुलांनी बहरलेली,

लॅबर्नम, तगर, बोगनवेल, 
चाफा... देवचाफा, नागचाफा , पांढरा चाफा, लालचाफा ... वेगवेगळा,
 जास्वंदी, कण्हेर, गोकर्ण, बिट्टी, शंकासुर, गुलमोहोर, रातराणी, बकुळी, मधुमालती, पारिजातक,....
बघायला मिळतात.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

लवकरच पाऊस येणार असा सांगणारा बहावा फुलतो.

❀  ❀  ❀  ❀  ❀  ❀  ❀  ❀  ❀

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रदर्शन,
आनंद देते.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

निसर्गातील सगळे बदल अनुभवता येतात.

◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎

नव्या जुन्याचा संगम मुंबईतच अनुभवता येतो.

◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎ ◎◎

 


 

Friday, 13 May 2016

आई.... आणि तिचा खाऊ.!

बालपण...

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

आई.... आणि तिचा खाऊ.!

किती वेगवेगळे पदार्थ???
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

केक... रव्याचा,

 तव्यावर वाळू पसरून करत होती..

सुंदर....

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

नानकटाई .... 

मिश्रण तयार करून
 बेकरी मधून भाजून आणायची...

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

ढोकळा, इडली

 फारच छान करायची.
त्यावेळी फ्रिज हि गरजेची वस्तू नव्हती तर चैनीची असेल... 
थोडक्यात घरी फ्रिज नव्हता 
तरी घरी केलेल्या भाजणीचे थालीपीठ
 आणि

 त्यावर मऊ लुसलुशीत लोण्याचा गोळा.....

कोथिंबीर छान हिरवीगार ...ओलं खोबरं चांगलं राहावं म्हणून केलेले प्रयत्न.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

पातळ पोह्यांचा चिवडा.

आईने करायला घेतला कि पाहुण्यांची रीघ... फारच चटकदार होत असे.
आईने करायला घेतला कि... आई म्हणे... आज पाहुणे येणार...
तसंच अजून एक सुरेख खाऊ म्हणजे...

तांदुळाचे घावन, नारळाचे दूध, चटणी...

आणि या सारखाच एक पदार्थ.... आंबोळी

वाह.... क्या बात है.!

असाच आवडता खाऊ...
खांडवी, आणि तांदुळाच्या शेवया- नारळाचे दूध.! वाह!

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

अगदी पदार्थ करायला घ्यावा आणि पाहुणे....

 असा अजून एक पदार्थ म्हणजे टोमॅटो ऑम्लेट.!
भेळ, पाणीपुरी, बटाटे वडे, भाजणी वडे..घारगे,
तिखटमिठाच्या पुऱ्या
कणकेचा शिरा, गोड शिरा,
लाडू, व वड्यांचे प्रकार, लिस्ट मोठीच होईल...
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
अचानक कोणी उपास म्हणाले तर....
 केलेल्या वाळवण प्रकारातील
 बटाट्याचा किस पाण्यात टाकून बोलता बोलता पदार्थ तयार.... 
जोडीला तळण...
उपवास आहे तर
 घरीच दाण्याची चिक्की . आणि साबुदाणा वडा.!

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

मिक्सर तर नव्हताच...

सूप्स... 

कढी,या कढीचे प्रकार.. टोमॅटो सार, कुळीथ कळण, सोलकढी,
भाताची पेज..

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

मऊ भात

 हा पटकन होणारा नाही...
 तांदूळ तुपावर भाजायचे, मग पाट्यावर वाटायचे.
 तो मंद आचेवर शिजवून त्याला तूप मीठ घालून पानात वाढायचा.
 तो पानात पसरता कामा नये. जोडीला तोंडी लावणे...  लोणचे, पापड...

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

खिचडी कधी एकाच प्रकाराने बनली नाही

๑๑ ✧ ๑́๑ ✧ ๑́๑ ✧ ๑́๑ ✧

एक आगळा वेगळा खाऊ ... मोदक....

Superb.!

๑๑ ✧ ๑́๑ ✧ ๑́๑ ✧ ๑́๑ ✧

पोळी बरोबर.........

 शिकरण...
 कधी गोल चकत्यांची. तर कधी नारळाचे दूध.
तर कधी केळी पाक,
कधी टोमॅटो पाक, कधी अननस पाक
मोरंबा, गुळांबा
दही साखर त्यात वेलची
किंवा जायफळ..

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

तसं कॉफी करणं एक सोहळाच...
जायफळ किंवा वेलची लावल्याशिवाय ती बनत नसे..

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

आणि हे करताना कोणी काही आता सारखं थँक्यू म्हणत नव्हतं..
सगळे समाधानी, आनंदी दिसले कि केलेलं काम भरून पावे.!
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
पुन्हा नव्या खाऊच्या शोधात.!
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
आणि फ्रिज मिक्सर, आल्यावर तर धम्माल....

खाऊच खाऊ...

Friday, 6 May 2016

फोटो... गीर सफारीचे


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

कुणी कुणी काढलेले.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

बिबट्या.... जो मला दिसला नाही

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

 

 

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जंगलच्या राण्या..... पाणी पितांना

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

 

 

 

 

 

 यामध्ये राजकुमार उजवीकडे 

<><><><><><><><><><><><><>

जंगलचा राजा..... 

नुसतं बघितलं तरी... केवढा दरारा.!

<><><><><><><><><><><><><>

 

  राजा राणी

 
सिंह सिंहीण

 

 

 

 राजकुमार 

 

 

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

जंगलच्या राजाची एक वेगळीच शान !!!

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 

********************************

हरणं.... जागोजागी दिसतात.

कान टवकारून कानोसा घेतात.

********************************

 

  अजून काही सिंह ,सिंहिणी आणि पिल्लं 

 



 

Thursday, 5 May 2016

आज स्वामींची १३८ वी पुण्यतिथी.!

सुप्रभात....

आज गुरुवार
चला मठात जाऊ....
छान उजाडलंय.!
पण सुर्योदय झाला नाही. 

 सुर्यदर्शन लगेच होत नाही.
 खुप काळे ढग असतात. सूर्य उगवेल तेथे.!
 पण ढगांची सोनेरी किनार मात्र मस्त दिसते... ढग काळा असो किंवा पांढरा.!
हवेत छान सुखद गारवा...
केनेडी ब्रीज वर सुंदर असा लॅबर्नम स्वागत करतोय.
या लॅबर्नमचं मराठी नाव सोनमोगरा आहे असं म्हणालं कुणीतरी.!
पिवळ्या पांढऱ्या रंगाची फुलं छानच वाटतात.. उन्हाळ्यात
तशी बोगनवेल कुठल्याही रंगातली मस्त दिसते.
तसंच चाफा
चाफा म तो कोणताही...
 देवचाफा,
 पांढरा चाफा, 
नागचाफा,
 सोनचाफा.. 
हिरवा चाफा,
 कवठीचाफा.!

 सुरेखच 

**********************************************************************************

आज स्वामींची १३८ वी पुण्यतिथी.!

!!!!! अनंतकोटी ब्रह्मांड नायक
 राजाधिराज योगिराज, परब्रह्म 
अक्कलकोट निवासी
 श्रीस्वामी समर्थ महाराज की जय !!!!!
मठात असंच आनंदी उत्साही वाटलं... 
दर्शनी भागात सुरेख रांगोळी, स्वामीनामाच्या पताका.!
अखंड नामस्मरण सप्ताह होऊन गेलाय ना.!(आजच)
२८ एप्रिल ते ५ मे सकाळी सहा पर्यंत.
मस्त सोनचाफा दिलाय तेथील काकांनी.!
 प्रसाद घेऊन निघालो....
दिवसाची सुरूवात अशी सुगंधी, उत्साही.. झालीय.

<><><><><><><><><><><><><>

 

 

 

 

Wednesday, 4 May 2016

अजुन काय बघितलं????

काही असे पक्षी..प्राणी ज्यांचे फोटो काढता आले नाहीत.
खार, काळी छोटी चिमणी, छोटं घुबड
डुक्कर, साप, मुंगुस, ससा.....
येथे असलेली वस्ती, वस्तीवर असलेल्या म्हशी,
वाटेत दिसलेल्या विहिरी, ..... हिरवंगार शेत.

ज्याचे फोटो काढले.↓

 

 

                             मातीचे रस्ते








 निष्पर्ण झाडे... रखरखीत भाग





   मधेच हिरवागार झाडे




 रणरणती दुपार




                                      सिंहिणीच्या पाऊलखुणा 





   दगडांची रचना

 वारुळं





  म्हशीचे डोके.. जे खाल्लं जात नाही



 तलाव....त्यावर ब्रीज



★राजामहाराज्यांच्या काळात शिकार केली जात असे.
 पण ब्रिटिशांच्या काळात शिकारीवर बंदी घातली. अशी माहिती गाईडने दिली.
★गीर येथील जंगलात काही मानव वस्ती अजुनही राहतात.
★यांना वीज नाही. सोलार प्रकल्प आहेत.
★यांच्याकडे पशुधन म्हणजे म्हशी आहेत. दुधविक्री करतात.
★शेती नाही जे आहे ते मूग, थोडा गहू. शेंगदाणे... इतकंच पिकवतात.
★लोक शाकाहारी आहेत.
ते येथुन जाऊ इच्छित नाहीत.
ते जंगलातच राहु इच्छितात.!
★तसंच सरकारी लोक जंगलात पायी पेट्रोलिंग करतात. त्यांच्याकडे मोटरबाइक्स आहेत.
पायी फिरतात
हातात दंडुका असतो
पायी चालणाऱ्याच्या हातात दंडुक्याला भाला.... चे पाते असते.
★सासण गावातीलच लोक गाईड, जीप ड्रायव्हर आहेत.
सिंह सिंहिणी, पिलं दिसली की त्यांच्या जवळपास थांबतात व
 आलेल्या जीप्सना पाच / दहा  मिनिटांच्यावर थांबू देत नाहीत...
जर सिंहामध्ये भांडण झालं तर सोडवण्याचा प्रयत्न करतात.

जंगल या प्राण्यांचं घर आहे...

 आपण त्यांच्या घरात फार काळ थांबू नये.

त्यांचं हिंडणं फिरणं डिस्टर्ब करू नये...

हो ना.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, 3 May 2016

आजचा सुर्योदय..

 

 गीर जंगल लॉज मधून...

 

 

 

   ३ मे २०१६

  सुंदर सकाळ .... परीसर खुपच सुंदर.!

  आपल्या चिमण्या जरा लहान तशाच पण थोड्या मोठ्या मी चिमणीच म्हटलं 
      पण इकडे काय म्हणतात ते माहित नाही.. असे बरेच पक्षी.!
     कोकिळेचे कूजन दूरवर ऐकू येतंय.!
     स्वागतालाच नारळ आणि केसर आंब्याची झाडं.!




  इकडे नारळ, अगदी हाताला लागतील असे,









चिकू ... मस्त लागलेत, 

आंबे... येथील सुप्रसिद्ध केसर आंबा अगदी सहज हात पोहोचतोय, 










   फुलझाडं... पांढरा चाफा अगदी लहान झाडं ...
   फुलं सुंदर.. उन्हाळ्यात या शुभ्र चाफ्याने नेत्रसुख मिळालं



         मानवनिर्मित कमलालय...









 पांढरी कमळं, गुलबक्षी कमळं, सुंदर गुच्छांची फुलं
  तमालपत्राची झाडं,
  त्यातील एका झाडाला मधाचं पोळं!







इतकं लहान झाड आणि त्याला मधाचं आतातरी लहान दिसणारं  पोळं!!!!!

बाजुलाच एक फुलाचं झाड.! फुलं अगदी छोटी छोटी आणि एका फुलांवर दोन दोन मधमाशा....





   केळीचा लोंगर...




 . लॉजच्या दोन्ही बाजुला मुगाचं शेत.








लॉजवर असलेल्या स्विमींग पुलवर मस्त... 
पाण्यात डुंबण्याचा आनंद .!







 लहान मुलांसाठी सुंदर असं गार्डन..  
  तर मोठ्यांसाठी दर्शनी भागात दोन गार्डन झोपाळे... 
  बसायला खुप बाकं.. खुर्च्या....





दोन दिवस  सफारीसाठी जातांना हे सगळं दिसत होतं.

पण.... जंगलच्या राजाला त्याच्या परीवाराला बघायचं होतं...

मोर, हरणं, सांबर, नीलगाय, गरूडराज, घुबडं, रॉबिन पक्षी, जंगलात अजुनही वस्त्या,.... अजूनही लोक कसे राहतात?? पाणवठे...   आणि अजुनही बरंच काही... बघायचं, अनुभवायचं होतं.

आज मात्र निवांत वेळ आहे.

********************************