मुक्त विहार करणारे पक्षी..
आम्हाला नुसता आवाज ऐकला तरी किती छान वाटत....
तुम्हाला तर....
अगदी तुमच्या घरी पाहुणे येतात तसे ते येतात आणि काही घटका आनंद देतात
पुन्हा परत भेटण्यासाठी निघतात....
माझ्या मैत्रिणीकडे रोज पोपट येतात असे तिने सांगितले आणि पाठोपाठ हा फोटो!
गॅलरीत एक पोपटाची जोडी आणि गरादिवर एक असे तीन पोपट मला दिसले.
मस्त ना..... आजूबाजूला मस्त झाडे.... आणि पाहुण्यांना खाऊ.... गोड कणीस... मस्त मेजवानी.!!
लाल पेरू, भिजवलेली हरभरा डाळ, मिरची, डाळिंब दाणे, आणि एक 'कांग' नावाचे धान्य पोपट खातात.
****************************** *
पोपट हा पाळीव पक्षी आहे,
सुंदर रंग बाकदार चोच आणि कंठ लाल किंवा काळा.
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::
पाळणारा कोण????
यावर तो काय बोलतो कस बोलतो???
आपल्या लहानपणी एक गोष्ट ऐकली आहे.
एका पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तिकडील पोपट श्लोक म्हणत असे तर....
एका गुन्हेगारकडील पोपट शिव्या देत असे...
ΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣ
तसेच एक वाचनात आलेली गोष्ट...
एका घरी एक वयस्कर स्त्री एकटीच राहत असे आणि तिने पोपट पाळला होता.. त्या स्त्री चा खून होतो.
काही
केल्या तपास लागत नाही, कोणताही पुरावा हाती लागत नाही... असे सहा महिने
जातात. पोलीस शेजारी व्यक्तीकडे चौकशी करत असता ती व्यक्ती म्हणते कि....
त्या म्हाताऱ्या बाईंचा पुतण्या आला कि पोपट पिंजऱ्यात अस्वस्थ होतो आणि
वेगळाच ओरडतो आणि पिंजऱ्यात येरझाऱ्या घालतो...
अधिक चौकशी केली असता तो पुतण्याचं खुनी असतो.
असो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पोपट पकडण्याची कला आहे...
म असा पकडलेला पोपट विकला जातो
आणि पिंजऱ्यात बंदिस्त होतो
म त्याला जस शिकवू तसं तो बोलतो.!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तसेच
आमच्या वाडीत केबल वायर वर १७/१८ पोपट रोज संध्याकाळी बसलेले बघितले
आहेत... मुक्तपणे विहार करणारे पक्षी बघितले कि कित्ती आनंद होतो नाही का??
तेथील काकांनी एक पोपट पाळला होता. त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला ते गॅलरी
मध्ये संध्याकाळी ठेवत असत म हे केबल वरील पोपट त्यांच्या गॅलरीमध्ये जात
आणि ते सगळे गप्पा मारत.....
पण हे अगदी थोडा वेळ.!
अजूनही पोपट येतात पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे.
****************************** *
मिठू मिठू पोपट
आहे मोठा चावट
डाळ खातो कच्ची
मला म्हणतो लुच्ची.
๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑
पोपटा पोपटा
बोलतोस गोड
झालास रोड
खा ना जरा
पेरूची फोड
भाऊ भाऊ
देतोस फोड
बोलतोस गोड
पण....
दार उघड
आणि मला सोड.
भाऊ भाऊ
रानात जाईन
फळे खाईन
डहाळीवर बसून
झोके घेईन.
•••••••••••••••••••••••••••••• ••••••••••
यातून पक्षांना मुक्त ठेवावे. हाच संदेश लहानपणापासून दिला गेला आहे.
•••••••••••••••••••••••••••••• ••••••••••
★ लहान मुलांच्या गाण्यातून आपल्याला भेटणारे पक्षी...
● शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा..
पोपट होता सभापती मधोमध उभा....
म्हणजे आपल्या बालपणी जसे काऊ चिऊ येतात तसाच पोपट, विठू, मिठू, राघू रवा ....
तोता, parrot.... असा सुंदर
आणि छान बोलणारा, छान दिसणारा पक्षी येतो.
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::
कावळा कावळी
चिमणा चिमणी
पण....
पोपट मैना... असतं
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::
पोपटपंची असा एक शब्द वापरला जातो....
म्हणजे फक्त पाठ करणे.
काही पोपट आपण बोलतो तसे बोलतात...
तर ..
लहान मूल चुरुचुरु बोलत असेल तर....
बघ कसा बोलतोय पोपटासारखं चुरुचुरु...
तसं काही फजिती झाली किंवा केली तर ...
पोपट केला माझा
किंवा पोपट झाला रे.....
अस म्हणतात.!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°
रस्त्यावर एक पिंजरा घेऊन माणूस भविष्य सांगताना बघितलं आहे....
समोर कार्ड्स असतात.
पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतो त्यातील एक कार्ड काढतो आणि परत पिंजऱ्यात जातो.
------------------------------ -------------------
सर्कस मध्ये पोपट खेळ करताना बघतो पण....
ते वेगवेगळ्या रंगाचे असतात.
______________________________
शाळेत असताना
चित्रकला शिक्षकांनी पोपट काढायला शिकवला
अगदी सोप्या पद्धतीनी.!
म तो छान काढता आला.
______________________________
मैत्रिणीचे वडील सर्कसमध्ये काम करत
तर त्यांनी रंगीबेरंगी पोपट आणला होता....
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎
तसं राणीच्या बागेत सहल गेली होती...
तर एका मुलीने हातात असलेले पेन पुढे केले तर ...
पोपटाने ते चोचीत पकडले आणि पेन फुटले....
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎
तर अशा या सुंदर पक्षाबद्दल लिहावं वाटलं...
✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽
No comments:
Post a Comment