एक व्हिडिओ आला आणि मन थोडं मागे गेले....
दोनतीन गोष्टींची चटकन आठवण झाली.
⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘
एक गोष्ट
सेनापती बापट यांची.!
सेनापती बापट दादरला राहत असत.!
माझ्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर.!
दररोज सकाळी आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ करीत.... नित्यनेमाने
त्यांचे वय मोठे झाले होते.! पण दिनक्रम चुकला नाही.
स्वतःचे
सुंदर घर होते.
देशासाठी तुरुंगवास भोगला होता.
देश स्वतंत्र झाल्यावर
मात्र परिसर स्वच्छ करत असत.
ते ती गल्ली झाडून गेले कि लोक (एक मजली चाळ)
वरून कचरा टाकत
सेनापती काहीही न बोलता परत गल्ली साफ करत
पण त्या काळी सुद्धा....
लोक असे वागत असत सेनापती मात्र दररोज...
आणि शांतपणे स्वच्छतेचे काम करीत.
अशा सेनापतींचा पुतळा दादर चौपाटीकडे पाहायला मिळतो.
आणि आजही त्यांचे घर तेथे दिमाखाने उभे आहे आणि ती गल्ली आणि ती चाळही.!
आणि आईने सांगितलेली आठवण माझ्या मनात घर करून आहे.!
(त्या व्हिडिओ मध्ये जसा झाडू दाखवला आहे तसाच झाडू त्यांच्या हातात असायचा.)
असो .... सकाळीच या थोर सेनानीची आठवण जागी झाली.
❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡
तशी एक आठवण....
पुण्याजवळ प्रति बालाजी मंदिर आहे. (नारायण गाव)
तेथे गोड बुंदीचा प्रसाद दिला जातो.
प्रसाद खाताना सांडलाच... तर ते उचलण्यासाठी माणसे आहेत.
परिसर सुंदर दिसतोच पण प्रसाद पायाखाली येत नाही.
❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡
सुहासिनी मुळगावकर
यांनी सांगितलेली एक आठवण....
त्या बस ने प्रवास करत
वडील म्हणाले.... तू तिकीट काय करतेस???
काही नाही ... घड्याळाच्या पट्ट्यात लावते
वडील म्हणाले.... रोज एक संस्कृत सुभाषित लिही त्यावर आणि मला दाखव.!
त्या असे करीत आणि
त्यांच्याकडे सुभाषितांचा संग्रह तयार झाला होता
आणि याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात झाला होता.
सर्वसाधारण पणे बसची तिकिटे उतरताना हातातून खाली टाकली जातात.
❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧
ट्रेन मध्ये अनुभव येतात.
☆ संत्रे घेतले तर सोलून बसल्याजागीच लोक साले टाकतात.... तर त्यांना अटकाव करू शकतो.
☆ कोणी पान खाऊन थुकत असेल तर.... आपण सहज साध्या शब्दात सांगू शकतो.
सरकार नियम कठोर करून दंड जास्त घेऊन कायदे करून जनतेला सरळ रांगेत आणू शकते.
★ आपण जेथे राहतो तेथे कचरा कसा होतो????
☆ आपणच सायकल, बाईक याचे तुटके पार्ट एखाद्या कोपऱ्यात टाकतो.
☆ गप्पा मारता मारता मागवलेला चहा... त्याचे प्लास्टिक कप तिथेच कोपऱ्यात टाकतो
☆ पावसात बाईक कव्हर बाजूला ठेवतो.
☆ मुलांना काही खाऊचे पॅकेट देतो... ते तिथेच टाकतो
☆ केस विंचरल्यावर केसाचे गुंता गॅलरीतून खाली टाकतो
❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧
◇ रस्त्यावर केळ्याचे साल पडले तर आपण कोपऱ्यात टाकू शकतो
◇ काचेचे तुकडे, लाकूड फळी रिकामी प्लस्टिक पिशवी...
पतंग
उडवण्याचा दिवसात गुंतलेला मांजा,
सुतळ, प्लास्टिक दोरी,
गंजलेले लोखंड
असे काहीही पडलेले असते
ते आपण वाटेत असेल तर कडेला किंवा जर डस्ट बिन असेल
तर त्यात टाकू शकतो...
यासाठी सरकारला, म्युनिसिपल कॉर्पोशन ला जबाबदार धरण्याची गरज नाही..
**********************
जास्त करून रेल्वे चे ब्रिज असतात तिकडे कोपऱ्यात खूपच कचरा गोळा होतो (डोंगरच)
तरी रेल्वे लाईन मध्ये कचरा गोळा करणारे असतात.
तरी ढिगाने कचरा गोळा होतो
☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆
समुद्र किनारे....
समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही तरी....
अनेक लोक प्लस्टिक पिशवित कचरा टाकतात.
आणि किनाऱ्यावर असा कचरा दिसतो...
वाळूत बसून काही खाल्ले जाते आणि कागद प्लास्टिक
फुटलेले चेंडू... फुगे,
पतंग फाटलेले, मांजा....
गणपती विसर्जन काळात
निर्माल्य, पेढ्याचे बॉक्स, सजावटीचे साहित्य...
थर्माकोल...
लहान मुलांचे एक एक चप्पल बूट..मोठ्यांच्या तुटलेल्या स्लीपर,
चप्पल....
असे काहीही असू शकते
○○○○○○○○○○○○○○○
तलाव स्वच्छता....
आता गावातील लोक तलाव स्वच्छ करतात नाहीतर नदी तलाव सरोवरे गाळाने भरत...
कित्येक स्वच्छ विहिरी कचरा टाकून बंद झाल्या आहेत.
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
शेगाव येथे आनंद सागर...
येथे
तलावात सुंदर बदके विहार करतात.
संध्याकाळी त्यांना घराकडे आणल्यानंतर
तलाव स्वच्छ करतात.
तलावात पडलेली झाडाची पाने रोजच्या रोज काढतात
म सुंदर तलाव सगळ्यांना आनंद घेता येतो.
एकंदरच शेगाव महाराजांचा मठ परिसर स्वच्छ आणि सुंदर.!!!!!
~~~~~~~~~~~~~~
कागद....
घरात खूप नको असलेले कागद असतात.
या कागदाच्या लगद्या पासून सुंदर वस्तू बनवता येतात.
०००००००००००००००००
भाजी निवडून जो नको असलेला भाग आणि निर्माल्य यापासून खत बनते.
०००००००००००००००००
फिरायला जातो तर
तेथे स्वच्छता काय असते ते बघायला मिळाले
कुत्रा पाळला जातो, त्याला सकाळी फिरायला आणतात
त्याचे
नैसर्गिक विधी तिकडेच होतात.
तर एक तरुण कुत्र्याने केलेली शी कागदाने
उचलतो आणि हातात असलेल्या कॅरी बॅग मध्ये ठेवतो....
नाहीतर चला झालाय विधी
जाऊ पुढे असेच असते.!
~~~~~~~~~~~~~~
आता आपण सुद्धा चॉकलेट खाल्लं किंवा फळ कापलं
(प्रवासात) तर एक पिशवी करून सगळे गोळा करून एखाद्या पिशवीत ठेवतो.
आणि नेहमीच्या छोट्या प्रवासात पिशवी नसेल तर पर्सच्या कप्प्यात ठेवतो.
आणि उतरल्यावर dustbin मध्ये.....
••••••••••••••••••••••••••••
परिसर स्वच्छ राहावा म्हणून काही पक्षी प्राणी मदत करतात.
कावळा....
सर्दीचे बेडके, मेलेले उंदीर, खाण्याचे काम करून परिसर स्वच्छ ठेवतो.
गिधाड....
गावाकडे किंवा जंगलात एखादा प्राणी मृत झाला तर .... गिधाड त्याचा फन्ना करते.
∞∞∞∞∞∞∞∞∞
असे प्रत्येक जणच काहींना काही करत असते.
देह स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करतो.
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::
मन स्वच्छ करण्यासाठी नामस्मरण करतो.
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::
घराची स्वच्छता रोज करतो
परिसर स्वच्छ राहावा म्हणून काहीतरी प्रयत्न करतो,
घरातील कचरा घरच्या डस्ट बिन मध्ये टाकतो.
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::
रिकाम्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांपासून
शोपीस, रस्ते, घरे बनवतात.
(असे व्हिडिओ येतात).
ई– कचरा दर महिन्याला गोळा केला जाईल असे मेसेज whatsapp वर येतात.
जुने कपडे...
यापासून छान वस्तू करून मिळतात.
किंवा आपण एखाद्या संस्थेत देऊ शकतो.
□ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □
सध्याचा जमाना हा यूज अँड थ्रो चा आहे....
त्यामुळे खूपच कचरा होतो.!
(स्त्रीची कामाची सोय होते)
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
हात फिरे तेथे लक्ष्मी वसे.!
❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀
किंवा
घराचे काने कोपरे स्वच्छ करतो...
वास्तू पुरुष तथास्तु म्हणत फिरतो असं म्हणतो.
⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘
स्वच्छता हि प्रथम मनात असली पाहिजे म्हणजे ती हाताने होईल.
नजरेला दुसरा कशी स्वच्छता करतो हे दिसले तर आपल्या हातून होईल.!
हे काम सरकारचे आहे हा दृष्टिकोन नसावा.
असो.... विषय खूप मोठा
लिहू तेवढे थोडे......
तुमच्याकडे पण काही उपाय असतील तर.... सांगा
«»«»«»«»«»«»«»«»«»«»
No comments:
Post a Comment