▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
प्रथम नुसतीच भेट स्वरूप.... अशी माहिती घेतली.
खूप छान दिवशी सुरुवात झाली.
११ फेब्रुवारी २०१६
यादिवशी माघी गणेश चतुर्थी गुरुवार होता.
प्रत्यक्ष गीता संथा सुरु झाली तो दिवस सुद्धा छान.!
१६|२|१६
म्हणता म्हणता एक वर्ष पूर्ण झाले...
आणि अकरा अध्याय... संथा देऊन झाले
आता तर विश्वरूप दर्शन हा अकरावा अध्याय सुरु आहे...
या वर्गामुळे गीता छान वाचता येईल...
आता पर्यंत १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १८ या अध्यायाची संथा देऊन झाली.
या एक वर्षातील अनुभव खूप छान आहे...
कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी गुरू असावा.
गीता .... शाळेत असताना १२ व १५ हे दोन अध्याय म्हणत होतो.
आता मात्र गीता कोणाच्या तरी मार्गदर्शनाने म्हणावी असे वाटू लागले आणि असा योग गेल्या वर्षी जुळून आला.
दादरचे.. श्री श्रीकृष्ण जोशी सर यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे.
पहिल्याच दिवशी मोठ्या अक्षरात लिहिलेली गीता हातात आली...
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
मग एका मैत्रिणीने अर्थासह
भगवद् गीता
जशी आहे तशी
हे कृष्णकृपामूर्ती
श्री श्रीमद् भक्तिवेदांत
ती कोणतेही पुस्तक घरी आणले कि त्याची पूजा करते,
असे पूजा केलेले पुस्तक तिने मला दिले.!
****************************** *
गुरुगृही कसे सगळे एकत्र शिकत असत त्याचा अनुभव घेता आला...
सगळे एकत्र श्लोक म्हणतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१२ व १५ हे दोन अध्याय म्हणता येत होते,
(ते म्हणण्याची आमची वेगळी पद्धत आहे)
आता बहुतेक सगळे अध्याय म्हणता येतील. योग्य पद्धतीने.
****************************** **
गीतेतील श्लोक हे अनुष्टुप छंदात आहेत.
यात एका ओळीत १६ अक्षरे असतात
तर
काही श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत.
यात एका ओळीत २४ अक्षरे असतात.
एकूण श्लोक ७०० आहेत. आणि १८ अध्याय आहेत.
गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे..
•••••••••••••••••••••••••••••• ••••••••••
अध्याय दुसरा यातील
११ व्या श्लोकापासून ते १८ व्या अध्यायातील ६६ व्या श्लोका पर्यंत तत्वज्ञान सांगितले आहे.
✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧
८। ७
*एकश्लोकी गीता*
तस्मात्सर्वेषु कालेषु
मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्
मामेवैष्यस्यसंशयम् ।।
✧✧✧✧✧✧✧✧✧✧
अर्थ:
हे अर्जुना! तू सदैव माझे ( कृष्ण या रूपाचे ) स्मरण केले पाहिजे आणि
त्याच बरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी
कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर
केल्याने तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल.
✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿
संस्कृत .! शालेय जीवना नंतर आता एकदम संस्कृत.!
۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞
गीता म्हणताना योग्य आघात दिले अनुस्वाराचा योग्य उच्चार केला, एका तालासुरात म्हटली तर....
छान वाटते.
पाठ करायला सोपे वाटते.
۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞
~~~~~~~~~~~~~
काही अध्याय पाठ करत आहोत.
पाठ होत आहेत.
~~~~~~~~~~~~~~
हे भगवंताचे प्रत्यक्ष शब्द आहेत.
**********************
या वर्गामुळे छान शिस्त आली.
मंगळवार बुधवार ६ ते७ हा वर्ग असतो..
शक्यतो त्या दिवशी कुठे जायचं नाही वेळ पाळायची अशी सवय लागली.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
पाठांतर अशा स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता,
पण गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला..
एक नवीन शिकले .!
उगाच भीत होते...असे वाटले...
आणि असेही लक्षात आले कि आपण जर योग्य करत असू परफेक्ट असू पूर्ण माहिती असेल तर धीटपणे म्हणू शकतो.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
आता गीता चांगली म्हणता येईल याचा आनंद होतो.
○○◇◇○○◇◇○○◇◇○○
कोण कसे पाठ करते,
त्यांची पद्धत, आपली पद्धत
असे आत्मसात करून पाठांतर करता येते,
त्यांची पद्धत, आपली पद्धत
असे आत्मसात करून पाठांतर करता येते,
••••••••••••••••••••••••••••
प्रथम
जेव्हा गीता म्हणू असे वाटले
तेव्हा पहिलेच दोन शब्द वाचून पुस्तक खाली ठेवले होते,
पण आज मात्रसुयोग्य मार्गदर्शनामुळे रोजच
गीता पुस्तक हातात घेऊन ती वाचते..
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
४ | २४
ब्रह्मार्पणं (म्) ब्रह्म हविर्
ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं (म् )
ब्रह्मकर्मसमधीना ।।
हा श्लोक पोट ठीक राहण्यासाठी म्हणतात
लोकांना चांगला अनुभव आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment