Tuesday, 31 January 2017

आज माघी गणेश चतुर्थी



मन बालपणात गेले

आमचे अण्णा... गणेश भक्त

पण म्हणून पूजा, सोवळे, मंदिरात रांग लावून जाणे असे काहीच नव्हते.!

     रविवारची दुपार.! 

आम्ही भावंडे खेळत होतो,
अण्णा दुपारी वामकुक्षी घेत होते, 
ते झोपेतून एकदम उठले 
आणि बाहेर जायचे कपडे घालून निघाले,
 कोणाशी काहीही बोलले नाहीत.
 साधारण एक तासाने ते घरी आले.
 हातात रुमालात झाकलेले काही होते 
आणि ते त्यांनी फळीवर तसेच ठेवले.. 
कोणाशी काहीच बोलत नव्हते.
म आईने त्यांना विचारले

आई : असे अचानक कुठे गेलात... भर दुपारी???

आणि काय आणलय???
कोणाशी काहीच बोलत नाही???

अण्णा : अगं मला एक स्वप्न पडले... 

आपल्या दादर चौपाटीवर एक पांढरी साडी नेसलेली बाई रडत आहे 
आणि ती मला म्हणते कि तू मला तुझ्या घरी घेऊन चल.
म्हणून मी बघायला गेलो कि खरंच कोणी अस आहे का???

तर...... नेमके त्याच ठिकाणी हा गणपती बाप्पा.!

म घरी घेऊन आलो.

आई : अहो अस काही नसत

कोणी विसर्जन केलेल्या मूर्ती किनाऱ्यावर येतात ना... तशीच हि मूर्ती.!
आणि हि तर मातीची पूर्ण भाजलेली रंगहीन मूर्ती आहे ती पाण्यात विरघळणारी नाही.
 ( मंगलोरी कौले असतात तशी )

समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही म्हणतात

 ते खरंच
 कुठल्या ना कुठल्या किनाऱ्यावर वस्तू सापडतात.
असो... काही दिवसांनी अण्णांनी त्या मूर्तीचे विसर्जन केले..

पण परत काही दिवसांनी अण्णांना तसेच स्वप्न पडले...

आता मात्र त्यांना माहित होते  कि... गणपती मूर्ती....

पण यावेळी एक उजव्या सोंडेचा लहान आणि एक डाव्या सोंडेचा थोडा मोठा असे दोन गणपती बाप्पा मिळाले.! 

मागच्या वेळेप्रमाणे.. घरी आणले. 

आणि काही दिवसांनी विसर्जन केले.

तिसऱ्या वेळी जेव्हा असे स्वप्न पडले 
 तेव्हा आई म्हणाली ... तुम्हाला माहित आहे कि अशी बाई कोणी नाही गणपती आहेत, 
आणि ते कोणी विसर्जन केले आहेत आता जाऊ नका...
पण ते त्यांना पटले, ते चौपाटीवर गेले नाहीत

या मूर्ती अगदी लहान असत साधारण १२ इंच.!


असो...

आमचे गाव महाड.! 

येथे एक सुंदर गणपती मंदिर आहे.. 

 

 

तेथे होणाऱ्या उत्सवात  पाणिग्रहण या नाटकात अण्णांना काम करण्याची संधी मिळाली.!

आज गीता वर्गाला एक वर्ष पूर्ण झाले...


▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬

   प्रथम  नुसतीच भेट स्वरूप.... अशी माहिती घेतली.
खूप छान दिवशी सुरुवात झाली.

११ फेब्रुवारी २०१६ 

यादिवशी माघी गणेश चतुर्थी गुरुवार होता.

प्रत्यक्ष गीता संथा सुरु झाली तो दिवस सुद्धा छान.!

१६|२|१६

म्हणता म्हणता एक वर्ष पूर्ण झाले... 
आणि अकरा अध्याय... संथा देऊन झाले

आता तर विश्वरूप दर्शन हा अकरावा अध्याय सुरु आहे...



या वर्गामुळे गीता छान वाचता येईल...
आता पर्यंत १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १८ या अध्यायाची संथा देऊन झाली.
या एक वर्षातील अनुभव खूप छान आहे...

कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी गुरू असावा.

गीता .... शाळेत असताना १२ व १५ हे दोन अध्याय म्हणत होतो.
आता मात्र गीता कोणाच्या तरी मार्गदर्शनाने म्हणावी असे वाटू लागले आणि असा योग गेल्या वर्षी जुळून आला.

दादरचे.. श्री श्रीकृष्ण जोशी सर यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे.


पहिल्याच दिवशी मोठ्या अक्षरात लिहिलेली गीता हातात आली... 
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
मग एका मैत्रिणीने अर्थासह 

भगवद् गीता 

जशी आहे तशी

हे कृष्णकृपामूर्ती

श्री श्रीमद् भक्तिवेदांत 

स्वामी प्रभूपाद यांचे पुस्तक हाती दिले...

 

 

 तिचा एक छान विचार, कृती कळली खूप आवडली!

ती कोणतेही पुस्तक घरी आणले कि त्याची पूजा करते, 

असे पूजा केलेले पुस्तक तिने मला दिले.!


*******************************

गुरुगृही कसे सगळे एकत्र शिकत असत त्याचा अनुभव घेता आला...
 सगळे एकत्र श्लोक म्हणतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

१२ व १५ हे दोन अध्याय म्हणता येत होते, 
(ते म्हणण्याची आमची वेगळी पद्धत आहे)

आता बहुतेक सगळे अध्याय म्हणता येतील. योग्य पद्धतीने.

********************************

गीतेतील श्लोक हे अनुष्टुप  छंदात आहेत.

 यात एका ओळीत १६ अक्षरे असतात 

 तर

 काही श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत. 

यात एका ओळीत २४ अक्षरे असतात.

एकूण श्लोक ७०० आहेत. आणि १८ अध्याय आहेत.


गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे..

••••••••••••••••••••••••••••••••••••••••

     अध्याय दुसरा यातील

 ११ व्या श्लोकापासून ते १८ व्या अध्यायातील ६६ व्या श्लोका पर्यंत तत्वज्ञान सांगितले आहे.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

८। ७

*एकश्लोकी गीता*


तस्मात्सर्वेषु   कालेषु

मामनुस्मर  युध्य च ।

मय्यर्पितमनोबुद्धिर्

मामेवैष्यस्यसंशयम्  ।।

✧✧✧✧✧✧✧✧✧✧

अर्थ: हे अर्जुना! तू सदैव माझे ( कृष्ण या रूपाचे ) स्मरण केले पाहिजे आणि त्याच बरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर केल्याने तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल.

✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿


संस्कृत .! शालेय जीवना नंतर आता एकदम संस्कृत.!

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ 
गीता म्हणताना योग्य आघात दिले अनुस्वाराचा योग्य उच्चार केला, एका तालासुरात म्हटली तर....
छान वाटते.

पाठ करायला सोपे वाटते.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ 


~~~~~~~~~~~~~

काही अध्याय पाठ करत आहोत.

 पाठ होत आहेत.

~~~~~~~~~~~~~~

हे भगवंताचे प्रत्यक्ष शब्द आहेत.

**********************
या वर्गामुळे छान शिस्त आली. 
मंगळवार बुधवार ६ ते७ हा वर्ग असतो..
शक्यतो त्या दिवशी कुठे जायचं नाही वेळ पाळायची अशी सवय लागली.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆

पाठांतर अशा स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता, 
पण गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला..
एक नवीन शिकले .!
उगाच भीत होते...असे वाटले...
आणि असेही लक्षात आले कि आपण जर योग्य करत असू परफेक्ट असू पूर्ण माहिती असेल तर धीटपणे म्हणू शकतो. 
☆☆☆☆☆☆☆☆☆☆

आता गीता चांगली म्हणता येईल याचा आनंद होतो.

○○◇◇○○◇◇○○◇◇○○

कोण  कसे  पाठ  करते,
 त्यांची पद्धत, आपली पद्धत
 असे आत्मसात करून पाठांतर करता येते,
••••••••••••••••••••••••••••

प्रथम जेव्हा गीता म्हणू असे वाटले 

तेव्हा पहिलेच दोन शब्द वाचून पुस्तक खाली ठेवले होते, 

पण आज मात्र

 सुयोग्य  मार्गदर्शनामुळे  रोजच 

 गीता पुस्तक हातात घेऊन ती वाचते..



▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬

४ | २४

ब्रह्मार्पणं (म्) ब्रह्म हविर्
ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।

ब्रह्मैव तेन गन्तव्यं (म् )
ब्रह्मकर्मसमधीना ।।


हा श्लोक पोट ठीक राहण्यासाठी म्हणतात
लोकांना चांगला अनुभव आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Sunday, 22 January 2017

संध्याकाळी दिसणारे आकाश.!



     आज हाजीअली जवळ दिसणारे आकाश बघून मनात अनेक विचार आले.

  या वेळेला कातर वेळ म्हणतो.

मन थोडं उदास होत
घरी सगळे असावेत अस वाटतं

तेच सकाळी उगवतीला केशरी रंग तेजस्वी....

सगळे उत्साहित.... 
~~~~~~~~~~~~~~

पहाट आपल्याला ईश्वराच्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी उगवत असते.

~~~~~~~~~~~~~~
आता मात्र .....

रवी गेला रे सोडून आकाशाला....

यावेळी आपल्याला

उदास उदास वाटू लागते...

कुणी अस म्हटलेलं आठवतय.!

 जस सकाळ हा उभारी चा काळ...

 तर संध्याकाळ ...

 तिन्ही सांजा हा उतरणीचा काळ...

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

भा. रा. तांबे म्हणून गेलेत

संध्या छाया भिवविती हृदया

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

कुणी काव्य केलंय...

ह्या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.!

**********************
○ संपूर्ण दिवस काम करून थकले भागले जीव घराच्या ओढीने येतात...
○ पाखरे घराकडे परततात...
○ प्राणी पक्षी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी जातात.
( जंगलात )

     दिवेलागणीची, 
तिन्ही सांजेची वेळ.!
देवासमोर दिवा लावतो.
दिव्याची प्रार्थना करतो.
अशा शांत, मंद तेवणाऱ्या ज्योतीकडे बघत राहावे वाटते. 
देवाला प्रार्थना करण्याची योग्य वेळ.!
घराघरातून बालगोपाळ मंडळी परवाचा म्हणतात.
घरातील थोरामोठ्याना नमस्कार करतात.

खरतर ब्रह्म मुहूर्त .... 

यावेळी सगळीकडे शांतता असते.
झोपही पूर्ण झालेली असते.
म पूजा, नामस्मरण करण्यास उत्तम वेळ.!
 मन एकाग्र होते.
तस संध्याकाळी.... 
प्रार्थना केली जाते.
खरतर नामस्मरण केव्हाही आणि कुठेही घ्यावे.
...................................

संकलन: ↓↓↓

....................................
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

प्रार्थना:

 दोन वेळा महत्वाच्या


दोन प्रहर प्रार्थनेसाठी फार महत्वपूर्ण आहेत.
पहिला प्रहर सकाळचा, जेव्हा रात्र सरलेली असते.
परंतु दिवस मात्र अजून उगवलेला नसतो. 
तर दुसरा प्रहर संध्याकाळचा
जेव्हा दिवस मावळलेला असतो अन रात्र मात्र नुकतीच सुरु झालेली असते.
 हे दोन क्षण प्रार्थनेसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहेत. 

कारण या दोन समयी आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सर्वाधिक मुक्त असतो.

     या वेळी आपण आपल्या सर्वाधिक निकट असतो. 
परमेश्वर आपल्या निकट असतो. 
आपण थोडासा हात पुढे करायचा अवकाश, कि तो आपल्या हाती लागू शकतो.
म्हणून आपण या वेळी प्रार्थना करतो.

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

तुकड्यादास म्हणे .........


पूर्वी प्रातःकाळी मध्यान्हा
आणि सायंकाळी जाणा
होती त्रिकाल संध्याप्रार्थना
संस्कारास्तव लाविली !!

ते सर्वकाळची उचीत
म्हणोनी प्रातर्ध्यान नियमित
आणि सायंप्रार्थनाही नेमस्त
करित जावी सर्वांनी !!

निद्रेचीये आदिअंती
दिवस रात्रीच्या संधीप्रती
आणि भोजनसमयी संकल्प होती
ते बनती दृढ संस्कार !!

जय गुरूदेव !!!

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


रात्री म्हणावे.

पड पड कुडी धरणीवरी
धरणीमाता कृपा करी
अस्तिक कस्तिक काळभैरव दंडपाणी 
कफल्लक कफल्लक कफल्लक
अस्तिक अस्तिक काळभैरव दंडपाणी
माझ्या पाठीमागुन येईल त्याला अस्तिक ऋषींची शप्पथ शप्पथ शप्पथ!!

   ।।श्रीगुरूदेव दत्त।।

   ।।श्रीगुरूदेव दत्त।।

   । श्रीगुरूदेव दत्त।।


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Monday, 16 January 2017

पोपट....



मुक्त विहार करणारे पक्षी..

 आम्हाला नुसता आवाज ऐकला तरी किती छान वाटत....

तुम्हाला तर.... 
अगदी तुमच्या घरी पाहुणे येतात तसे ते येतात आणि काही घटका आनंद देतात
पुन्हा परत भेटण्यासाठी निघतात....
माझ्या मैत्रिणीकडे रोज पोपट येतात असे तिने सांगितले आणि पाठोपाठ हा फोटो!



गॅलरीत एक पोपटाची जोडी आणि गरादिवर एक  असे तीन पोपट मला दिसले.
मस्त ना..... आजूबाजूला मस्त झाडे.... आणि पाहुण्यांना खाऊ.... गोड कणीस... मस्त मेजवानी.!!
लाल पेरू, भिजवलेली हरभरा डाळ, मिरची, डाळिंब दाणे, आणि एक 'कांग' नावाचे धान्य पोपट खातात.
*******************************
     पोपट हा पाळीव पक्षी आहे, 
सुंदर रंग बाकदार चोच आणि कंठ लाल किंवा काळा. 
आणि बोलणे गोड...


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

पाळणारा कोण????

यावर तो काय बोलतो कस बोलतो???

आपल्या लहानपणी एक गोष्ट ऐकली आहे.
एका पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तिकडील पोपट श्लोक म्हणत असे तर....
एका गुन्हेगारकडील पोपट शिव्या देत असे...
ΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣΣ

तसेच एक वाचनात आलेली गोष्ट... 
एका घरी एक वयस्कर स्त्री एकटीच राहत असे आणि तिने पोपट पाळला होता.. त्या स्त्री चा खून होतो.
काही केल्या तपास लागत नाही, कोणताही पुरावा हाती लागत नाही... असे सहा महिने जातात. पोलीस शेजारी व्यक्तीकडे चौकशी करत असता ती व्यक्ती म्हणते कि.... त्या म्हाताऱ्या बाईंचा पुतण्या आला कि पोपट पिंजऱ्यात अस्वस्थ होतो आणि वेगळाच ओरडतो आणि पिंजऱ्यात येरझाऱ्या घालतो...
अधिक चौकशी केली असता तो पुतण्याचं खुनी असतो.
असो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पोपट पकडण्याची कला आहे...

 म असा पकडलेला पोपट विकला जातो 
आणि पिंजऱ्यात बंदिस्त होतो
म त्याला जस शिकवू तसं तो बोलतो.!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 काही वर्षांपूर्वी मी डेरेदार वृक्षाच्या ढोलीत पोपटाचे पूर्ण कुटुंब पाहिले आहे.

 

 

 

तसेच आमच्या वाडीत केबल वायर वर १७/१८ पोपट रोज संध्याकाळी बसलेले बघितले आहेत... मुक्तपणे विहार करणारे पक्षी बघितले कि कित्ती आनंद होतो नाही का?? तेथील काकांनी एक पोपट पाळला होता. त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला ते गॅलरी मध्ये संध्याकाळी ठेवत असत म हे केबल वरील पोपट त्यांच्या गॅलरीमध्ये जात आणि ते सगळे गप्पा मारत.....
पण हे अगदी थोडा वेळ.!

अजूनही पोपट येतात पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे.


*******************************

मिठू मिठू पोपट 
आहे मोठा चावट
डाळ खातो कच्ची
मला म्हणतो लुच्ची.
๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑๑´• •`๑

पोपटा पोपटा
बोलतोस गोड
झालास रोड
खा ना जरा
पेरूची फोड

भाऊ भाऊ
देतोस फोड
बोलतोस गोड
पण....
दार उघड
आणि मला सोड.

भाऊ भाऊ 
रानात जाईन
फळे खाईन
डहाळीवर बसून 
झोके घेईन.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••

यातून पक्षांना मुक्त ठेवावे. हाच संदेश लहानपणापासून दिला गेला आहे.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••

★ लहान मुलांच्या गाण्यातून आपल्याला भेटणारे पक्षी...

● शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा..
पोपट होता सभापती मधोमध उभा....
म्हणजे आपल्या बालपणी जसे काऊ चिऊ येतात तसाच पोपट, विठू, मिठू, राघू रवा ....
तोता, parrot.... असा सुंदर 
आणि छान बोलणारा, छान दिसणारा पक्षी येतो.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
कावळा कावळी
चिमणा चिमणी
पण.... 

पोपट मैना... असतं

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 पोपटपंची असा एक शब्द वापरला जातो.... 

म्हणजे फक्त पाठ करणे.
काही पोपट आपण बोलतो तसे बोलतात...
तर ..

लहान मूल चुरुचुरु बोलत असेल तर....

बघ कसा बोलतोय पोपटासारखं चुरुचुरु...

तसं काही फजिती झाली किंवा केली तर ...

पोपट केला माझा
किंवा पोपट झाला रे.....
अस म्हणतात.!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

रस्त्यावर एक पिंजरा घेऊन माणूस भविष्य सांगताना बघितलं आहे....
समोर कार्ड्स असतात.
पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतो त्यातील एक कार्ड काढतो आणि परत पिंजऱ्यात जातो.
-------------------------------------------------

सर्कस मध्ये पोपट खेळ करताना बघतो पण.... 

ते वेगवेगळ्या रंगाचे असतात.
______________________________

शाळेत असताना

 चित्रकला शिक्षकांनी पोपट काढायला शिकवला 

अगदी सोप्या पद्धतीनी.! 

म तो छान काढता आला. 
______________________________

मैत्रिणीचे वडील सर्कसमध्ये काम करत 
तर त्यांनी रंगीबेरंगी पोपट आणला होता....
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

तसं राणीच्या बागेत सहल गेली होती...
 तर एका मुलीने हातात असलेले पेन पुढे केले तर ...
 पोपटाने ते चोचीत पकडले आणि पेन फुटले....
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

तर अशा या सुंदर पक्षाबद्दल लिहावं वाटलं...

✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

Sunday, 15 January 2017

गीता...



श्लोक म्हणताना ......

आठ अक्षरे झाली कि आपण किंचित थांबतो 

हे आठवे अक्षर ऱ्हस्व असेल तर ते दीर्घ होण्याची शक्यता असते

त्याकडे लक्ष द्यावे.

 ष याचा उच्चार व्यवस्थित करावा

जिथे अक्षराला *य* जोडला असेल तेथे तो नीट उच्चार करावा

संप्रेक्ष्य

वक्ष्यामी


◑◐◑◐◑◑◐◑◐◑◑◐◑◐◑

तसेच जेथे *ष्ठ* असतो तेथे ठ चा उच्चार ट असा होण्याची शक्यता असते 

तो ठ असा करावा

 काही शब्द ज्याच्या उच्चारकडे नीट लक्ष द्यावे 

जा+ह् + न + वी = जाह्नवी


गृ+ह् +णा+ ति = गृह्णाति


ब+ह् +म = ब्रह्म


६|४४

ह्रियते ह्+रि = ह्रि 


हृदय hrudy ह् + रु = हृ


ऱ्हस्व

ऱ् + ह= ऱ्ह

 प्रह्लाद

प्+र+ ह् + ला+द

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

मार्गदर्शन...


श्लोक म्हणताना शब्द जर शब्द कठीण वाटत असेल तर...

 तो  शब्द  म्हणताना  स्पीड  कमी  करायचा.

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ


६|१६

नात्यश्नतस्तु ... 

शब्द योग्य म्हणायचा आहे तर सावकाश म्हणावा

प्रत्येक श्लोक एकाच स्पीड मध्ये म्हटला पाहिजे असे नाही. 

आपण म्हणताना योग्य आणि न चुकता म्हणायचं आहे.

मला श्लोक पाठ करायचे म्हणून मी केले
आपण स्पर्धेत आपल्या आनंदासाठी भाग घेतलाय
त्याने काही लाभ होणार म्हणून भाग घेतला नाही.
आपल्याला आनंद झाला कि बाकी गोष्टी दुय्यम असतात.

स्पर्धेचे परीक्षक हे संस्कृत पंडित असतात.

 त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.


आपण आपल्या आनंदासाठी श्लोक म्हणतो हे लक्षात ठेवले कि आपल्याला आनंद मिळतो.

आणि जर समोरच्याला आनंद झाला तर...

आपला आनंद द्विगुणित होतो.

 
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
 
   असे वेळोवेळी गीता वर्गात सुंदर मार्गदर्शन होते.
हे दहावा अध्याय सुरु असताना ....

आणि स्पर्धेसाठी सहावा अध्याय म्हटल्या नंतर मिळालेले मार्गदर्शन आहे.


दहावा अध्याय हा विभूतीययोग अध्याय आहे.
 
 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

८। ७

*एकश्लोकी गीता*


तस्मात्सर्वेषु   कालेषु


मामनुस्मर  युध्य च ।


मय्यर्पितमनोबुद्धिर्


मामेवैष्यस्यसंशयम्  ।।


✧✧✧✧✧✧✧✧✧✧


अर्थ:

 हे अर्जुना! 

तू सदैव माझे ( कृष्ण या रूपाचे ) स्मरण केले पाहिजे
 आणि त्याच बरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे.
तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि 
तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर केल्याने 
तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल.

✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿

 ९।२२ 

अनन्याश्चिन्तयन्तो मां (य् )


ये जनाः पर्युपासते ।


तेषां(न् ) नित्याभियुक्तानां(य्


योगक्षेमं(वँ) वहाम्यहम् 


❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


अर्थ:
 जे लोक अनन्य भक्तिभावाने 
माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, 
त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो 
आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.


 स्वामी समर्थ....

यांनी शेवटी हा श्लोक म्हटला आणि.......
समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वीतलावरून गुप्त झाले.
चैत्र वद्य त्रयोदशी ..सहवद्य
चतुर्दशी.. शके १८००, 
सन १८७८ ....
समर्थ निजानंदी निमग्न झाले.

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

ब्राह्मण सभा येथे गीता जयंती या दिवशी १८ वा अध्याय १ ते ४० श्लोक पाठांतर स्पर्धा झाली त्याचा बक्षीस समारंभ १५ जानेवारी या दिवशी झाला 



 

Saturday, 14 January 2017

उंधियु


साहित्य:

 सुरती पापडी, कंद, बटाटे (छोटे), तुरीचे दाणे, रताळी, वांगी, 
हिरव्या मिरच्या,(बोटा एवढ्या लांबीच्या),
 केळी,  मेथी मुठिया...

(उंधियु करताना याच क्रमाने भाज्या घालायच्या)

हिरवा मसाला: 

कोथिंबीर १ मोठी जुडी, 
ओली लसूण १ जुडी,
कांदा लसूण १
आले, मिरच्या, धने जिरे पावडर, गोडा मसाला, तिखट, हळद, मीठ.

सर्व साहित्य मिक्सर मधून काढावे.

 

 

मिरची मसाला :

 डाळीचे पीठ, मीठ, साखर, लिंबू रस, तेलाचे मोहन.
सर्व साहित्य एकत्र करावे
मिरच्यांना छेद द्यावा आणि वरील साहित्य त्यात घट्ट भरावे.

मेथी मुठिया :

 मेथी धुवून बारीक चिरावी, व मीठ लावून ठेवावी मग त्याचे पाणी काढावे.
 त्यात तिखट, मीठ, ओवा, हळद, तेलाचे मोहन, डाळीचे पीठ. 
(आवडत असेल तर थोडी साखर घालावी)

सर्व साहित्य एकत्र करावे आणि त्याचे छोटे मुठिये करावे आणि ते तळून घ्यावे..

 

 

 

नंतर त्याच तेलात उंधियु करावा.

वांगी मसाला : 

कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, गोडा मसाला, चिंच, गूळ, धने जिरे पावडर. सगळे एकत्र करून वांगी भरावी.

कृती: 

 तेलात ओवा हळद घालून प्रथम सुरती पापडी हिरवा मसाला लावून टाकावी. 
मग क्रमाने प्रत्येक भाजी हिरवा मसाला लावून टाकावी,
 अगदी मुठीयांना सुद्धा मसाला लावावा.
तयार होण्यासाठी वेळ लागतो
वालाचे दाणे काहीजण घालतात

उंधियु काविलथ्याच्या उलट बाजूने ढवळावा.

साहित्य आपल्याला हवे तेवढे घ्यावे.

बटाटे स्वच्छ धुवून सालासकट घ्यावे, 

त्याला टोचे मारावे म्हणजे मसाला त्यात जातो आणि पटकन शिजतात.

 

 

 

 रताळी मसाला लावून 

सुरती पापडी जास्त घ्यावी.

आवडत असलास वेलची केळी घ्यावी ती अख्खी घालावी

नाहीतर हिरवी केळी तुकडे करून घ्यावे

उंधियु करताना पाणी वापरू नये, तेलातच करावा.

भाजी धुण्यासाठी जेवढे पाणी असेल तेवढेच.!!!!!

सगळ्यात शेवटी मुठिये....

आधीच घातले तर सगळा रस मुठिये शोषून घेतात.

हिरवा मसाला जास्त हवा.

उंधियु ची चव जी हवी तसा हिरवा मसाला बनवावा

ओली लसूण चांगली धुवावी.

 

 

 चला गरमागरम उंधियु तयार !!!!!!

Thursday, 12 January 2017

भोगी... मकरसंक्रांत...



❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


हा भौगोलिक सण आहे.

त्यामुळे तो विशिष्ट दिवशी येतो... खरतर हा हिंदू सण
सूर्याचा मकर राशीत प्रवेश.!
उत्तरायण सुरु होते.
थंडीचा काळ असतो, 
त्यामुळे गूळ तीळ खोबरे दाणे याचे पदार्थ बनवले जातात.
तसेच खूप सुंदर भाज्या येतात.
म मिश्र भाजी केली जाते.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


भोगी 

भोगी  भोगी

न न्हाईल तो रोगी

किंवा
न खाई भोगी 
तो सदा रोगी

यातून सर्व भाज्या खाव्या हा संदेश असेल.....

कारण मिश्र भाज्यांची भाजी केली जाते
 आणि
 शरीरासाठी आवश्यक बाजरी भाकरी  तीळ लावून केली जाते.







आणि सोजी केली जाते
आणि असा नेवैद्य....
म्हणजेच भोग देवाला दाखवला जातो.
म्हणून भोगी??? हे नाव असेल का?

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

कोणी कित्ती सुंदर काव्य केलंय....

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

साळ उसाचे पेर 

कोवळा हुरडा अन् बोरं

वांगे गोंडस गोमटे 

टपोरे मटार पावटे

हिरवा हरभरा तरारे 

गोड थंडीचे शहारे

गुलाबी ताठ ते गाजर 

तीळदार अन् ती बाजर 

वर लोण्याचा गोळा 

जीभेवर रसवंती सोहळा

डोळे उघडता हे जड 

दिसे इवल्या सौख्याचे सुगड


भोगीच्या हार्दिक शुभेच्छा...

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽


गुजराथ मध्ये उंधियों करतात
जिलेबी फाफडा....
आणि पतंग उडवले जातात

थंडी पडली कि हलवा बनवला जातो.... त्याला काटा छान येतो.

✿✿✿✿✿✿✿✿✿

फार पूर्वी....

त्याकाळी landline फोन सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध होते..!!

म ग्रीटिंग बनवली जायची..

✿✿✿✿✿✿✿✿✿

किंवा
 जी काही मोजकी दुकाने होती तेथून विकत घेतली जायची.
 त्यात एक छोटस पाकीट ... इतक छोटं कि त्यात तीळ त्यावर चढवलेला साखरेचा पाक...
 अगदी नाजूक हलवा.. त्याचे चार पाच दाणे राहायचे
किंवा 
पाकिटात एक चिट्ठी आणि थोडासा हलवा... 
असा हलवा दूर राहणाऱ्या नातेवाईकांना पाठवला जायचा....
 जो संक्रांति पूर्वी त्यांना मिळेल अशा बेताने.!

मस्त वाटत असे.!

बघा... आहे का हि कविता आठवते का....

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

आठवणीतली  कविता 

वाटाणा फुटाणा शेंगदाणा

उडत चालले टणाटणा.

वाटेत भेटला, तिळाचा कण.

हसायला लागले तिघेही जण.

तीळ चालला भराभर.

थांबत नाही पळभर.

वाटेत लागले ताईचे घर.

तीळ शिरला आत.

थेट स्वंयपाक घरात.

ताईच्या हातात छोटीशी परात.

हलवा करायला

 तीळ नाही घरात.

ताई बसली रूसुन. 

तीळ म्हणाला हसुन.

घाल मला पाकात 

हलवा कर झोकात.

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺


मकरसंक्रांत....

 म...... मराठमोळा सण
क...... कणखर बाणा
र ...... रंगीबिरंगी तिळगुळ
सं...... संगीतमय वातावरण
क्रा...... क्रांतीची मशाल...
त ...... तळपणारे तेज
*********************
 या दिवशी स्त्रिया सुगड / सुघट  पूजतात
यामागे अस असेल का???
बारा बलुतेदारां पैकी एक कुंभार.... 
यांच्याकडून ती विकत घ्यायची म्हणजे त्याला काम मिळेल....
आणि 
या मातीच्या भांड्यात दही छान घट्ट लागते. पाणी सुटत नाही.! 
असा पुढे उपयोग करत असतील का...
या सुगडात ऊस, शेंगा, हरभरा, गाजर,पैसा सुपारी असं ठेऊन ते पूजतात, आणि ते वाण म्हणून देतात.

हलव्याचे दागिने...

 स्त्री आपली कलाकुसर करून नवं विवाहितेसाठी  नूतन बालकांसाठी हलव्याचे दागिने बनवत असे.!

पण... आता मात्र विकत मिळतात... 

 एक सुंदर व्यवसाय....


✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

तिळगुळ समारंभ...

असे सुंदर नाव दिले कि स्त्री पुरुष मुले सगळे एकत्र येतात. आणि एकमेकांना तिळगुळ देतात....

❥♡❥♡❥♡❥♡❥♡❥♡

 

 

तिळगुळ घ्या
तिळागणिक या
गोड गोड बोला
आमचा तीळ
सांडू नका
आमच्याशी कधी
भांडू नका...
असे प्रेमाने सांगितले जाते.

❥♡❥♡❥♡❥♡❥♡❥♡

तिळाचे नरम लाडू (साधा गूळ घालून केले जातात)
तिळाचे कडक पण कुरकुरीत???? कि खुसखुशीत लाडू...  
जे चिक्की च्या गुळापासून बनवले जातात
तिळाच्या वड्या... अगदी कुणीही खाव्या अशा.
तर कुणी लाडू न वळता नुसताच भगरा... चमच्याने देतात. 
या बरोबरीने नाजूक हलवा हवाच.

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

 

 

आणि

 हळदीकुंकू समारंभ.

याला मात्र काहीतरी वस्तू धान्य, साखर, नारळ असे लुटतात
लग्न झाल्यानंतर नवं विवाहित ... 
ओळीने पाच वर्ष ठरलेली सौभाग्य लेणी लुटते.

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

मला वाटत लुटणे... म्हणजे 
जे आपल्याकडे जास्त आहे ते लुटणे किंवा वाटणे....
असो
काळे कपडे या सणाला आवर्जून घातले जातात.
थंडी असते ना....
**********************

थंडी

थंडी म्हणजे ..अभ्यंग!!!

थंडी म्हणजे... स्निग्धता,
खाण्यापिण्याची रेलचेल
थंडी म्हणजे रंगीबेरंगी कपडे
थंडी म्हणजे... लोकरीचे कपडे
थंडी म्हणजे... सहल, ट्रीप
थंडी म्हणजे.... हुःहुःहुःSss

(खरंतर हा तोंडाने येणारा आवाज.... लिहिता येत नाही)

तोंडातून वाफा,
 हात हातावर चोळून ऊब निर्माण करणं...
गरमागरम चहा कॉफी पिणं !!!
थंडी म्हणजे … शेकोटी,
गप्पाटप्पा.....

 थंडीची चाहुल लागली कि
ओठ कोरडे व्हायला लागतात घसा कोरडा होऊ लागतो
 सकाळी जरा लोळत राहतो पहाटेची गुलाबी थंडी जाणवू लागली.
आणि हो...... नाक्यानाक्यावर नेपाळी लोक वुलन कपडे घेऊन बसू लागलेले दिसू लागतात दुकानं तर थंडीच्या आधुनिक कपड्यांनी सजतात 
मन मोहवून टाकणारे हे कपडे.…....

पुढे येणारा सण तर... मस्त !!

मकर संक्रांत...

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला....
गुळाची पोळी मस्त तूप घालून



छान थंडी मुळे हलवा काटेदार....
पतंगांनी आकाश भरेल.!

त्याआधी भोगी.

नाही न्हाईल तो रोगी!
अस म्हटलं जायचं
मिश्र भाजी - भाकरी.
सोजी केली जाते.

भाकरीला तीळ लावायचे.

 आणि ऋतु तर सांगतोय.... बिनधास्त खा.

थंडी आणि स्निग्धता हे समीकरण. 
स्निग्धता या नावातच केवढा गोेडवा आहे ना....
आता दिवस लहान आणि रात्र मोठी.! 
पांघरुणात लपेटून राहावं वाटतय
मजेत स्वागत करुया....
या गारव्याचे... 
पडलेल्या थंडीचे स्वागत करूया....

कुठे बर्फ पडला कि मुंबईत थंडी वाटते. 

बोचरे वारे असतात.

मुंबईचे तापमान खाली येते, ते इतकेही खाली नसते पण मुंबईकरांना जाणवते

महाराष्ट्रात मुंबई सोडून सगळीकडे तापमान खूप खाली येते, पुणे नाशिक,....
आपल्याकडे जमीन सुद्धा गार असते.

 मुंबईकर लगेच ठेवणीतले लोकरीचे कपडे, शाली बाहेर काढतो.!

नाहीतर कधी वापरणार हे कपडे?????
दरवर्षी अस म्हटलं जात कि काय थंडी आहे नाही...

या अगोदर नव्हती पडली एवढी थंडी!!!!!


डिसेंबरचा शेवट आणि जानेवारी चे काही दिवस गारवा जाणवतो.....

आणि या गारव्याचे, थंडीचे कौतुक आपल्याला असते.

मुंबईतील थंडी आणि मुंबई बाहेरील थंडी अशी तुलना होतेच.

असो....

या व्हाट्सअप्प च्या निमित्ताने सुंदर फोटो येतात

छान माहिती येते....
***********************

Tuesday, 10 January 2017

स्वच्छता अभियान.!!!!!



एक व्हिडिओ आला आणि मन  थोडं मागे गेले.... 
दोनतीन गोष्टींची चटकन आठवण झाली.

⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘


एक गोष्ट

सेनापती बापट यांची.!


सेनापती बापट दादरला राहत असत.! 
माझ्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर.!   
दररोज सकाळी आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ करीत.... नित्यनेमाने
त्यांचे वय मोठे झाले होते.! पण दिनक्रम चुकला नाही. 
स्वतःचे सुंदर घर होते. 
देशासाठी तुरुंगवास भोगला होता.
 देश स्वतंत्र झाल्यावर मात्र परिसर स्वच्छ करत असत.
 ते ती गल्ली झाडून गेले कि लोक (एक मजली चाळ) वरून कचरा टाकत
सेनापती काहीही न बोलता परत गल्ली साफ करत
पण त्या काळी सुद्धा.... 
लोक असे वागत असत सेनापती मात्र दररोज... 
आणि  शांतपणे स्वच्छतेचे काम करीत.
अशा सेनापतींचा पुतळा दादर चौपाटीकडे पाहायला मिळतो.
आणि आजही त्यांचे घर तेथे दिमाखाने उभे आहे आणि ती गल्ली आणि ती चाळही.!
आणि आईने सांगितलेली आठवण माझ्या मनात घर करून आहे.!
(त्या व्हिडिओ मध्ये जसा झाडू दाखवला आहे तसाच झाडू त्यांच्या हातात असायचा.)

असो .... सकाळीच या थोर सेनानीची आठवण जागी झाली.

❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡

तशी एक आठवण....

पुण्याजवळ प्रति बालाजी मंदिर आहे. (नारायण गाव)

तेथे गोड बुंदीचा प्रसाद दिला जातो.
प्रसाद खाताना  सांडलाच... तर ते उचलण्यासाठी माणसे आहेत.
परिसर सुंदर दिसतोच पण प्रसाद पायाखाली येत नाही.

❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡ ❥ ♡


 सुहासिनी मुळगावकर 

यांनी सांगितलेली एक आठवण....
त्या बस ने प्रवास करत
वडील म्हणाले.... तू तिकीट काय करतेस???
काही नाही ... घड्याळाच्या पट्ट्यात लावते
वडील म्हणाले.... रोज एक संस्कृत सुभाषित लिही त्यावर आणि मला दाखव.!
त्या असे करीत आणि 

 त्यांच्याकडे सुभाषितांचा संग्रह तयार झाला होता

आणि याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात झाला होता.

     सर्वसाधारण पणे बसची तिकिटे उतरताना हातातून खाली टाकली जातात.

❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧


     ट्रेन मध्ये अनुभव येतात.

☆ संत्रे घेतले तर सोलून बसल्याजागीच लोक साले टाकतात.... तर त्यांना अटकाव करू शकतो.
☆ कोणी पान खाऊन थुकत असेल तर.... आपण सहज साध्या शब्दात सांगू शकतो.
सरकार नियम कठोर करून दंड जास्त घेऊन कायदे करून जनतेला सरळ रांगेत आणू शकते.

 ★ आपण जेथे राहतो तेथे कचरा कसा होतो????

☆ आपणच सायकल, बाईक याचे तुटके पार्ट एखाद्या कोपऱ्यात टाकतो.
☆ गप्पा मारता मारता मागवलेला चहा... त्याचे प्लास्टिक कप तिथेच कोपऱ्यात टाकतो
☆ पावसात बाईक कव्हर बाजूला ठेवतो.
☆ मुलांना काही खाऊचे पॅकेट देतो... ते तिथेच टाकतो
☆ केस विंचरल्यावर केसाचे गुंता गॅलरीतून खाली टाकतो

❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧ ❦ ❧


◇ रस्त्यावर केळ्याचे साल पडले तर आपण कोपऱ्यात टाकू शकतो
◇ काचेचे तुकडे, लाकूड फळी रिकामी प्लस्टिक पिशवी... 
पतंग उडवण्याचा दिवसात गुंतलेला मांजा, 
 सुतळ, प्लास्टिक दोरी,
 गंजलेले लोखंड असे काहीही पडलेले असते
 ते आपण वाटेत असेल तर कडेला किंवा जर डस्ट बिन असेल तर त्यात टाकू शकतो...
यासाठी सरकारला, म्युनिसिपल कॉर्पोशन ला जबाबदार धरण्याची गरज नाही..

**********************

जास्त करून रेल्वे चे ब्रिज असतात तिकडे कोपऱ्यात खूपच कचरा गोळा होतो (डोंगरच)

तरी रेल्वे लाईन मध्ये कचरा गोळा करणारे असतात.
तरी ढिगाने कचरा गोळा होतो

☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆

समुद्र किनारे....

समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही तरी....  
अनेक लोक प्लस्टिक पिशवित कचरा टाकतात.
आणि किनाऱ्यावर असा कचरा दिसतो...
वाळूत बसून काही खाल्ले जाते आणि कागद प्लास्टिक 
फुटलेले चेंडू... फुगे, 
पतंग फाटलेले, मांजा....

गणपती विसर्जन काळात

 निर्माल्य, पेढ्याचे बॉक्स, सजावटीचे साहित्य... थर्माकोल... 
लहान मुलांचे एक एक चप्पल बूट..मोठ्यांच्या तुटलेल्या स्लीपर, चप्पल....
असे काहीही असू शकते
○○○○○○○○○○○○○○○

तलाव स्वच्छता.... 

आता गावातील लोक तलाव स्वच्छ करतात नाहीतर नदी तलाव सरोवरे गाळाने भरत...
कित्येक स्वच्छ विहिरी कचरा टाकून बंद झाल्या आहेत.



◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

शेगाव येथे आनंद सागर...

येथे तलावात सुंदर बदके विहार करतात.
 संध्याकाळी त्यांना घराकडे आणल्यानंतर तलाव स्वच्छ करतात. 

तलावात पडलेली झाडाची पाने रोजच्या रोज काढतात

म सुंदर तलाव सगळ्यांना आनंद घेता येतो.
एकंदरच शेगाव महाराजांचा मठ परिसर स्वच्छ आणि सुंदर.!!!!!
~~~~~~~~~~~~~~

कागद....

 घरात खूप नको असलेले कागद असतात.
या कागदाच्या लगद्या पासून सुंदर वस्तू बनवता येतात.
०००००००००००००००००

भाजी निवडून जो नको असलेला भाग आणि निर्माल्य यापासून खत बनते.

०००००००००००००००००

फिरायला जातो तर 

तेथे स्वच्छता काय असते ते बघायला मिळाले

कुत्रा पाळला जातो, त्याला सकाळी फिरायला आणतात
त्याचे नैसर्गिक विधी तिकडेच होतात.
 तर एक तरुण कुत्र्याने केलेली शी कागदाने उचलतो आणि हातात असलेल्या कॅरी बॅग मध्ये ठेवतो....
 नाहीतर चला झालाय विधी जाऊ पुढे असेच असते.!
~~~~~~~~~~~~~~

आता आपण सुद्धा चॉकलेट खाल्लं किंवा फळ कापलं 
(प्रवासात) तर एक पिशवी करून सगळे गोळा करून एखाद्या पिशवीत ठेवतो.
आणि नेहमीच्या छोट्या प्रवासात पिशवी नसेल तर पर्सच्या कप्प्यात ठेवतो.
आणि उतरल्यावर dustbin मध्ये.....
••••••••••••••••••••••••••••

परिसर स्वच्छ राहावा म्हणून काही पक्षी प्राणी मदत करतात.

कावळा.... 

सर्दीचे बेडके, मेलेले उंदीर, खाण्याचे काम करून परिसर स्वच्छ ठेवतो.

गिधाड....

 गावाकडे  किंवा जंगलात एखादा प्राणी मृत झाला तर .... गिधाड त्याचा फन्ना करते.
∞∞∞∞∞∞∞∞∞
असे प्रत्येक जणच काहींना काही करत असते.

देह स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करतो.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::
मन स्वच्छ करण्यासाठी नामस्मरण करतो.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::
घराची स्वच्छता रोज करतो
परिसर स्वच्छ राहावा म्हणून काहीतरी प्रयत्न करतो,
घरातील कचरा घरच्या डस्ट बिन मध्ये टाकतो.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::

रिकाम्या प्लास्टिक पाण्याच्या  बाटल्यांपासून 

शोपीस, रस्ते, घरे बनवतात.
(असे व्हिडिओ येतात).

ई– कचरा दर महिन्याला गोळा केला जाईल असे मेसेज whatsapp वर येतात.

जुने कपडे...

 यापासून छान वस्तू करून मिळतात.
किंवा आपण एखाद्या संस्थेत देऊ शकतो.

□ □ □ □ □ □ □ □ □ □ □ □

सध्याचा जमाना हा यूज अँड थ्रो चा आहे....

 त्यामुळे खूपच कचरा होतो.!
(स्त्रीची कामाची सोय होते)

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

हात फिरे तेथे लक्ष्मी वसे.!


❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

किंवा

     घराचे काने कोपरे स्वच्छ करतो... 

 वास्तू पुरुष तथास्तु म्हणत फिरतो असं म्हणतो.


⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘ ⚘

स्वच्छता हि प्रथम मनात असली पाहिजे म्हणजे ती हाताने होईल.

नजरेला दुसरा कशी स्वच्छता करतो हे दिसले तर आपल्या हातून होईल.!

हे काम सरकारचे आहे हा दृष्टिकोन नसावा.


असो.... विषय खूप मोठा
लिहू तेवढे थोडे......

तुमच्याकडे पण काही उपाय असतील तर.... सांगा

«»«»«»«»«»«»«»«»«»«»