सुप्रभात....
वसंत ऋतू सुरु झाला आहे कधीच पण...
आज फिरायला बाहेर पडलो आणि गावदेवी जवळ
अगदी ज्या झाडापाशी आम्ही होतो तेथेच कोकिळ कुजन ऐकू आले...
सहज शब्द आले.
आला वसंत ऋतू आला...
कोकिळ कुहू कुहू बोले.!
कोकिळ कुहू कुहू बोले....
आता नवीन पालवी फुटेल...
निसर्गाचा सृजनाचा काळ..
उन्हाळा
हळूहळू वाढत जाईल,
आणि उन्हाळी फळांची मज्जा अनुभवता येईल,
आता जरी
परीक्षांचा काळ असला तरी
त्यानंतर येणारी मोठी उन्हाळ्याची सुट्टी, ....
सुट्टीत कुठे कुठे जायचे बेत सुरु असतील.!
एक कोकिळ पक्षी त्याचे कुहू कुहू,
मनात अनंत विचार येऊन गेले.
घरी आले तर
सकाळची चिमण्यांची चिव चिव, किलबिल....
मधेच कावळ्याचे ओरडणे...
आणि हो.... अजूनही सकाळच्या वेळी हवेत छान गारवा आहे.
(याचा अनुभव गजबजणाऱ्या मुंबईत घेतोय. मुंबई म्हणजे.. खरतर कोकणच)
खरतर माघ शुद्ध पंचमीला वसंत ऋतू सुरु झालाय.
हा निसर्गाचा उत्सव आहे.
(वसंतोत्सव)
काही ठिकाणी तो कला सादर करून, सरस्वतीचे पूजन करून साजरा करतात.
सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो.
भगवान श्रीकृष्णानेही गीतेत
ऋतूनां कुसुमाकरः
असे म्हणून ऋतुराज वसंताचे वर्णन केले आहे
( अध्याय १० | ३५ )
भरपूर फळे, सुगंधी फुले, कोकिलेचे कुजन...
अशा अनेक गोष्टींनी उन्हाळा सुसह्य होतो.
•••••••••••••••••••••••••••••• ••••••••••
No comments:
Post a Comment