मी आणि मैत्रीण छान संवाद झाला.
आपल्या लाडक्या व्हाट्सअँप वर...
◆ मैत्रीण
◇ मी
◆ सौंदर्य मराठीचे हे तुम्ही लिहिलं आहेत का.?
◇ हो.
◆ सावरकर यांनी कित्ती शब्द दिले आहेत मराठी भाषेला.!
◇ आताच ब्लॉग वर लिहिताना यातील काही शब्द लिहिले.
काही शब्द
संचलन (परेड)
टपाल (पोस्ट)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल) इत्यादी.
◆ किती ग्रेट आहेत सावरकर , किती चपखल प्रतिशब्द सुचवले आहेत त्यांनी, मला वाटते झरणी सोडून बाकी सगळे शब्द छान प्रचलित झाले आहेत.
◇ हो
पण इंग्लिश च्या हट्टापायी...
मराठी बाजूला पडेल
ब्रिटिशांचे राज्य १५० वर्ष!
हे प्रमुख कारण.
◆ इंग्लिश हि आपल्यासाठी पोटार्थी भाषा आहे ना ,
काय करणार?
◇ आणि त्याचे रुबाबदार दिसणे, पैसा, स्वछता हि कारणे झाली.
आपण इंग्रजीकडे वळायला.
कारकून घडवत होते हे लक्षात घेतले नाही.
आणि आपला भारत...
अनेक भाषा बोलणारा देश
त्यामुळे सर्वमान्य झाली हि एक भाषा! इंग्रजी!!!
जोडला जातो माणूस
या भाषेमुळे.!
◆
इस्त्रायल देशाची स्थापना १९४८ साली झाली, जगातील वेगवेगळ्या देशातून
इस्त्रायल मध्ये माणसे स्थलांतरित झाली. त्या देशाची एक भाषा नव्हती,
त्यांनी हिब्रू हि भाषा स्वीकारली,
त्या भाषेत शालेय पुस्तके तयार केली,
हिब्रू चे वर्ग सुरु केली ,
ते अजिबात इंग्लिश वर अवलंबून नाहीत,
जपान मध्येही तसेच आहे,
फ्रान्स ,जर्मन ह्याही देशात तसेच आहे, ते सगळे व्यवहार त्यांच्या स्वतःच्या भाषेत करतात
◇ हो.
आता तुम्हाला तेच म्हणणार होते.
तेवढ्यात फोन आला.
म आपलं बोलणं राहिलं.
◇ आणि आपला भारत...
अनेक भाषा बोलणारा देश!
त्यामुळे सर्वमान्य झाली हि एक भाषा.
जोडला जातो माणूस
या भाषेमुळे
हे कारण असू शकेल
◆ हो तसेही आहे
◇ आमच्या वाडीत चार पाच जण केवळ संस्कृत बोलण्यासाठी दिंडीत जमत असत.
◆ मला असे वाटते
हिंदी हि आपल्या सगळ्यांना जोडणारी भाषा होऊ शकली असती,
पण दक्षिणेतल्या लोकांचा तीव्र विरोध होता ना.....
◇ हो.....
प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते हेच खरं.!
त्यानंतर अजून एक मला मेसेज आला त्याला उत्तर देताना....
मी म्हटलं...
खरंय...
आपण कुणीही भेटलं कि भय्या ... नेच सुरुवात करतो.
मुलांना मराठी मिडीयम मध्ये घालत नाही.
तरी माध्यम कुठलंही असलं तरी शिकवणी हवीच.!
तरी आग्रह... इंग्लिश मिडीयम, आणि शाळेचा प्रवास तर थक्क करणारा..
इंग्लिश मिडीयम, कॉन्व्हेंट स्कूल, ICSC , CBSC
इंटर नॅशनल स्कूल...
असो.... जग ज्या मार्गाने जातंय त्या मार्गाने जावं लागत हेच खरं.
आणि आता या माध्यमाबाबत..whatsapp
यावर रिप्लाय देताना
खूप त्रास होतो म्हणे... मराठीत लिहिताना.!
वाचताना त्रास झाला तरी चालेल
मिंग्लिश मध्ये .... लिहिणार!
अस लिहिलेलं वाचताना अर्थ बदलला तरी चालेल.
आणि म्हणे...
मी मराठी !!!!!
बघा... कसा बदलतो अर्थ,
( हा आहे आलेला मेसेज )
काही वेळेला इंग्रजी अक्षरं वापरून मराठी लिहायचा केलेला प्रयत्न पाहून हसू येते.
अर्थ बदलतो.
गैरसमज होतो, कसा ते पहा...
एकानं कॉमेंट मध्ये लिहिलं होतं,
paus padat (पडतंच म्हणायचं असंल) hota,
Mi bhaji (भजी का भाजी) khau shakalo nahi.
एकानं एका कॉमेंट मध्ये लिहिलं,
janu tuch kelas. वाचणाऱ्या लेडीजला वाटलं
हा आपल्याला जानू (janu) म्हणतोय.
त्याला ‘जणू’ म्हणायचं होतं.
Vadhdivas हा शब्द तर वधदिवस वाटतो.
Vadhdivasachya shubhechha. वाचा जरा.
Ghan ghan mala nabhi datlya
सुरुवातीस वाचताना घाण घाण माळा असं वाटतं..
आणि काही वाक्य सुचतायत का तुम्हाला?
म्हणून म्हणतेय मराठीचा वापर करा.
No comments:
Post a Comment