Wednesday, 15 February 2017

आज १५ | २ | २०१७

गेल्यावर्षी १६ | २ | २०१६

यादिवशी गीता वर्ग सुरु झाला होता.

आज १५ | २ | २०१७

आज गीतावर्गाला 
एक वर्ष पूर्ण झाले...

कसे वर्ष गेले हे कळलेच नाही.

मंगळवार व बुधवार...
संध्याकाळी ६ ते ७ नेमाने आणि ठरल्यावेळी सुरु आणि ठरल्यावेळी सुटणारा वर्ग..
संथा देण्याची पद्धत.
अनुष्टुप छंद ... १६ अक्षरांची एक ओळ
(भीमरूपी प्रमाणे)
यातील ८ अक्षरांचा एक गट करायचा.
 तो सात वेळा म्हणायचा नंतर दुसरा गट सात वेळा म्हणायचा
म पूर्ण ओळ ५ वेळा म्हणायची. 
अशीच दुसरी ओळ
म पूर्ण श्लोक ३ वेळा म्हणायचा. 
तसेच त्रिष्टुप छंद... २४ अक्षरे
१२ अक्षरांचा गट करून चालीत म्हटले जाते


हि संथा देण्याची पद्धत.
असे पाच श्लोक संथा देतात.
या वर्गात ओघाओघाने काही श्लोकांचा अर्थ अगदी थोडक्यात सांगतात.
फक्त गीता कशी म्हणायची याचे मार्गदर्शन होते.
तरीही गीता वर्गाची ओढ लागली आहे.
तर... आज एक वर्ष पूर्ण झाले ... त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम केला..
काही जण घरी जाऊन किंवा वर्गाला येण्यापूर्वी अर्थ बघतात.

वर्गातील काही सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

यामुळे छान मार्गदर्शन झाले. 

१) या सदस्यांनी सांगितले कि...
 पु.ल. म्हणतात कि 

काय  सांगितलं यापेक्षा कोणी सांगितलं याला महत्त्व आहे.

अर्थ बघितल्यावर काही शोध लागले
 म शोध म्हणजे काय तर अनेक गोष्टी वडीलधारी सांगत असतात. 
त्या आपण दृष्टीआड करतो.

गीता म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी दैनंदीन गोष्टींवर काही  भाष्य केलंय.

६ | १७
युक्ताहारविहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्त स्वप्नावबोधस्य
योगो भवति दुखःह।।

अर्थ: हा योग फार खाणाऱ्याला, 
अजिबात न खाणाऱ्याला, 
फार झोपळूला तसेच 
नेहमी जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही.
२ | ६३
क्रोधाद्भवति सम्मोहः (स)
सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो
बुद्धी नाशात्प्रणश्यति ।।

अर्थ: रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो.
 मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते.
 स्मरणशक्ती भ्रष्ट झाली कि बुद्धीचा म्हणजे ज्ञान शक्तीचा नाश होतो.

(हे भगवंतांनी सांगितलंय म्हणून आपण विचार करायला प्रवृत्त होतो)

आपण जे काही काम करत असतो, त्याला पाच कारण आहेत,

ज्या माणसाला असे वाटते कि मी काम करतो तो माणूस मूर्ख आहे.


१८ | १६
तत्रैवं (व्ँ ) सती कर्तार
मात्मानं (ङ् ) केवलं (न् )
तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान् 
न स पश्यति दुर्मतिः ।।

३ | २७ 
प्रकृतेः क्रियमाणानि
गुणैः (हि) कर्माणि सर्वशः

अहङ्कारविमुढात्मा
कर्ताह मिति मन्यते ।।

कुठल्याही कर्माचा अहंकार न बाळगता कर्मे करावीत.

अर्थ: वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. 
तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष
' मी कर्ता आहे ' असे मानतो.
~~~~~~~~~~~~~

२) ब्रह्मविद्येची जननी गीता आहे.

 म्हणून या
गीतारुपी गंगा आपल्या दारात येत आहे.
यात जर आपण सहभागी झालो नाही तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच.
आपण वर्गाला नियमित येतो याचा आनंद शिक्षकाला होतो.

पाठांतराची आपल्यात क्षमता असते.

~~~~~~~~~~~~~

३) गीता वर्ग हा आनंद दायी सोहळा आहे...

~~~~~~~~~~~~~

४) श्री. श्रीकृष्ण जोशी सर

 गीतेचे विनामूल्य ,

पण अमूल्य मार्गदर्शन करत आहेत.

शाळेत संधी सोडून गीता म्हणत होतो.
पण काही ठिकाणी संधी सोडवला नाही तर निरर्थक शब्द येतात..

नपुसक लिंगी...
महिंसा, मराग, 

गीता पठण प्राणायाम घडवते.

 जिभेवर नियंत्रण आणते.

.................................

पण या वर्गात उच्चार नीट करायला शिकलो.
सरांनी कागद दिलेला आहे
जेणेकरून उच्चार कसा करायचा ते समजते.
५|८
दुसरी ओळ

पश्यञ्   श्रृण्वन् 

स्पृशञ्   जिघ्रन्

नश्र्नन्    गच्छन्

स्वपञ्   श्र्वसन्

असे उच्चार करायचे आहेत
५|९

पहिली ओळ

प्रलपन्   विसृजन्

गृह्णन्   नुन्मिषन्

नुमिषन्   नपि




✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿
५) गीता म्हणताना योग्य आघात दिले, 
अनुस्वाराचा योग्य उच्चार केला, 
एका तालासुरात म्हटली तर....
छान वाटते.
पाठ करायला सोपे वाटते
~~~~~~~~~~~~~
काही अध्याय पाठ करत आहोत.
 पाठ होत आहेत.
~~~~~~~~~~~~~~

हे भगवंताचे प्रत्यक्ष शब्द आहेत.

********************
पाठांतर अशा स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता, 
पण गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला..
एक नवीन शिकले .!
उगाच भीत होते...असे वाटले...आणि 
असेही लक्षात आले कि आपण जर योग्य करत असू
 परफेक्ट असू पूर्ण माहिती असेल तर धीटपणे म्हणू शकतो. 

आता गीता चांगली म्हणता येईल याचा आनंद होतो.


प्रथम जेव्हा गीता म्हणू असे वाटले 
तेव्हा पहिलेच दोन शब्द वाचून पुस्तक खाली ठेवले होते,

 पण आज मात्र सुयोग्य मार्गदर्शनमुळे रोजच गीता पुस्तक हातात घेऊन ती वाचते..


११ | २६

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः|

भीष्मो द्रोणः 
*सूतपुत्रस्तथासौ*

सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ।।

अर्जुनाने कर्णाचा उल्लेख सूतपुत्र असा केला आहे,

पण श्रीकृष्णाने आणि धर्मराज युधिष्ठर यांनी 

कधीही कर्णाचा उल्लेख सूतपुत्र असा केला नाही.


अशा काही गोष्टी कळत आहेत.!

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

गीता साध्या गोष्टीतून 



 Awesome Read. Don't miss this. 

Bhagavad Gita 

Why do we read Gita, even if we can't understand or remember ????

Story:
An old Farmer lived on a farm in the mountains with his young grandson. 

Each morning Grandpa was up early sitting at the kitchen table reading his Bhagavat Gita. His grandson wanted to be just like him and tried to imitate him in every way he could.

One day the grandson asked, "Grandpa! I try to read the Bhagavat Gita just like you but I don't understand it, and what I do understand I forget as soon as I close the book. What good does reading the Bhagavat Gita do?"

The Grandfather quietly turned from putting coal in the stove and replied,
"Take this coal basket down to the river and bring me back a basket of water."

The boy did as he was told, but all the water leaked out before he got back to the house. The grandfather laughed and said, "You'll have to move a little faster next time," and sent him back to the river with the basket to try again. This time the boy ran faster, but again the basket was empty before he returned home. Out of breath, he told his grandfather that it was impossible to carry water in a basket, and he went to get a bucket instead.

The old man said, "I don't want a bucket of water; I want a basket of water. You're just not trying hard enough," and he went out the door to watch the boy try again.

At this point, the boy knew it was impossible, but he wanted to show his grandfather that even if he ran as fast as he could, the water would leak out before he got back to the house. 

 The boy again dipped the basket into river and ran hard, but when he reached his grandfather the basket was again empty. Out of breath, he said, "See Grandpa, it's useless!"

"So you think it is useless ?" The old man said, "Look at the basket." 
The boy looked at the basket and for the first time realized that the basket was different. It had been transformed from a dirty old coal basket and was now clean, inside and out.

"Son, that's what happens when you read the Bhagavat Gita. You might not understand or remember everything, but when you read it, you will be changed, inside and out. That is the work of Krishna in our lives."

Jai Shri Krishna

हि गोष्ट सारांश रुपाने मराठीत एका सदस्याने सांगितली
आणि मग हे...

 मनोगत....

मी नुसतीच गीता पाठ करत होते, पोपटपंची करत होते.
आणि हि गोष्ट वाचनात आली आणि लक्षात आले कि...
 जरी नुसती वाचली पाठ केली तरी काहींना काही कळतेच,
 आपल्यात काहीतरी बदल होतो 
असा मला अर्थ लागला आहे

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽


यानंतर सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर : विद्यार्थी असं म्हणतात कि आम्हाला गीता म्हणता आली पाहिजे.

low aim is crime

रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात ....

मना अल्प संकल्प तो हि नसावा.



शृंगेरीला जाऊन तेथे मानधन किती मिळते याला महत्व नाही तर 

शंकराचार्यांच्या हस्ते प्रसाद प्रशस्ती पत्रक व मानधन  मिळवायचे लक्ष ठेवा.

आपल्याला आनंद मिळवायचा आहे.

याकरिता शृंगेरीला जायचं.

**********************

आमच्यात काही त्रुटी आहेत....

********************

दीर्घ उच्चार नीट करा.

गीता... भीष्म ... भीम

दीर्घ ..ई कार वर लक्ष ठेवा.
::::::::::::::::::::::::::::::::::::::

असाच उत्साह ठेवा.

प्रत्येक गीता प्रेमीने

आणखी एक गीता प्रेमी तयार करावा 

अशी प्रत्येकाला विनंती आहे. 

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

No comments:

Post a Comment