मी आणि काका, followup साठी भाटिया हॉस्पिटल मध्ये गेलो होतो.
आमच्या
मागच्या ओळीत दोन तरुणी साधारण १८/१९ वय असेल, मोबाईल मध्ये ..... बघत
होत्या.
इतक्यात एक कुबडी घेतलेला माणूस, बसण्यासाठी तिकडे वळला,
मी त्या
मुलींचे लक्ष वेधले आणि म्हटले त्यांना बसायला जागा द्या.
त्या
मुलीने आपली खुर्ची तर सोडली नाही फक्त पाय जवळ घेतले,
ती व्यक्ती
म्हणाली.... असुदे मी बसेन तिकडे.!
आणि ती व्यक्ती त्या तिसऱ्या खुर्चीकडे
कुबड्या सावरत, स्वतःला सांभाळत जाऊन बसली.
आणि या मुली मात्र पुन्हा मोबाईल मध्ये रममाण झाल्या....
ना कसली खंत ना कसला खेद...
खरंच माणुसकी लोप पावत चालली आहे कि...
समजत नाही कि संस्कार कमी पडत आहेत? कि बेफिकिरी....
कि मोबाईलचे व्यसन????
मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या एका घटनेने.!!!
★ मैत्रीण
★फार वाईट वाटलं वाचून...आमची पिढी अस कस वागू शकते
पण मी असं नक्कीच वागत नाही आणि वागणार नाही.
हे माझ्याकडून प्रॉमिस आहे तुम्हाला!!!
☆ हे छान .
पण ...
आणि मला खात्री आहे तू असे कधीच नक्कीच वागणार नाहीस.
★ येस, तुमचं एकदम खरंय!
पण यासाठी संस्कार वर्ग घ्यायला हवेत. अस मला वाटतं.
☆नाही ग
संस्कार वर्ग काहीच करू शकणार.
कोणावर निष्ठा नाही,
आई वडिलांचं ऐकायचं नाही,
मॉडर्न मॉडर्न म्हणून सगळं सोडून देतात...
आता शाळेत असताना शिकलोय ना...
अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करावी.
--☉☉---☉☉---☉☉---☉☉---☉☉---
हो पण हि एकच घटना नाही
अशा अनेक घटना बघतो आपण.!
तिकडून निघाले ती व्ही एम
( ए.सी. मार्केट जवळ असलेली अंध विध्यार्थी शाळा )
मध्ये जायला बस मध्ये
बसले स्टॉप वर उतरले
आणि नेहमी प्रमाणे लक्ष...
कोणाला क्रॉस करून हवा आहे
का???
तर एक मुलगा चाचपडत चालला होता.
असे चित्र बऱ्याच वेळा बघायला मिळते.!
प्रत्येक जण असा काही घाईत असतो कि.....
आपल्या आजूबाजूने, पुढे कोणी ब्लाइंड जात असेल तर दुर्लक्ष करतात...
एक मध्यम वयाची बाई... या मुलाच्या मागून पुढे गेली
पण... तिने काही रस्ता क्रॉस करून दिला नाही.
मी माझा वेग वाढवला आणि मागून आवाज दिला..
व्ही. एम. मध्ये जायचय ना.?
हो. असे म्हणून तो थांबला...
आणि आम्ही रस्ता क्रॉस केला..
मनात नाना प्रश्न आले
लागोपाठ घडलेल्या या दोन घटना....
तरुण आणि मोबाईल ... पण
इकडे तर मध्यम वय आणि फक्त आपलं काम झालं पाहिजे हा विचार?????
अशा अनेक घटना... आपल्या आजूबाजूला घडताना बघतो,
कधी आपल्या कडूनही अस होत असेल.
पण... खरंच ज्यांना मदत हवी असेल त्यांना मदत करायला हवी..
या
शाळेच्या शेजारीच एक पेट्रोल पंप आहे,
तेथे तर... गाड्या टॅक्सी गॅस
भरण्यासाठी ओळीत उभ्या असतात.
तर मुलांना जाताना त्रास होतो, पण....
ना तिकडे कोणी लक्ष देत, ना कोणी मदत करत.
मुले मात्र स्वावलंबी आहेत,
त्यातूनच मार्ग काढत व्यवस्थित संस्थेत येतात.
हे अजून एका मैत्रिणीबरोबर शेअर केलं
तिचा अनुभव वेगळाच.....
ठिकाण वेगळे, आणि व्यक्ती थोडी ज्येष्ठ.
● मैत्रीण
● एक आज्जी चर्चगेटला रस्ता क्रॉस करत होत्या,
वेळ रात्रीची. मी ऑफिस मधून येत होते.
जवळपास ८.३० वाजले होते.
त्या आजीना रस्ता क्रॉस करायला जमत नव्हतं.
म्हणून मी आपलं जाऊन विचारलं....
मी तुम्हाला मदत करू का???? रस्ता ओलांडायला???
आजी : ( ओरडून) मला काय जमत नाही अस वाटतय का??
● म मी तेथून सरळ निघून गेले.
● आपलं समाधान कि आपण मदत हवी का हे विचारायला गेलो.
☆ यावर मी :- पण... परत कोणाला मदत हवी असं वाटलं
तर मदतीचा हात पुढे करावा.
☆ अगं मला काही वेळा शाळेत जायचं नसतं/ बोलवत नाहीत म्हणून...
तर असं वाटत कि दोन तास त्या स्टॉप वर उभे राहावे.
आणि अगदी एका मुलाला जरी रस्ता क्रॉस करायला मदत केली
तरी दोन तास सार्थकी लागतील.
No comments:
Post a Comment