Sunday, 1 April 2018

यावर्षीचा संकल्प...


  गीता लिहिणे

संपूर्ण गीता बघून लिहिणे...
या प्रमाणे १ जानेवारी २०१८ या दिवशी लिहिण्यास सुरुवात केली
त्याप्रमाणे मार्च मध्ये गीता लिहून झाली..
हनुमान जयंती ३१ मार्च यादिवशी लिहून पूर्ण झाली.
पण गीतेची तर खूप पुस्तके आहेत.
*******************

○ आम्हाला सरांनी दिलेले मूळ मोठा टाईप पुस्तक

22 नंबर चे पुस्तक.!


○ दुसरे पुस्तक आहे ते 
*भगवद गीता*
*जशी आहे तशी*
कृष्णकृपामूर्ती
स्वामी प्रभूपाद यांचे 
भाषांतर आणि विस्तृत तात्पर्यासहित.!

○ जे घरोघरी असते... छोटे. पॉकेट म्हणावे असे
यात श्लोकाचा मराठी अर्थ आहे.

○ अजून एक पुस्तक. 
जे पद्म पुरणान्तर्गत
 प्रत्येक अध्यायाच्या माहात्म्य सहित
 15 नंबर
मोठया अक्षरात...
 मराठी श्लोकांचा अर्थ... 
(मराठी – टिकासहित)

○ आणि सगळ्यात महत्वाचे
मोबाईलमध्ये असलेली भगवदगीता.... 
(PDF फाइल आहे..)
जी अतिशय उपयोगी

जी ऑफलाईन वाचता येते.

म्हणजे कोठेही जा
गीता आपल्या हातात, 
 आणि केव्हाही वाचू शकतो.!

तर अशी अनेक पुस्तके असताना

 मी गीता लिहिली आणि त्यात काय अजून आहे???

तर...
 त्यात गीता शिकताना नियम सांगितले गेले
 उच्चार कसा करायचा ते सांगितले ते लिहिण्याचा प्रयत्न केलाय
अजूनही काही लिहीन...

आता गीता पाठ तर झाली 

पण काही वेळा एका पुस्तकाची सवय होते,

 कदाचित ओळीवरून नजर फिरते

असे होऊ नये म्हणून रोज गीता वाचताना वेगवेगळ्या पुस्तकातून वाचते

आता सरांनी दिलेल्या पुस्तकावर खुणा आहेत
बाकीच्या पुस्तकात नाहीत
म पाठ असल्यामुळे सहज वाचता येते.

<><><><><><><><><><><><><>

No comments:

Post a Comment