Saturday, 31 March 2018

कर्जत गेट टू गेदर

२९ मार्च दुपार...

  निघालोय कर्जत वावर्ले येथे गेट टू गेदर साठी.

 सव्वा दोन वाजता निघालो.

ऐरोली येथे मस्त बहावाची झाडे...
 फुललाय बहावा खूप खूप फुललेली झाडे...
 इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पाहत होते झाडे...

वाहव्वा वाहव्वा...

बहावा बहावा 

डोळे भरून पहावा

सोनेच जणू...
मस्त वाटलं
इतके दिवस कविता वाचत आहे.
फोटो बघत आहे, 
आज प्रत्यक्ष बघितला बहावा... 
तसा बहावा मुंबईत बिगबझार येथे दोन वर्षांपूर्वी बघितला
 तेव्हाही खूप आनंद झाला होता...
पण आज ऐरोली येथे ओळीने पाचसहा फुललेली झाडे बघून आनंद झाला.

मुलुंड हायवे वर पांढरी गुलाबी अशी फुले दिसत आहेत.
 खूपच आहेत झाडे पर्णहीन पण फुलांनी बहरलेली ...
 नाव माहित नाही... 
या उन्हात सुखद वाटत आहेत. 
कापूस वाटत आहे लांबून.!

लॅबर्नम ...

 तर विचारूच नका इतकी झाडे आपले रस्त्यावर स्वागत करत उभी आहेत...
 हि फुले सुध्दा बघताना नयनसुख मिळते..
अगदी सोनेरी मणी आहेत असे वाटते...
एक सुंदर दृश्य...
 सुंदर फुललेला लॅबर्नम आणि त्याच्या पुढेच लालचाफा.!
पिवळा रंग आणि पुढेच हि लालसर फुले .!
मस्त दिसत आहे

कांचनची फुले सुध्दा अशीच अधेमधे आहेत.. 
या फुलांचा रंग लक्ष वेधून घेतो. 
मागे ऑपेरा हाउस येथे दोन झाडे बहरलेली बघितली होती.
पण अजून पिवळा कांचन मात्र बघायला नाही मिळाला

देवचाफा आहे मधेच

पूर्ण भरलय झाड फुलांनी.. पान नाहीच

 

झाडाला काटक्या काटक्या... पण फुले मात्र भरपूर


बोगनवेल..

 

 

. पांढरी, कुठेतरी लाल
 पण बहुतेक राणीरंग...
 क्वचित पिवळी.!

अजून एक वृक्ष आहे फुलांचा... 
ब्रिज वर असताना
 हिरव्यागार पानांपानांंवर गुलाबी रंग फार सुंदर दिसतात हि फुले... 

मुंबईत सुद्धा हे वृक्ष दिसतात...


अजूनही काही फुलं दिसतात...

 उन्हाळा मात्र सुखद करतात हि फुले...

ना गंध ना फुले सजावट करता येत नाही डोक्यात नाही देवाच्या पायाशी जात पण, नेत्रसुख उन्हाळा सुसह्य करतात रस्त्याची शोभा वाढवतात सावली देतात काही औषधी असतात


पण.... या फुलांकडे बघायला वेळ कुणाला???
प्रत्येक जण वेग सांभाळतोय...
या फुलांचे कौतुक??? 
कोण करणार???
लक्ष सुध्दा द्यायला वेळ नाही.... 
वेळ आणि वेग याचे गणित सांभाळतोय....
प्रत्येक जण.!!!

आज ३१ मार्च

संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो... 
लक्ष मात्र कुठे कोणती फुले दिसतात याकडे...

 प्रेमपूरी आश्रम 

येथे असेच एक गुलाबी फुलांचे झाड दिसले.!

गावदेवी जवळ  

गुंजांचे झाड त्याला फुले आलेली प्रथमच बघितली...
आता शेंगा होतील आणि 
त्या वाळू लागल्या कि त्याच्या शेंगा फुटतील
 आणि रस्त्यावर लाल मोठ्या गुंजा दिसतील.

दाभोळकर यांच्या दत्त मंदिर आवारात 

मधुमालती बहरली आहे.. 
लालसर, गुलाबी फिकी गुलाबी... फुले आपले लक्ष वेधून घेतात...

बाजारात मोगरा चाफा... आहेतच.!

 


पुढे 

बिर्ला क्रीडा भवनच्या आवारात

 रुई ची फुले खूप बघायला मिळाली.
पाने थोडी लहान वाटली.!

समोरच बालभवन... 

एक झाड पूर्ण फुलांनी भरलेले... 
आपोआप पावले समोर त्या झाडाकडे वळली...
.
पिवळसर पांढरी गुच्छागुच्छानि फुले...

 पण नाव माहित नाही...
 पुढे आलो तर याच फुलांचे थोडे लहान झाड...
आणि त्यावर चिमणीसारखा छोटा पक्षी शीळ घालत होता...
 अजून तसेच चारपाच पक्षी या फुलाजवळून दुसऱ्या फुलाजवळ जाऊन फुलात आपली टोकदार चोच खुपसून बाहेर काढत होता
मज्जा वाटली...
 पाच मिनिट निरीक्षण केले आणि पुढे आलो..
 या आवारातच अशी पाचसहा फुललेली झाडे बघायला मिळाली... 

कण्हेर ...

 

 हि सुद्धा फुलली आहे.. 
या आवारात दोनतीन झाडे आहेत.. 

चाफा... 

 

थोडा गुलाबी... मस्तच दिसतोय... 
*******************************
आझाद मैदान येथे अशीच काही फुले बघितली... 
पाने नाहीतच, रंग हलका गुलाबी पाकळ्या अगदी छोट्या नाजूक.
! सतत पाकळ्या गळत असतात.. 
कुणीतरी म्हणाले... 
 चेरी ब्लॉसम असतील... 
अजून मागे एक फुलझाड बघायला गेले होते... 
त्यावेळी त्या झाडाला पाने होती पण फुले जास्त होती.
. हेच झाड आझाद मैदान च्या कॉर्नर ला बघितले... 
आता या झाडाला फक्त फुले...
 हि पण सारखी फुले टपटप गळत आहेत... 
रस्ता असा हलका गुलाबी दिसतो... 
लोकांची वर्दळ भरपूर आहे...
 पण कोणी याची दखल घेते कि नाही कुणास ठाऊक....?

निसर्ग आपल्या परीने उन्हाळा सुखद करतोय...

 या फुलांचे या काळात फुलणे,
 त्यांचे असे नेत्रसुखद रंग.
. उन्हाळा सुसह्य करतोय हे मात्र नक्की.! 

आपल्या आजूबाजूला आपले लक्ष मात्र हवे...

 फुलांची आवड  हवी... नाहीतर वेळ नाही वेगाचे वेड...
 यात आपला हा आनंद निघून तर जात नाही ना...
✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽


No comments:

Post a Comment