Thursday, 5 April 2018

प्लास्टिक बंदी

प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक

अशी एक पोस्ट आली आणी विचारचक्र सुरु झाले...
( आलेला लेख खाली देईन )

कोलगेट दंतमंजन (पावडर)  पत्र्याच्या डब्यात मिळण्यापूर्वी राखुंडीने दात घासत होतो
कागदी वेष्टनात... गुलाबी गोडसर चवीची राखुंडी मिळत असे.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
खाकी फेस पावडर खोक्यात मिळे.

गावाकडे तांबे पितळच्या घागरी कळशा वापरत
पण काही वर्षापासून प्लास्टिक कळशा बघितल्या तेव्हा मी आश्चर्यचकित झाले होते.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
पूर्वी खाद्यपदार्थ घरीच करण्याची पद्धत होती.
त्यामुळे बाहेरून पदार्थ आणले जात नव्हते.
आता बाहेरून पदार्थ आणतो ते प्लास्टिक पिशवीतून देतात.

*******************

अगदी नारळ पाणी सुद्धा पार्सल म्हटले कि प्लास्टिक पिशवीतून देतात...

 त्याचे कसब फार छान असते

पाणी न सांडता तो शहाळे... 
पिशवीच्या तोंडाला लावून पाण्याचा थेंब वाया न घालवता ते ओततो 
आणि straw ने पिशवीचे तोंड बांधतो.
(जर मलई असेल तर वेगळी प्लास्टिक पिशवी, आणि या दोन पिशव्यांना मिळून एक मोठी प्लास्टिक पिशवी)

********************

इडली, डोसा, दहीवडे, पीठ घरी तयार केले जात होते.
आता दर पाच मिनिटांवर माटुंगा.. येथील स्पेशिल
पीठ मिळते... 
सोय म्हणून दे अर्धा किलो... 
असे म्हणून आपण प्लास्टिक पिशवितील बांधलेले पीठ घेतो...

::::::::::::::::::::::::::::::::::::

उपमा, पोहे, शिरा, खिचडी, 
इडली, चटणी, सांबार, पार्सल घेतले कि चम्मच नाही का असे विचारतो 
आणि प्लास्टिक चमचा सुद्धा घेऊन येतो
आणि प्लास्टिक पिशव्या उघडून ते, प्लास्टिक चमच्याने खातो...

✧✧✧✧✧✧✧✧

पूर्वी चहा कॉफी चांदीच्या कप बशीतुन दिली तर श्रीमंती कळायची पण...
 घरात उंची क्रोकरी शोकेस मध्ये दिसते 
आणि पाहुण्याच्या हाती 

use and throw कप...

 दिले जातात
अगदी थर्माकोल, प्लास्टिक किंवा कागदी.!

✧✧✧✧✧✧✧✧

पूर्वी काचेच्या बाटलीत टोमॅटो सॉस मिळत असे आता...

 रिफिल पॅक.!!


अशा अनेक गोष्टी रिफिल पॅक मध्ये उपलब्ध आहेत.

✧✧✧✧✧✧✧✧

तेल सुद्धा किटली मधून घाणीवरून आणत होतो.

चुकून एखादी वस्तू प्लास्टिक मधून आली तर.. 
ती जपून ठेवत होतो
जस कि मिठाई, 

पाणी तर ... आता आम्ही बिसलरी पितो

 म्हणून घरून पाणी नेत नाहीत.
मिनिटा मिनिटांवर बिसलरी बाटली हव्या त्या प्रमाणात मिळते.
तरी आपली तहान भागल्यावर
समजा थोडे पाणी त्यात उरले तर... 
पाण्यासकट ते फेकून देतो...
असो..

♤♤♤♤♤♤♤♤♤♤

जसे जिभेला जे चविष्ट लागते ते बेताने, कमी खावे म्हणतात 
तसे हे प्लास्टिकचे म्हणावे लागेल...
सुंदर रंगीबेरंगी, टिकाऊ
पण... त्याचे दुष्परिणाम???

तर काही वेळा 
use N throw..

अशा या प्लास्टिक पासून दूरच राहा असे होणार..

::::::::::::::::::::::::::::::::::::


 काजू ...गावाहून कागदाच्या पुडीतून भेट म्हणून येत
आता नं 1 काजू प्लास्टिक मध्ये बांधलेले विकत घेतो...
अशी प्रत्येक गोष्ट... 

प्लास्टिक नेच सुरु होते...

::::::::::::::::::::::::::::::::::::

अगदी भाजी आणायची आहे??? 
देईल पिशवी भाजीवाला
निरंजन लावतो पूजेच्या वेळी...
 त्यासाठी तुपात भिजवलेली फूलवात.. 
ती सुद्धा तयार मिळते ती वापरतो.. 
अगदी प्लास्टिकच्या डबीत.!
न भिजवलेल्या वाती सुद्धा प्लास्टिक पिशवीत मिळतात

(पूर्वी घरी वाती करून तुपात भिजवून वापरत)


ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

तसे पानपट्टी... 

सणासुदीला... पानपट्टी आणली तर... पानात बांधून देत असत.
आता आमच्याकडे प्लास्टिक पिशवीतून देतात.
पण एके ठिकाणी खास मघई पान छोट्या प्लास्टिक डबीतून देतात...
पूर्वी पानाचा डबा तोही पितळेचे चकचकीत घरोघरी असत... 
घरचे दारचे स्वतः हवे तसे बनवत... आणि खात..

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ


प्लास्टिक हेच जीवन झाले आहे...

 प्लास्टिक हा श्वास आहे असे झाले आहे..

प्लास्टिक नाही अशी कल्पनाच करता येत नाही.

❦❧❦❧❦❧❦❧❦❧

आंघोळीसाठी अगदी पूर्वी तांब्याचे घंघाळ होते..
म पितळेची बादली, अल्युमिनिअम ची बादली
पत्र्याची बादली... आता प्लास्टिक बादली...
❦❧❦❧❦❧❦❧❦❧
फुलझाडे, शोभेची झाडे लावायची आहेत????
अहो छान छान आकारात आणि वेगवेगळ्या साईज मध्ये, रंगात उपलब्ध आहेत कुंड्या.!!

--☉☉-----☉☉-----☉☉-----☉☉---

पूर्वी कसे काय लोक विना प्लास्टिक जगत होते असा प्रश्न पडतो..

♤♤♤♤♤♤♤♤♤♤


जसे टीव्ही नव्हता तर वेळ कसा जात होता??? 
मुले संध्याकाळी काय करत असा प्रश्न पडतो तसे....

प्लास्टिक नव्हते तर... असा प्रश्न पडू लागलाय

--☉☉-----☉☉-----☉☉-----☉☉---

 प्लास्टिक नाही
पण अजून एक...

सॅनिटरी नपकिन्स...

अगं असे रस्त्यात पडलेले बघितलेत..

गटार साफ करणारा 
गटारात जेव्हा उतरतो तेव्हा... असे नापकिन्स काढताना बघितलंय.!

सोय म्हणून बाळाला आणि मोठ्यांना...
आपण शी शु साठी पॅड्स वापरतो... त्यामुळे संडास तुंबतात.
आणि डस्ट बिन मध्ये टाकले तर.....

कचरा नेणाऱ्यांना घाण...

थोडा या सफाई कामगारांचा विचार करायला हवा
अर्थात यावर आलेला सिनेमा मी बघितला नाही.

केरसुणी... 

पूर्वी सगळे एकत्र सुतळी बांधून करत आता.... 
प्लास्टिक ने बांधतात

खराटा...

 माडाच्या झावळ्या पासून तयार करत... 
आता प्लास्टिक पासून वेगवेगळे झाडू बनतात....

सकाळी उठले कि हातात प्लास्टिक ब्रश... 
पूर्वी बोटाने किंवा बाभळीच्या काडीने दात घासत होतो...

अमृतांजन बाम, व्हिक्स... आयोडेक्स
 हे काचेच्या बाटलीत मिळत असे...

 आता सोय म्हणून प्लास्टिक बाटलीत मिळते....


*******************
एका मैत्रिणीला प्रश्न पडला...
आता सगळा भार
 कागदावर येणार!
 म्हणजे परत वृक्ष तोड आलीच
 परत पर्यावरण हानी होणारच.
यावर मी तिला म्हटलं
 प्लास्टिक राक्षस झालाय
*******************
आपल्याकडे पूर्वी एकच पेपर येत होता.
आता अनेक वर्तमानपत्र येतात... 
स्कीमच्या नावाखाली.... 
किती जण ती वाचतात
अनेकजण रद्दी म्हणून घेतात 
आणि विकून पैसा करतात....
खरतर आज आपल्या प्रत्येकाच्या हाती e पेपर आहे ना!
टीव्ही वर बातम्या बघतो ऐकतो ना!
म इतके वर्तमानपत्र हवीत कशाला

त्यासाठी किती वृक्षतोड होत असेल???

::::::::::::::::::::::::::::::::::::


हा तो आलेला लेख/ पोस्ट


बघता बघता प्लॅस्टिकबंदी लागू झाली की ....
प्लास्टिक म्हटलं की आपण फक्त कॅरी बॅग्ज एवढाच विचार करतो किनई पटकन. 

आणि आता या प्लॅस्टिकची आपल्याला इतकी सवय झालीये की त्या व्यतिरिक्त जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.

पण मग, आमच्या लहानपणी कुठे होतं हे प्लास्टिक? त्यानिमित्ताने जरा उजाळा देऊया हं आपण त्या दिवसांना 
तेवढंच नॉस्टॅल्जिक ....

सकाळी सकाळी दूध यायचं ते बाटल्यांमधून. दुधाच्या बाटल्यांचा एक स्पेशल स्टँड असायचा. रिकाम्या बाटल्या बाहेर ठेवायच्या त्यात. दूधवाला आला की तो रिकाम्या बाटल्या घेऊन जायचा आणि भरलेल्या ठेवायचा स्टँडमध्ये. तो आल्याची वर्दी त्याच्या पिशवीतल्या बाटल्यांची नाजूक किणकिण द्यायचीच. 
त्या बाटल्यांची ती चंदेरी झाकणं काढली की तोंडाशी जमलेलं चमचाभर क्रीम गट्ट करायला मजा यायची.

डबा भरताना ओलसर भाजी असेल तर मुद्दाम घट्ट झाकणाचा (स्टीलचाच) डबा असायचा. त्याच्या झाकणात एक कागदाचा चौकोन टाकायचा आणि मग डबा बंद करायचा. (जुन्या कॅलेंडरचे असे चौकोन करून ठेवलेले असायचे घरात.) 
मग एक मोठ्ठा रुमाल घ्यायचा. त्यावर तो डबा नीट रचायचा आणि मग त्या रूमालाची चारी बाजूंनी अगदी घट्ट गाठ बांधायची. एवढा बंदोबस्त केल्यावर काय बिशाद डब्यातून काही बाहेर येईल. आलंच तरी ते तो रुमाल टिपून घ्यायचा. जेवणानंतर हात आणि धुतलेला डबा पुसायलाही तो उपयोगी यायचा. येताना त्या डब्यातून हमखास अबोली किंवा मोगऱ्याचा गजरा आणि रुमालात भाजी बांधून यायची. 

त्यावेळेस अंडीसुद्धा कशी द्यायचे? तर एक कागदी पिशवी किंवा पुठ्ठ्याचा बॉक्स घ्यायचा. त्यात राख घालायची आणि त्यात अंडी खुपसून ठेवायची. एकही अंडं त्यामुळे कधी फुटायचं नाही आणि शिवाय ती राख भांडी घासायच्या कामाला यायची. 

भांडी घासतानासुद्धा ही राख आणि नारळाच्या शेंड्या, वीटकरीची पूड किंवा तुकडा असं वापरलं जायचं. उगीच साबण नको की फेस नको. अंगणात एखाद्या झाडाजवळ भांडी घासली की ते पाणी, ती राख आणि खरकटे वगैरे सगळं झाडाला अर्पण. उत्तम खत व्हायचं.

अंजीर, करवंद, जांभळं, द्राक्षे वगैरे पळसाच्या (की अजून कसल्या) मोठाल्या पानांच्या द्रोणात बांधून द्यायचे. बाकी भाज्या आणि सामानासाठी जवळ कापडी पिशव्या तर अगदी हमखास असायच्याच. 

किराणा माल बांधायला आधी रद्दीचे कागद आणि त्याचे पुडे होते. नंतर त्याच रद्दी कागदाच्या पिशव्या आल्या. पुडे बांधण्यापेक्षा सोप्या आणि कामही भरभर व्हायचं. गहू/तांदूळ/ रेशनची साखर वगैरेसाठी तर मोठी ताडपत्री पिशवी न्यायला लागायची.

चक्का, गुलाबजाम वगैरे मिठाई आणायला आम्ही मुद्दाम घरून डबा न्यायचो. 

पावसाळ्यात झाप, आच्छादन ताडपत्रीचं असायचं. रेनकोट रबराचे असायचे बहुतेक. पावसाळी चपलाही रबरीच असायच्या. कधी चामडी वस्तूंचाही वॉटरप्रूफ म्हणून उपयोग व्हायचा.

स्वैपाकघरात तर फक्त धातूचं साम्राज्य असायचं. प्लॅस्टिकला तिथे जराही वाव नव्हता. 

प्रवासात प्यायचं पाणी नेण्यासाठी फिरकीचे तांबे असायचे. 

अगदी भातुकली किंवा खेळणीसुद्धा स्टील, पितळी किंवा लाकडी असायची. 

केसांना रिबिनी, अंबाड्यांना पिना आणि आकडे, कानातले-गळ्यातले-बांगड्या वगैरे सगळं सगळं प्लास्टिक विरहीत.

अजून कुणाला आठवतंय का काही?
खरंच, ठरवलं तर सोप्पय नाही का प्लॅस्टिकवाचून जगणं ....

आज कुठेही शहराबाहेर किंवा रेल्वे रुळाच्या कडेला जाण्याचा योग आला की तिथल्या प्लास्टिकच्या चिंध्या, कचरा, थर्मोकोल sheets/प्लेट्स, पाण्याच्या बाटल्या वगैरे अस्ताव्यस्त मोठमोठे ढीग, त्यामुळे साचलेलं पाणी, त्यावर घोंगावणारे डास आणि माशा आणि त्यामुळे एकूणच परिसराचे बकाल दृष्य पाहून माणूस म्हणून स्वतःचीच लाज वाटते.

आपण दिवसभरात किती प्लास्टिकचा कचरा तयार करतो याला काही हिशेबच नाही. खरंतर सरकारने ही बंदी आणण्याआधी आपणच आपणहून ही बंदी स्वीकारायला हवी नाहीतर पुढच्या पिढ्यांच्या नशिबी आपणच नरक लिहून ठेवला असं होईल.

आजकाल भांडी घासायला बाई मिळत नाही म्हणून बहुतांश पार्टीमध्ये Disposable म्हणून थर्मोकोल किंवा प्लास्टिकचे कप किंवा प्लेट वापरल्या जातात.

परवा आपल्या Snehal Malegaonkar च्या दुकानात (पुण्यात, राजाराम पुलाजवळ) खूप छान पर्याय पहिला. तिच्याकडे केळीच्या सोपटाच्या प्लेट वगैरे उपलब्ध आहेत. ते पाण्यात टाकून ठेवल्यावर तासा-दोन तासात पूर्ण विरघळून त्याचा लगदा तयार होतो आणि तो मातीत मिसळून जातो.

असे काही सोपे पर्यावरण स्नेही पर्याय शोधून काढायला हवेत.

- स्वाती जोशी.


No comments:

Post a Comment