Tuesday, 17 July 2018

भगवद् गीता .... सराव करताना

नोव्हेंबर मध्ये गीता पाठ झाल्यानंतर...

१७ नोव्हेंबर २०१७ या दिवशी गीता पाठ झाली.

पाठांतराचा सराव करताना....
शृंगेरीला कंठस्थ... अशी स्पर्धा घेतली जाते.
यादृष्टीने सराव सुरु केला.
 यासाठी गीता
मुखोदगत असणे आवश्यक आहे.

अशावेळी मनाचा काही वेळा संचार होतो 
आणि चांगले पाठ असून काही बाही म्हटले जाते...
-------------------------------------------------

आमचा वर्ग हा संथा वर्ग.!
संथा म्हणजे एकाने सांगणे आणि दुसऱ्याने म्हणणे.!
यामध्ये उच्चार व्यवस्थित असणे याला महत्त्व असते.
-------------------------------------------------
तर कंठस्थ म्हणजे 
घडान् घडा म्हणणे.!
-------------------------------------------------

दोघी तिघी चौघी असे एकत्र म्हणू लागलो जमेल तसे.!

मी म्हणताना... एकटीच समोर *यांना* बसवून म्हणते.

दोघी असताना एक म्हणते आणि
 मी पुस्तक समोर ठेऊन उच्चार बरोबर करतात ना/
 आणि माझा कुठे उच्चार नीट होत नाही, 
याकडे लक्ष ठेवते,
-------------------------------------------------

उच्चार...

☆ अनुस्वार उच्चार

☆ विसर्ग उच्चार
(वाक्याच्या शेवटी, आणि मध्येच येतो तेव्हा)
☆ विसर्ग नंतर स, क्ष  ष, श,
असेल तेव्हा.!
☆ ऱ्हस्व  दीर्घ उच्चार याकडे नीट लक्ष द्यायचे.
------------------------------------------------

सराव कसा करतो?

• श्लोकाची सुरुवात करून दिली कि पुढे श्लोक म्हणायचा.
निदान चार पाच श्लोक म्हणायचे.. म पुढचा म्हणेल.

• सम विषम श्लोक म्हणायचे...

• जर श्लोकाची सुरुवात करून दिली तर 

तो श्लोक कोणी म्हटला असेल तर... 

तशी सुरुवात करायची
दुसरा अध्याय... ४था श्लोक
उदा. 
कथं भीष्म....
अशी सुरुवात करून दिली तर...
अर्जुन उवाच...
कथं भीष्म 
असे म्हणायचे.. आणि पुढे श्लोक म्हणायचा.!

• दोन श्लोक थोडे सारखे वाटतात ते सारखे नसतात...
पण सारखे वाटल्याने थोडे चुकण्याचा संभव असतो,
ते श्लोक पुन्हा पुन्हा म्हणून चुकू नये अशी खबरदारी घ्यायची.
 
• काही श्लोक म्हणताना गडबड होते म आधीचा श्लोक, 
तो श्लोक आणि त्यानंतरचा श्लोक असे जोडून म्हणायचा, अनेकवेळा...

• एकटे गीता म्हणताना

पुस्तकात बघूनच गीता म्हणायची.

• प्रत्येक अध्यायाची सुरुवात... कोणी केली आणि
 पहिला श्लोक कोणता??? ते नीट करायचे, 
• अध्यायाच्या शेवटचा श्लोक कोणता
आणि अध्यायाचे नाव पक्के लक्षात ठेवायचे....

• श्लोक म्हणत असताना
कोणी आलेगेले, 
कोणी मोठ्याने बोलले
 तरी आपण श्लोक पुढे चालू ठेवायचा...
-------------------------------------------------

अध्याय अठरावा..
अतिशय छान पाठ असला पाहिजे..
पाठांतरच्या वेळी ..

चला झाली गीता पाठ असे होऊ नये.!

----------------------------------------------
अध्याय पहिला सुरुवात धुतराष्ट्र उवाच
हा एक श्लोक यांचा आहे फक्त.!

संजय यांचे अधेमधे श्लोक आहेत... 

तर ते नीट करायचे,

-------------------------------------------------
सञ्जय उवाच
१ | २४
एवमुक्तो ऋषीकेशो गुडकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये 
स्थापयित्वा रथोत्तमम् ।।
-------------------------------------------------
१ |४७
एवमुक्त्वार्जुनः सङख्ये 
रथोपस्थ उपविशत्
विसृज्य सशरं चापं 
शोकसंविग्नमानः
(शेवटचा श्लोक)
--------------------------------------------------
२ | ९
एवमुक्त्वा हृषीकेशं
गुडकेशः परंतपः
न योत्स्य इति गोविन्द
मुक्त्वा तूष्णीं बभूव ह ||
--------------------------------------------------

११ | ९

एवमुक्त्वा ततो राजन्
महायोगेश्वरो हरिः
दर्शयामास पार्थाय
परमं रूपमैश्वरम्
--------------------------------------------------
११ | ३५

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं –
सगद् गदं भीतभीतः प्रणम्य ।।

हे श्लोक चांगले लक्षात ठेवावे...

 थोडी गडबड होण्याची शक्यता असते...
--------------------------------------------------
तसे शेवटचे पाच श्लोक संजय यांचे आहेत,
 ते छानच म्हणता आले पाहिजेत.!
--------------------------------------------------
प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी असते,
कुणी वेगात म्हणते,
 कुणी हळू म्हणते, 
कुणाची चाल वेगळी असते, 
कुणी आठ अक्षरानंतर किंचित pause घेते,
 कुणी सोळा अक्षरे एका दमात म्हणते,
या बरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते.!
--------------------------------------------------

मी रोज गीता म्हणण्यापूर्वी...

ॐ पार्थाय प्रतिबोधितां...

ध्यानम् श्लोक
गीतामाहात्मम्
असे म्हणते.!
--------------------------------------------------

गीता पाठ झाली.
आता काही श्लोक अर्थ,
काही शब्द अर्थ बघते.

सकाळी उठल्यानंतर..
गीतामहात्म्य वाचते, 
संपूर्ण अध्यायाचा अर्थ वाचते....
--------------------------------------------------

गीता वाचताना काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या
(इतके दिवस पाठांतर एवढेच ध्येय होते)

--------------------------------------------------

No comments:

Post a Comment