30 मे
7 च्या विमानाने दिल्ली
पुढे श्रीनगर... विमानानेच
आणि पुढे
मोटारीने सोनमर्ग .!!
सुंदर असा निसर्ग....
दल लेक...
अबब.!! केवढा मोठा परिसर... किती किमी आहे????
दल लेक गोठला. असे वाचतो पेपर मध्ये फोटो बघतो...
सुंदर शिकारे.
नुसते फेरी मारण्यासाठी.
तसेच सुंदर असे राहण्याचे शिकारे.!
अगदी सिनेमात बघतो तसे.
अप्रतिम निसर्ग.!!!
सिंधू नदीचे सुंदर दर्शन.
बहुतेक प्रवासात उजव्या बाजूने कधी लांबून तर कधी अगदी जवळून...
पाणी वेगात वरून खाली आणि दगड धोंड्यातून उसळी मारत धावत आहे.
प्रथम बर्फाच्छादित शिखर बघितले,आणि एकदम खुश झाले.
म कधी गाडी थांबवून फोटो काढले कधी गाडीतून...
आणि राहण्याचे ठिकाण या अशा निसर्गाच्या कुशीत...
कधी सिनेमात बघितले होते आणि आता प्रत्यक्षात...!!!
दिवसा ठीक, उन्हें वाढत जातात आणि रात्री
हू हू हूं हूं थंडी....
तरी आज पहिलाच दिवस.!
वाटेत मेंढ्या भरपूर दिसत होत्या,
अगदी आपली वाट अडते
घोडे... असेच भरपूर.
गायी... अगदी छोटी छोटी वासरे.
आणि हो आपल्या कडे जशी बोगनवेल
तसे इकडे डोंगराच्या पायथ्याशी गुलाब....
हिमशिखरावरून पाणी येतंय.
तसे हे पाणी येतानाच गोठले तर माती मिश्रित बर्फ गोठलाय तो मतकरी दिसतो बर्फ.!
गुलमर्ग , सोनमर्ग दल लेक शिकारे.. असे सगळे ऐकले, काही सिनेमात बघितले होते...
साद देती हिमशिखरे....
आज बघत आहे प्रत्यक्ष.!
काश्मीर... नंदनवन, सुंदरता... वाचून ऐकून होते आज बघताना जाणवतंय.!
No comments:
Post a Comment