Sunday, 22 April 2018

वाहव्वा वाहव्वा बहावा.!!



अगदी वाहव्वा वाहव्वा म्हणावा असा बहावा.!!

अगदी राजवृक्ष.!!

 

 

सोनेरी पिवळ्या धम्मक घोसानी फुले असतात...
प्रथम जेव्हा कविता या माध्यमातून आली तेव्हाच याच्या प्रेमात पडले...
 म शोध घेतला आणि फुले चित्रात बघितली..
खरंच सुंदर.!

आताआताच... 
मुलुंड येथून गाडी ऐरोली कडे वळली
 आणि ओळीने पाचसहा बहरलेली झाडे बघून अगदी हरखून गेले, 
आनंदित झाले मन...

हि ती कविता... जिने फुलांचा शोध घ्यावा वाटला


मन बहावा बहावा...
      डोळे भरून पहावा...
जसे मायेचे तोरण...
    मिळे त्याखाली विसावा
..मन बहावा बहावा...
  डोळे भरून पहावा..

खाली उतरूनी येई...
   सूर्यकिरणांची हि माया
मन बहावा बहावा....

ग्रीष्म ऋतूचे फुलणे...
   लाल पिवळे ..तांबडे.
देई मनास ओलावा....
  हिरवे पान ते सोनुले...

मन बहावा बहावा....

आहे ना सुंदर.!!
(कोणी केली त्याला सलाम)
 हि अजून एक कविता...

बहावा


बहाव्याने किती फुलावे,     
अंगोपांगी हळद लेवून.

सोनसकाळी ऊन कोवळे,
खुलले कांचन अजूनच थोडे.

फांदी फांदी झुकली खाली,
फुले हळदुल्या रंगात न्हाली.  

हिरव्या हिरव्या देठात नव्याने,
लहर अनावर धावत आली.     

मत्त सुखाची लाट चहूकडे.
रंगबावरे माझेही मन.

अंगोपांगी फुलता कोणी.
खुणावते मज वेडे होऊन.

असे खुलावे, असे फुलावे,
देहाचे अवघे भान हरावे.                              

रंध्रात उमटले फुलणे, झुलणे.
वेड तयाचे मला लागले.


 चैत्राची चाहुल बहाव्याच्या पिवळ्या फुलांच्या घोसांनीच लागते.
बहावा शिशिरात पानगळीमुळे शुष्क होतो. 
आपल्याकडे चैत्राला ग्रीष्माची जोड असते. 
एप्रिलमधे प्रत्येक फांदीला कळ्यांचे घोस धरतात. 
मग जो बहराला येतो
 तो पहिल्या पावसाच्या काही सरी अंगावर घेऊनच थांबतो.
 त्याच काळात त्याला पालवीही फुटते. 
ही फुले पिवळीधम्मक, पाच पाकळ्यांची असतात.
फुलांचे ओघळणारे घोस फांद्याफांद्यांवर दिवाळीतल्या कंदिलांप्रमाणे दिसतात. 
पुढे याला शेंगा धरतात. 
शेंग एखाद्या नळीप्रमाणे लांब असते.
 सुरूवातीला हिरवी असणारी शेंग हिवाळ्यापर्यंत पिकून काळपट होते. 
यात बिया व गोड गर असतो.  
हा गर माकडं, अस्वलं कोल्हे यांना फार आवडतो.

हा गर पोटासाठी गुणकारी आहे.

बियांचे चूर्ण मधुमेहावर उपयुक्त आहे.

या गराला एक सुगंध असतो. 
तो तंबाखू बनविण्यासाठी वापरतात. 

बहाव्याची साल व पाने कफनाशक असतात.

ही पाने त्वचाविकार व सर्पदंशावर वापरतात.
एका संशोधनानुसार बहावा हा कर्करोगावरही उपयुक्त आहे.

बहाव्याचं लाकूड

 टणक व टिकाऊ असुन घराचे खांब , शेतीची अवजारे यासाठी वापरतात.
याचे लाकूड उत्तम असते.

शेंगा औषधी असतात.

सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले झाड.!!!
राजवृक्ष असेही म्हणतात
बिग बाजार जवळ एक आठ दिवसापूर्वी बघितला
आता आताच फुलतोय.
गीर जंगल गुजराथ येथे सुद्धा अधेमधे दोन तीन झाडे बघितली होती.

 बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा 

"नेचर इंडीकेटर" असेही म्हणतात,

या वर्षी हा लवकर फुलला आहे. 
आता साधारण २५ मे नंतर पाऊस पडेल. 
या झाडाला 

"शाॅवर आॅफ द फाॅरेस्ट" असेही म्हणतात. 

आणी या वृक्षाचा अंदाज अचुक असतो.

3 comments:

  1. मन पिवळं धम्मक झालं .फुलांचा बहर दृष्टिला आणि शब्दांचा सडा, मनास सुखावून गेला!

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन

    ReplyDelete