Wednesday, 31 January 2018

खग्रास चंद्रग्रहण

: आज ३१ जानेवारी

खूप मेसेज व्हिडिओ येत होते एक सुंदर इमेज आली... 
म आपण पण या ग्रहणाचा अनुभव घ्यावा असे वाटू लागले...
चला नवी इमारत गच्चीवर.!
 ६.१० ला जाऊ या...
असे मैत्रिणी मिळून ठरवले.
गच्चीवर पोहोचलो...
उजेड आहे आणि जोडीला वाईट हवामान... दाट थर अशा वातावरणाचा कोणी म्हणे धुके, कोणी म्हणे आज उष्मा खूप होत होता तर... बाष्प...असो 
चांदोबा मामा इतक्यात दिसणार नाहीत हे नक्की. अजून तिन्हीसांजा होत आहेत, असा उजेड नाही अंधार नाही अशी स्थिती आहे.
कस दिसणार

 खग्रास चंद्रग्रहण  ???

कोणी पुण्याला फोन लावून चौकशी केली दिसतय का ग्रहण???
 छे.. नाही... आता ७ वाजून गेले आणि... 
पूर्वेकडे किंचित लालसर चंद्र दिसू लागलंय..
नजर खूप स्थिर केली आणि....

 yes...

 दिसला लालसर चांदोबा... अगदी धुरकट...
 म फक्त एकच लक्ष चांदोबा बघणे, 
जमल्यास त्याची छबी घेणे....

 वाह मस्तच...

दिसतोय सगळ्यांनाच...
बरं नुसत्या डोळ्यांनी दिसणार म्हणून कोणी दुर्बीण आणली नव्हती...
असो पण सुरेख दिसतोय..
 हळूहळू वर येतोय, प्रकाशित होतोय..
 अरे वाह...

 अगदी अंगठी सारखा दिसू लागला..

 किंचित प्रकशित.! वाह...
आणि म अगदी अंगठी तील खड्यासारखा.! 
आता मात्र फोटो काढण्यापेक्षा.. नजरेत साठवू लागले..
.हळूहळू प्रकाशित होतोय..
चला आता मात्र घरी जाऊ.. 
येणारे व्हिडिओ एवढे मस्त 
पण... प्रत्यक्ष वाईट हवामानामुळे मात्र तेवढे प्रकशित दिसले नाही 
पण दिसले ते नैसर्गिक...

आनंददायी..

 आपण या आजच्या घटनेचे साक्षीदार.!

एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा आली तर... 

 ब्लु मून दिसतो अस काहीस वाचलं होत... 
व्हिडिओ पण येत होते.


 ग्रहण पाळावे, पाळू नये हे प्रत्येकाने आपल्यावर ठरवावे...

आज एक संवाद ऐकला 

काय रे आपण इकडे ग्रहण पाळतो, 
तिकडे अमेरिकेत पाळतात का???

असा प्रश्न का पडावा???

आपले मत अमेरिकेत काय घडते यावर ठरवले जाते का???
आपल्याला स्वतःचे मत नाही का???

आपल्या कडे शास्त्र म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या 
त्याला काही आधार असणार तो कधी सांगितला नाही,
 देव बघेल काय करायचे ते... अशी देवाची भीती घातली
पण यावेळी हवामान बदलत असेल 
म काही आजार होण्याचा संभव असेल म्हणून ग्रहण बघू नका, 
ग्रहणात खाऊ नका
बाहेर फिरू नका... घ
रात स्वस्थ बसा, देवाचे नाम घ्या 

दाने करा असे सांगितले...

पूर्वी ग्रहण सुटले कि काही लोक ...

दे दान सुटे गिराण


तांबे दान, वस्त्र दान, सोने दान, कपडा दान ... 
असे आरोळ्या देत फिरत असत
आणि लोकही असे जे दान द्यायचे असेल ते बांधून ठेवत
 आणि लोक मागायला आले कि देत असत....

केलेल्या पदार्थावर तुळशीपत्र ठेवून ते पदार्थ खाल्ले जात असत
आज आपल्याला तुळशी पाने का खावीत हे समजावले जाते पटवले जाते.... 
पूर्वी फक्त तुळशी ठेवा असे सांगत...

ग्रहण सुटल्यावर आंघोळ करून स्वयंपाक केला जात असे, 

देवांना गोडाचा नेवैद्य दाखवला जात असे, 

त्याला कारण म्हणजे

 वेध लागल्यापासून खात नसत
 म ऍसिडिटी होईल तर गोड खाल्ले कि त्रास होणार नाही
असो
एक खग्रास चंद्रग्रहण आणि आलेले विचार... 
या वेळेस चे ग्रहण वैशिष्ट्यपूर्ण होते हे नक्की

कुणी सुंदर असे पवई येथून फोटो पाठवला...
 सुंदर, वेगळा कॅमेरा


कुणी पुण्याचे फोटो पाठवले


आणि हे इथले ग्रॅण्टरोडचे


कुणी अगदी परदेशातील पाठवला...



No comments:

Post a Comment