संक्रांत
जवळ आली कि बालगोपाळासह पतंग प्रेमींना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे..
त्यासाठी तयारी करण्याचे.!
याची योजना आधीपासून सुरु होते..
आणि यावेळी तर
रविवार आहे...
म काय दिवसभर पतंग पतंग पतंग.!
ढील दे रे ढील दे रे
माझा पतंग उंच उंच जाऊ दे...
भोगी संक्रांत...
या दिवशी पतंग उडवतात.
पतंग उडवता येणे हि एक कला आहे.
तसेच फिरकी गुंडाळणे हि एक कला आहे..
वारा येईल तसा पतंग उडतो.
काही पतंग गोते खातात.
उडता उडत नाहीत.
पतंग खरेदी करण्यासाठी मार्केट मध्ये जाऊन खरेदी केले जातात.
( डोंगरी येथे मोठे मार्केट आहे)
हे मार्केट रात्री सुद्धा सुरु असते.
पतंग उडवण्यासाठी अगोदरच पतंग, फिरकी, मांजा याची खरेदी केली जाते,
पतंगांना अगोदरच कणी बांधली जाते...
(कणी बांधण्याची आपापली पद्धत असते.)
कणी बांधून तयार असली म्हणजे एकामागोमाग पतंग उडवता येतात.
पतंग फाटला तर...
भाताने कागदाचा तुकडा पतंगाला लावून तो भाग चिकटवतात...
****************************** *
पतंग उडवण्याची पद्धत.
काही जण जागेवर उभे राहून
पतंग जमिनीवर ठेवून मांजाला झटके देत पतंग उडवतात.
तर काही सवंगड्याच्या
हाती पतंग देऊन त्याला काही अंतरावर जायला सांगून पतंग उडवतात.
****************************** *
★मांजा...
बदामी मांजा, गुलाबी मांजा आणि पांढरा मांजा... मी बघितला आहे.
★मांजा जर थोडा हवा असेल तर.. तो "वित" या भावाने मिळतो..
****************************** *
काटाकाटी
काही जणांना काटलेला पतंग पकडायला आवडते.
तर काही जणांना पतंगाची काटाकाटी करायला आवडते..
दोनचार पतंग काटले कि मांजा नवीन घेतला कि पतंग काटाकाटी करता येते.
काटाकाटी च्या वेळी पतंग करणाऱ्याच्या
हालचाली वेगाच्या असतात... चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे असतात.
आणि फिरकी संभाळणाऱ्याचे कसब असते...
मांजा भराभर गुंडाळावा लागतो नाहीतर तो गुंततो.
काही जण पतंगाला लांबच लांब शेपटी लावतात,
म्हणजे हा पतंग उंचचउंच जातो.
असा शेपटी लावलेला पतंग संथ स्थिर होतो
आणि आकाशात विहार करतो.
मोकळ्या मैदानात,
गच्चीवर, आणि हो
घराच्या छोटयाशा गॅलरीतून पतंग उडवण्याची मजा घेता येते...
काहीजण देहभान हरपून रस्त्यावर पतंग उडवतात..
यात काही आपले प्राण गमावतात.
तर.. काही पक्षांच्या पायात, पंखात मांजा अडकून ते जखमी घायाळ होतात...
दुचाकी वाहनावरून जाणाऱ्या लोकांच्या अंगाभोवती मांजा लपेटून अपघात होण्याची शक्यता असते.
आभाळ सारे रंगबिरंगी दिसते पतंगामुळे...
जिकडे तिकडे तुटलेले मांजे दिसतात.
झाडावर, विजेच्या तारांवर असे काटलेले/ अडकलेले पतंग दिसतात.
पतंग उडवण्यासाठी जर दोन जण असतील तर छान.
एक फिरकी सांभाळतो
म्हणजे... ढील देणे,
फिरकी गुंडाळणे...
हे अगदी हात सफाईने करावे लागते.!
( अजूनही काही आपली पद्धत चोखाळतात.)
यांची नजर चौफेर असते...
○कोण पतंग कापायला येताय का???
○कोणता पतंग काटता येईल????
○कोणता पतंग खास आहे जो आपण कापून दाखवून आनंद घेऊ???
रात्रीच्या वेळी पतंगाच्या दोरीबरोबर दिवे सोडतात
एकाच वेळी अनेक पतंग उडवताना मागे पाहिले आहे..
साधारण 111 आणि 100 पतंग एकाच
दोरीला
त्या व्यक्ती पतंग उडवताना मरिन ड्राईव्ह येथे बघितले आहे.
आता वेगवेगळ्या आकारात सुंदर सुंदर पतंग मिळतात..
पूर्वी तीनच आकारात पतंग असत
एक अगदी लहान मुलांसाठी
आणि एक मध्यम आकारात..जो सर्व मुले उडवत
आणि एक मोठ्या आकारात असे...
आता कुठल्याही आकारात पतंग मिळतात.
पतंग उडवण्याच्या स्पर्धा होतात.
अगदी
छोट्या मुलांना प्लास्टिक झबला बॅग ला दोरा लावून देतात.
आणि खिडकीतून ती
बॅग सोडून देतात..
जसा वारा असेल तसे ती बॅग काही अंतरावर उडते.
No comments:
Post a Comment