Tuesday, 16 January 2018

आई सुंदर हलवा करत असे

आई....


खरंच ग्रंथ होईल इतक्या आठवणी असतात...

सध्या संक्रांत आहे हलवा दिला घेतला जातोय...

आई....


खरंच ग्रंथ होईल इतक्या आठवणी असतात...

सध्या संक्रांत आहे हलवा दिला घेतला जातोय...


आई सुंदर हलवा करत असे

आई पहाटेच्या थंड वेळेत हलवा करायला घेत असे.
स्वच्छ धुवून वाळवलेले तीळ पराती मध्ये घेत असे.
साखरेचा पाक करताना थोडंसं दूध टाकून मळी काढत असे.
हा पाक एका दिवशी पाव लिटर या मापाने तिळावर हलक्या हाताने चढविला जात असे.
अत्यंत सावकाश मंद आचेवर (मुद्दाम वातीच्या स्टोव्ह वर) सतत तीळ हलवत करावा लागतो.
एक एक चमचा पाक टाकून तो एकेका तिळावर आवरण करत असे. उजाडल्यावर हे काम बंद करी.
नंतर हलवा लवकर वाढण्याकरिता पाक जाड करत असे.
काटा चांगला  येण्याकरिता ठराविक जाडीचा हलवा झाल्यावर ती पाक पातळ घेत असे.
मग छान काटेरी हलवा होई.
दागिने करण्यास मग लवंग, दोरे, डाळं, मिरी, कुरमुरे पाकवले जात असत.
हाताला येणाऱ्या  घामाने काटे मोडतील म्हणून स्वच्छ पातळ फडक्याने हात पुसून घेत असे.
घाई असेल तर रात्री  उशीरा हलवा करणे सुरू  करी. 
मग पुन्हा पहाटे हे काम चालू करे.
असा सुरेख हलवा मी पाहिला नव्हता. 
मग दागिने करणे मजेचे वाटत असे. 
 
( माझी वहिनी हौशीने हलव्याचे दागिने करते )

 पाकात त्या खायचा रंग टाकून रंगीत हलवा करत असे.
पण...  केशरी हवा असेल तर मात्र केशर घालू  केशरी करीत,

हिरवा लाल रंग जास्त झाला तर हलवा कडू लागतो.
जास्त थंडी असेल तर....
 हलवा वाढतो पण 
हलव्याला काटा यायला पाक जेवढा पातळ तितका काटा नाजूक येतो.
वेगवेगळ्या पातेलीत पाक करून गाळून घ्यायचा. परातीत  तिळ थोडे गरम करून मग चमच्याने पाक टाकायच्या.

असा हलवा करायला मी मात्र शिकले नाही...

********************

राजगिरा चिक्की, लाडू


आई घरीच राजगिरा लाह्या बनवत असे आणि लाडू चिक्की बनवत असे

आमच्या येथील लोक उपासाकरिता ते नेत असत... म तो तिचा व्यवसाय झाला..
अगदी आदल्यादिवशी ती हे सर्व तयार करत असे
मंगळवार आणि शनिवार आमच्याकडे लाडू चिक्की तयार असेच.
राजगिरा... रामदाणा
*******************

लसूण चटणी..


आई लसूण चटणी उत्तम करत असे.. अशी चटणी अण्णांना डब्यात दिली कि हमखास सगळे घेत आणि अण्णांना मात्र ती मिळत नसे... त्यांच्या मित्रांनी प्रेमळ सूचना केली... आणि आईला एक व्यवसाय मिळाला...

********************

पुरणपोळी... 

आई उत्तम पुरणपोळी करत असे.. एकदा कोणी विचारले.. आम्हाला करून द्याल का???
आणि आईची पुरण पोळी... आणि तिचा व्यवसाय...

*******************
तसे तिने अनेक कामे केली... शिकली नव्हती ना... म नोकरी नाही
पण संसाराला हातभार म्हणून अनेक कामे केली.
********************
पेट्रोमॅक्स च्या जाळ्या शिवणे, 
पापड लाटून देणे, 
पुरणपोळ्या करून देणे
राजगिरा चिकी लाडू करणे
लसूण चटणी करणे...
शाम्पू च्या बाटलीच्या बुचाचे काम
अशी एक ना अनेक कामे केली.. सगळी कष्टाचे काम.!

तिला विणकाम, भरतकाम, लोकर काम हि आवडत होते...

 त्याच्या वस्तू या मैत्रीखातर करून देत असे..

अक्षर छान होते.

माहिती कात्रणे ठेवणे आवडत होते.

वस्तू जागेवर ठेवल्या तर तिला आवडत होते..

सर्वच नातवंडावर खूप प्रेम होते..


तिने कधी देव देव केले असे आठवत नाही

पण पूजेची तयारी करणे, पूजा झाली कि सगळे स्वच्छ करणे 

पूजेची सगळी भांडी स्वच्छ चकचकीत ठेवणे तिला आवडत असे...

माझ्याकडे गणपतीच्या वेळी ती आली कि प्रथम सगळी भांडी चकचकीत होत असत...


स्वयंपाकाची आवड होती
काहीही केले तरी ते चविष्ट करत असे

आलेल्या प्रत्येकाची आवड लक्षात ठेऊन पदार्थ करत असे.

स्वतःला कपडे दागिने पैसे कमी म्हणून कधीच हिरमुसली नाही.
कोणाला कळत पण नसे
कि हिच्याकडे या गोष्टी कमी आहेत...

कुणाकडे जेवायला बोलावले तर 
आई कधीच आयत्या वेळी जेवायला जात नसे... 
लवकर जाऊन त्यांना मदत करे.
कामावे तो सामावे असे म्हणे...
कोणाला आपल्या घरी बोलावले तर 
सकाळी लवकर उठून कामे वेळेत करून छान आवरून बसे.. 
आणि अगोदर चार पदार्थ करून डब्यात भरून ठेवत असे... 
म्हणजे आल्या आल्या काही देता येते आणि 
जायच्या अगोदर काही हवे का खायला हे विचारता येत असे..
 आलेल्या माणसाला कोणतेही काम करावे लागत नव्हते...
कधीही जेवण कमी पडत नसे... 
अजून दोनचार लोक आले आयत्या वेळी तरी जेवायला वाढता येत असे..

कुठे सहलीला ट्रीपला गेली तर..

. सर्वांच्या बरोबरीने चालत असे
जिथे बसायला मिळेल तिथे बसे, पडेल ते काम करे..

कुणाकडे जाताना घरी केलेला खाऊ बरोबर घेऊन जात असे.

रात्री जरी आमचे नातेवाईक मध्यरात्री ड्युटी संपवून आले तरी 
पटकन पिठलं भात, बटाटा काचऱ्या असे करून वाढत असे.!

आलेल्यांबरोबर गप्पा मारत असे...
 वेळेचे नियोजन उत्तम होते...

No comments:

Post a Comment