Thursday, 11 January 2018

Pink Tabebuia Tree @ ballard estate

11जानेवारी सकाळ



❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

काल एका friend ने फोटो पाठवला व्हाट्सअप वर...




आणि मनात आले...
चला उद्याच जाऊन बघून येऊ... 
ठरले आणि निघालो
आज गुरुवार... मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले... 

आणि 66 नं बस पकडली... 

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

थेट बॅलार्ड पिअरला उतरलो.. बसमधून शोधक नजर...
 कुठे दिसते का ती इमारत आणि ते फुलझाड???
नाही.!!
म स्टॉपवरून चालत मागे आलो... एक इमारत तशीच वाटली पण ते फुलझाड तिकडे नाही... 
चला उजवीकडच्या समोरच्या रस्त्याला वळलो...
 आणि दूर आहे फुलझाड... हो खरंच हेच ते झाड.!!!
 जवळ गेलो

झाड फुलांनी बहरलेले

फिक्का गुलाबी रंग, देठ सुद्धा फिके हिरवे.! 

अगदी अलगद एकेक फुलं येत होते खाली.!

 रस्त्यावर फुलांचा सडा... 

 

मी पटापट फुले वेचू लागले..

तेथील सिक्युरीटी गार्ड जवळ आले आणि 
म्हणाले काय उपयोग आहे या फुलांचा???
 नाव काय???

मी त्यांना म्हटले मराठीत नाव माहित नाही 
आणि
 इंग्लिश मधून याचा उच्चार मला येत नाही...

अहो हि फुले गाडीवर पडली तर खूप छान दिसतात...


जेव्हा मी गूगल सर्च केले तेव्हा हि अजून दोन रंगात असतात फुले असे कळले
पिवळा (गोल्डन)
आणि जांभळा ( पर्पल)

हे एकमेव झाड असावे... (या भागात तरी...)

मी प्रथमच बघितले.
आतापर्यंत फिरले आहे पण असे झाड बघण्यात तरी नाही.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


रस्त्याच्या कडेला लॅबर्नम, गुलमोहोर, कुठेतरी कैलासपती ( नागचाफा  )
अशी झाडे बघितली आहेत, 
(पिंपळ तर अनेक ठिकाणी वृक्ष असतात.
(कागविष्ठेचे झाले पिंपळ)
अतिशय उपयुक्त,
(आणि याच्या मुळाशी विष्णूचा वास असतो असे म्हणतात..
याची पालवी सुंदर दिसते,   पिंपळ पानाची सळसळ, जाळीदार पिंपळ पान) 

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ 


पण हे फुलझाड मात्र आजपर्यंत  बघितल्याचे आठवत नाही.

Pink Tabebuia Tree 

असे एकमेव झाड.. फुललेले.. खाली सडा पडलेला, आणि वेचायला मिळाली फुले...

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ 


हा भाग सकाळच्या शांत  वेळी फिरायला मिळाला. 
सुंदर दगडी इमारती.!
 पुन्हा कधी जाऊ फिरायला असा सुंदर परिसर....

Pink Tabebuia Tree 
या फुलाच्या निमित्ताने...
 या परिसरात फेरफटका मारून आलो.

❁❁❁❁❁❁❁❁❁❁


गुलाबी तबेबुयिया ट्री 


Tabebuia aurea 

Trumpet tree


Ornamental flowering

❁❁❁❁❁❁❁❁❁❁

अशीही नावे आहेत.

दुर्मिळ झाडे 

रोज त्या वाटेने येणारे जाणारे ढुंकून सुद्धा बघत नाहीत...
भराभर तेथून जातयेत असतात...

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो तो हा असा....


No comments:

Post a Comment