उद्या
आंग्ल नवं वर्षातील पहिला सण...
सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो..
दिवस तीळातीळाने आता वाढत जाईल...
थंडी कमी होईल.
संक्रांतीनंतर शुभ कार्य सुरु करण्याची प्रथा आहे.
काळा रंग शुभ मानतात.! अर्थात या सणाला काळे कपडे परिधान करतात
काळा रंग उष्णता शोषून घेतो.. काळे, गडद रंगाचे कपडे वापरले जातात.
उष्ण अ स्निग्ध पदार्थ खाल्ले जातात.
आता हळूहळू थंडी कमी होईल आणि
सौम्य उष्ण वारे वाहू लागतील म्हणून
आनंद व्यक्त करण्यासाठी पतंग उडवले जातात...
बडोदा येथे पतंग उडवण्याच्या स्पर्धा होतात..
तीळ आणि गूळ हे उष्ण आणि स्निग्ध पदार्थ...
यांचे लाडू, वड्या केल्या जातात आणि त्या वाटतो..
आणि देताना पण किती छान बोलले जाते...
तिळगुळ घ्या..
आमचा तीळ
सांडू नका
आमच्याशी कधी
भांडू नका...
अजून एक अगदी लहानपणी कविता होती तिळाची,
त्यात किती सुंदर वर्णन आहे याचे
*******************
कणभर तीळ
वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा.
वाटेत भेटला तिळाचा कण.
हसायला लागले
तिघेही जण.!
तीळ चालला भरभर.
थांबत नाही कुठे पळभर!
"तिळा, तिळा, कसली रे गडबड?"
" थांबायला वेळ नाही. सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं,
मला नाही सवड!"
" ऐक तर जरा,
पहा तर खरा,
कणभर तिळाचा
मणभर नखरा!"
" बघा तरी वाट!
सोडा माझी वाट!"
" बघुया गंमत,
करूया जंमत!
" चला रे जाऊ
याच्याबरोबर.!
तीळ चालला भराभर.
वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत,
थेट स्वयंपाकघरात.
ताईच्या हातात
छोटीशी परात
हलवा करायला
तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून,
तीळ म्हणतो हसून,
" घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
ताईने टाकला
तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब
पाक ओतीत,
इकडून तिकडे
बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फूटाणा, शेंगदाणा गेले घाबरून!
पण तीळ पाहा कसा?
हाय नाही, हुय नाही, हासे फसफसा!
पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय !
अरे, पण हे काय?
तीळ कुठे गेला?
काटेरी, पांढरा हलवा कुठून आला?
" वाटाण्या, फुटाण्या, शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत? कणभर तिळाची मणभर करामत!
एवढासा म्हणून
हसलात मला,
खुलवीन मी तर
सर्व जगाला!"
:::::::::::::::::::::::::::::: ::::::
इतकं सुंदर चित्र होतं या कवितेखाली..
:::::::::::::::::::::::::::::: ::::::
किती सुंदर असतो हा हलवा... तिळलाडूच्या बरोबरीने असणारा...
------------------------------
एवढासा तीळ,
पण म्हणतात ना...
एक तीळ सात जणांनी वाटून खावा...
किंवा... तीळ भिजत नाही तोंडात...
------------------------------
असा हा सण ऋतू,
राशीचक्र आणि
उत्तरायणाचा संगम असलेला सण
आवडत्या रविवारी येत आहे...
एन्जॉय...
~~~~~~~~~~~~~~
संकलन...
खूप पौराणिक कथा आहेत
महाभारत युद्ध...
भीष्म
पितामह,
दक्षिणायन असल्याने स्वर्गवासी होऊ इच्छित नव्हते,
अर्जुनाने
त्यांच्यासाठी बाणांचा बिछाना तयार केला व
उत्तरायण मुहूर्त पाहूनच त्यांनी
प्राण सोडला..
तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत.!!!
याच दिवशी
गंगामाई राजा भगिरथाच्या तपाने पृथ्वीवर आली व
कपिल आश्रमात येऊन समुद्रात विलीन झाली.
'वसुधैव कुटुंबकम'
असा संदेश देतात,
आकाशात उडणारे रंगबिरंगी पतंग.!
आपण सुद्धा या दिवशी सूर्यदेवांचे स्वागत दर्शन घेऊन करू या...
No comments:
Post a Comment