Friday, 3 November 2017

त्रिपुरी पौर्णिमा...३ नोव्हेंबर...


देव दिवाळी..!!

 


इस्कॉन येथील मंदिरात कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत 

दामोदर अष्टकम म्हणतात आणि लोक तिकडे दिवे (पणती) लावून देतात

 ती राधा कृष्ण यांना ओवाळतात. 

बहुतेक दिवे सगळे बंद करतात आणि
 मंद प्रकाशात आपण दिवे ओवळत असतो खूप सुंदर दृश्य.!
नंतर ते दिवे स्टील चा मोठा टब असतो त्यात सोडायचे....



यावेळी काशीला संध्याकाळच्या वेळी गंगेत सजवलेले दिवे (द्रोणात)
पाण्यात सोडले याची आठवण झाली...
******************************

त्यानंतर गावदेवी मंदिरात त्रिपुर उजळलेले बघायला गेले... 

फारच छान वाटले...

 

 

*******************************

म वाडीच्या शेजारीच असलेल्या भवानी शंकर मंदिरातील त्रिपुर बघायला गेले. 

पूजा झालेली होती.

 

 

ग्लास मध्ये ज्योती सुंदर दिसत होत्या... 

अगदी बघत राहावे असे वाटत होते... 

*******************************
पण नऊ वाजता आमच्या येथे दिव्यांची रोषणाई करणार होते... म लगेच घरी आले.

सुंदर असे तुळशी वृंदावन काढले 

 

 

आणि त्यावर नाजूक दिवे मांडले होते
 आणि ते मेणबत्तीच्या साहाय्याने दिवे लावले..
मला पण दिवे लावायला मिळाले.

म सुंदर असे फोटो काढले.

********************************

No comments:

Post a Comment