आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी आलो
काल एअरपोर्ट वर साडेअकराच्या दरम्यान आलो.... विमान पहाटे चार चे होते
खरतर 2 वाजता आलो असते तरी चालले असते.
पण आधीच येऊन बसलो..
बसून बसून झोप काढत होते मी....
गेट नं 22 येथे विमान लागणार होते.
म सव्वातीन वाजता घोषणा झाली... कि विमानात बसून घ्यावे....
सर्वजण विमानात बसलो...
खूप जिज्ञासा होती रात्रीचे आकाश कसे दिसते...
पण विमानाने झेप घेतली तेव्हा संपूर्ण हैद्राबाद निद्रादेवी च्या आधीन असेल आणि रस्त्यावरील सगळे दिवे मात्र सुंदर दिसत होते....
जसे गाडीने प्रवास करताना घाटावर पोहोचलो कि खाली गाव दिव्यांचे दिसते अगदी तसेच...
विमानातून आकाश, रात्र शांत दिसत होती
पंखावर असलेले दिवे खूपच प्रकाशित दिसत होते... म आकाशात मला काहीच दिसले नाही
झोप पण येत होती
प्रवास मात्र सव्वा तासाचा होता... मस्त झोप काढली
जेव्हा
मुंबई आले तेव्हा हि मुंबई शांत निद्रादेवी च्या अधीन आणि दिवे मात्र
संपूर्ण मुंबईचे दर्शन देत होते... दिवे चमचम करत होते....
No comments:
Post a Comment